‘‘निदान चुकणे हा प्रत्येक डॉक्टरच्या खोलीतील एक मोठा अदृश्य हत्ती आहे. तो हाताला तर लागतो, पण दिसत मात्र नाही. असे असूनही निर्णय तर घ्यावेच लागतात. ते लांबणीवर टाकता येत नाहीत. निदानाबाबतची अनिश्चिती फार त्रासदायक असते. कदाचित ती टाळण्यासाठीच आम्ही डॉक्टर लोक त्या अनिश्चितीच्या जागी एखादे भ्रामक का होईना, परंतु निश्चित असे निदान गृहीत धरतो. मग उपचार करताना त्यालाच चिकटून बसतो. वैद्यकीय उपचारांच्या अपयशाचा गाभा हाच असावा.'' - ही आहे एका अनुभवी बालरोगतज्ज्ञाची प्रांजळ कबुली. तीस वर्षांच्या वैद्यकीय कारकिर्दीत डॉक्टर सुलभा यांना डॉक्टरची कर्तव्ये आणि मनुष्यस्वभावीतील गुंतागुंत यांविषयी अनेक पेच पडले; पण याच व्यवसायाने त्यांची उकलसुद्धा केली. लेखिकेला पडलेले प्रश्न आणि तिने शोधलेली उत्तरे म्हणजे तिचे हे आत्मकथन – डॉक्टर म्हणून जगवताना.| Read more