प्राचीन काळापासून भारताने गुरू-शिष्यांची संपन्न परंपरा जपली आहे. आपल्या देशाच्या इतिहासात असे अनेक महान गुरू-शिष्य होऊन गेले, ज्यांनी आपल्या आदर्श आचरणाद्वारे संपूर्ण जगापुढे गुरू-शिष्य नात्याचे सर्वोत्तम उदाहरण ठेवले. आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात गुरूंचे स्थान अतिशय महत्त्वाचे असते. गुरू आपल्याला बहुमूल्य असे ज्ञान देतात, पदोपदी मार्गदर्शन करतात. त्यांच्यामुळे आपल्या जीवनाला दिशा मिळते. गुरूंकडून ज्ञानप्राप्ती करून आपले आयुष्य घडवणे आणि या ज्ञानाचा समाजासाठी योग्य तो वापर करणे ही शिष्याची जबाबदारी असते. हे कर्तव्य यथोचित निभावणारी व्यक्तीच शिष्योत्तम ठरते. प्रस्तुत पुस्तकात यांपैकी विविध ४५ गुरू-शिष्यांच्या प्रसिद्ध कथा सांगण्यात आल्या असून संस्कारक्षम वयातील मुलामुलींसाठी त्या नक्कीच प्रेरक ठरतील. Read more