श्रीधर एन रौराळे
सर्व लहान थोरांना नमस्कार🙏 मला बरेच दिवसा पासुन वाटायच की आपन आपल्या जीवनाचा अनुभव आणि आलेल्या चढाव उतारा बाबत इतरांना सांगाव कारण काळ पार बदला आहे! या आधुनिक युगात तो काळ आठवला की अगदी काही युगे मागे गेल्याचा भास होतो! तसा तो काळ फार चांगला नव्हताच! परंतु काही बाबतीत तो वर्दान होता असे म्हणता येईल! तेव्हा कृत्रिम असे फार काही नव्हते परंतु प्रकृति ते सर्व होते ज्याची आज फक्त कल्पना केल्या जाते! मानसाने चाहले तरी तो ते करु शकनार नाही! जसे सदा सर्वदा नियमित वाहनारे निर्मल शुद्ध पाण्याचे झरे, हिरवे जंगल, प्रदुषण रहित हवा, ताजा आणि केमिकल रहित आहार हे सर्वे प्राप्त करने कठिन नाही तर अशक्य झाले आहे! गावाकडची लहान मोठी नदी आणि त्यात पोहन्याचा शेतात हुरडा आणि फळ खान्याचा!माळरानावर गुरे चारायला गेले की सत्री पेरु बोर यावर रखवालदार च्या चोरुन डल्ला मारने! या सर्व गोष्ठी आठवल्या की मन अगदी त्या नैसर्गिक अविस्काराने भाराऊन जाते! बाल पण आणि बाल मित्र आठवले की आताची आधुनिक डिजिटल लाईफ नकोशी वाटते! ते खेळ, कबड्डी, विटिदांडु, खोखो, मुलिंची लंगडी ते सर्व हरवल्या सारखे झाले! या सर्व गोष्ठी आज सुद्धा दुख:त ही सुखा:ची अनुभुति देऊन जातात! या हरवलेल्या गोष्ठींचा ओलावा आणखी आठवणी च्या माध्येमातुन येनार्या नविन पिढी पर्यंत पोहचावा म्हणून आपन काही लिहाव असे नेहमी वाटायच! आणि ते स्वप्न शब्द.इन च्या माध्यमातून आज पुर्ण होईल ही अपेक्षा आहे! आपण प्रतिसाद दिला तर नक्किच माझ्या प्रयत्नाला यश येईल यात काही शंका नाही! श्रीधर एन रौराळे आनंद पर्वत नई दिल्ली 🙏