shabd-logo

छत्रपति शिवाजी महाराज इतिहास बद्दल

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात मराठ्यांची कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जाते. महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी सतराव्या शतकामध्ये ‘मऱ्हाष्ट्र राज्याची’ स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार अठराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये झाला. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये साम्राज्य स्थापन करताना इंग्रजांना मराठ्यांबरोबर प्रखर झुंज द्यावी लागली. कारण त्या काळात मराठे उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये अत्यंत प्रभावशाली होते. म्हणूनच केवळ महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये मराठ्यांच्या कामगिरीला अनन्यसाधाररण महत्त्व आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर मध्ययुगीन राज्यकर्त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी आपल्या वंशाचे राज्य स्थापना केले नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज – Chhatrapati Shivaji Maharaj त्यांनी स्थापन केलेल्या राज्याला ‘मऱ्हाष्ट्र राज्य’ असे नामाभिधान होते आणि महाराष्ट्रातील जनता हे राज्य म्हणजे आपले राज्य आहे असे मानत होती. खुद्द शिवाजी महाराजांची अशी भूमिका होती की हे राज्य रयतेचे असून सर्व जातीधर्माच्या लोकांना, साधुसंतांना आणि महिलांना या राज्यामध्ये सुरक्षितता आणि निर्भयता प्राप्त झाली पाहिजे. या ध्येयधोरणासाठी महाराजांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मराठ्यांची अस्मिता जागृती केली. ‘मराठा तितुका मेळवावा’ हा मंत्र सांगून लढाऊ वृत्तीच्या मराठ्यांमध्ये संघठन निर्माण केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुघल आणि शाही राजवटींना निष्प्रभ करून मराठ्यांच्या राज्याचा विस्तार केला. हा सारा इतिहास लक्षात घेतल्यास छत्रपति शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासात अद्वितीय राज्यकर्ते होऊन गेले याची खात्री पटते. सतराव्या शतकात जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्वराज्य स्थापनेला अत्यंत प्रतिकूल

Other Language Profiles
no-certificate
अद्याप कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नाही.

छत्रपति शिवाजी महाराज इतिहास ची पुस्तके

छत्रपति शिवाजी महाराज इतिहास चे लेख

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा