मुक्त आत्मा तुमच्या स्वतः पलीकडील प्रवास तुम्ही खरेच कोण आहात? तुमच्या मर्यादांमधून स्वतंत्र होऊन सीमांपलीकडे भरारी घेणे कसे असेल ? अशा प्रकारची अंतःस्थ शांतता आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी तुम्ही प्रत्येक दिवशी काय करू शकता? या प्रश्र्नासाठी 'मुक्त आत्मा' हे पुस्तक साधे आणि अत्यंत उत्स्फूर्त उत्तर देते. तुमच्या आतील अवकाशाचा शोध तुम्ही पहिल्यांदाच घेत असा किंवा तुमच्या आंतरिक प्रवासात तुम्ही तुमचे आयुष्य झोकून दिलेले असो, हे पुस्तक तुमचे स्वतःशी आणि जगाशी असलेले नातेसंबंध नक्कीच बदलेले. 'मुक्त आत्मा' हे पुस्तक तुमचे स्वतःचे विचार आणि भावना यांच्याशी असलेल्या तुमच्या नात्यांचा परिचय करून देते, तुमच्या आतील ऊर्जामधे होणान्या बदलांचा स्रोत समजून घेण्यास याची मदत होते, सवयीचे विचार, भावना आणि ऊर्जाचें प्रकार यांमुळे जाणिवेला मर्यादा पडतात, त्यातून मुक्तता मिळवण्यासाठीच्या मार्गाचा हे पुस्तक शोध घेत. अखेरीस तुमच्या सर्वात आतील अस्तित्वाबरोबर मुक्तपणे राहण्यासाठीचे दार अगदी स्पष्ट्पणे उघडते. Read more
0 अनुयायी
3 पुस्तके