shabd-logo

“माझ्यातला मी…” बद्दल

नमस्कार मंडळी वार शनिवार , सायंकाळी साधारण सात वाजताची वेळ. अचानक मोबाइल खणाणला. नंबर सेव्ह नसल्याने डिस्प्लेवर एक अनोळखी नंबर चमकू लागला.नवीन नंबर बघून मीही काहीसा दचकलो…..आणि कोणाचा फोन असावा यासाठी उत्सुकतेने आणि घाईघाईत तो येणारा कॉल मी रिसीव केला. समोरून एक भारदस्त आवाज आला…काय रे तुसू…कसा आहे?नवीन वर्षाची पार्टी करून अजून बेडवर लोळत पडला आहेस का?चल ऊठ भेटायचं आहे आपल्याला. उद्या रविवार सायंकाळी ठीक 7:00 वाजता शिवाजी पार्कात.बाकी सर्वजण पण यायला तयार आहेत.तू पण ये न विसरता.वाट बघतो़य तुझी. आपण कोण बोलत आहात हे विचारण्याआधीच त्या व्यक्तीने वर नमूद केलेला फरमाना अगदी एका श्वासात बोलून पूर्ण केला. त्याचं बोलणं झाल्यावर मीच एक दीर्घ श्वास घेतला आणि थोडय़ा आश्चर्याने विचारलं.कोण बोलत आहे?आणि माझं तुषार या नावाचं नामकरण तुसू कधी झालं? यानावाने मला फक्त माझे शाळेचे वर्गमित्र बोलावतात , याचं भान मी त्याला करून दिल. त्यावर समोरून लगेचच उत्तर आलं.अर्थातच मी तुझा वर्गमित्र- बालमित्र अभिषेक.ओळखत नाहीस का? मग माझ ही उत्तर , कसं ओळखणार? एकतर तू शाळेचा वॉट्सॲप ग्रुपवर नाहीस……….. फेसबुकवर किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर तुझा वावर नाही. शेवटच आपण कधी बोललो असेल तेही मला आठवत नाही आणि तुझा कोणताही कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे नसल्याने एका अचानक कॉलद्वारे मी तुला कसओळखणार? असो…. ओळख पटण्याची शहानिशा आणि औपचारिकता आटोपल्यावर आम्ही मेन मुद्या वर आलो की रविवारी 1 जानेवारी 2023 या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर शाळेतील मित्रांसह रीयूनियन करायचं ठरलं.आणि हे रियुनियन खास त्या लोकांसाठी जे लोग मैत्रीच्या यादीतून बेपत्ता झाली आहेत.. उद्याचं औचित्य साधून सर्व पुन्हा भेटणार होते.अर्थातच शाळेतल्या जुन्या आठवणींची उजळणी करायला मिळणार होती म्हणून क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना भेटण्याचं ठरवलं.आणि

Other Language Profiles
no-certificate
अद्याप कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नाही.

“माझ्यातला मी…” ची पुस्तके

एक पुस्तक वाचा