M
नमस्कार सर, मी महेश खांडेकर रायगड जिल्हा समन्वयक mahafpc. सर मी आपल्या कंपनीत 16 ऑगस्ट 2022 या तारखेपासून कार्यरत आहे. रुजू झाल्यापासून मला माझा प्रवास भत्ता वेळेवर येत नाही. तीन-तीन महिने थांबून देखील एकही रुपया प्रवास भत्ता मिळत नाही. अजूनही मला जानेवारी फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्याचा प्रवास भत्ता मिळालेला नाही. सर मला सांगण्यात आलेले की पहिल्या तीन महिन्यात तुमचा परफॉर्मन्स बघून आपण तुमचा पगार वाढवून पण मला माझा पहिला पगारच तीन महिन्यानंतर मिळाला तेही मी मान्य केले कारण माझ्याकडे कोणत्याही प्रकारचा अनुभव नसून देखील आपण मला एवढी मोठी जबाबदारी दिली. मग नंतर मला असे सांगण्यात आले की सहा महिन्यानंतर आपण तुमचा पगार वाढवू व सहा महिन्याचे प्रोव्हिजनल पिरियड जॉइनिंग लेटर देण्यात आले. 15 फेब्रुवारी 2023 रोजी मला या कंपनीमध्ये सहा महिने पूर्ण झाले परंतु अजून माझी पगार कोणत्याही प्रकारे वाढवण्यात आलेली नाही. माझी अशी विनंती आहे की माझी पगार किमान 30000 करावी व प्रवास भत्ता वेळेवर मिळावा.