वृत्त - मंजुघोषा
लगावली -
गालगागा गालगागा गालगागा
मात्रा - २१
शीर्षक - " आसवांचा भार झाला "
======================
आपल्यांचा काळजावर वार झाला
पापण्यांना आसवांचा भार झाला
दाखवावे मी कुणाला मज कळेना
बोचणाऱ्या वेदनांचा हार झाला
जीवनाच्या वेदनेला अंत नाही
भावनांचा कोंडमारा फार झाला
मोह वाटे मोतियांचा त्यास भारी
सागरावर जो खलाशी स्वार झाला...
मानवाला चाड नाही यातनांची
गोंधळाने आज आत्मा ठार झाला
=======================
©️®️
✍️...🧚🏻♀️एंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अहमदनगर
📲 - ८४३३७६४२००
E Mail - dhusvaishali@gmail.com