shabd-logo

दोन शब्द

20 November 2023

22 पाहिले 22
माझी “अश्रू” कादंबरी १९५४ साली प्रिसद्ध झाली. त्यानंतर जवळजवळ सहा
वर्षांनी “ययाति” प्रकाशित होण्याचा योग येत आहे.
मी दैववादी नाही. पण “योग' हा शब्द इथे मी जाणून-बुजून योजीत आहे.
मुलाला चांगली नोकरी लागणे, मुलीला चांगले स्थळ मिळणे या किंवा अशा प्रकारच्या
साऱ्या जन्माचा संबंध असणाऱ्या गोष्टीच योगायोगावर अवलंबून असतात, असे नाही!
आगगाडीच्या डब्यात न. घोरणारे सोबती मिळणे आणि आपल्या व्याख्यानाला एखादा
अरण्यपंडित अध्यक्ष नसणे या गोष्टीसुद्धा योगायोगावर अवलंबून असतात!
तसे नसते, तर “ययाति” कादंबरीच्या प्रकाशनाला इतका विलंब का लागला
असता? 'अश्रू” लिहिण्यापूर्वीच १९५२ मध्ये या कादंबरीचे पहिले थोडे लेखन मी केले.
वी चांगली जमली. आता कादंबरी संपली, अशा
खात्रीने प्रकाशक तिची जाहिरात देऊ लागले. त्यांनी तिची छपाईही सुरू केली. २८०
पृष्टे छापून झाली, आणि- आणि गाडे एकदम अडले! कादंबरीची २८० पृष्टे छापून
झाली, तेव्हा कुठले तरी एक “परिसंवाद” प्रंकरण निघाले. मिळतील तिथून ज्ञानाचे कण
संपादन करावेत, या भावनेच्या आहारी जाऊन मी त्या परिसंवादाला गेलो. त्याच्या
पाठोपाठ नेहमीचे प्रकृतीच्या अस्वास्थ्याचे आणि कौटुंबिक आपत्तींचे चक्र सुरू झाले.
या चक्राचा वेग किंचित मंदावल्यावर, मन थोडे स्थिर झाल्यावर, आणि संपूर्ण “ययाति”
पहिल्या सहजतेने त्यात फुलू लागल्यावर ही कादंबरी पुरी करून मी रिसर्काच्या सेवेला
सादर केली.
“ययाति'ची ही जन्मकथा सांगताना नाइलाजाने वैयक्तिक आपत्तींचा मी उल्लेख
संसार हा संकटांनी भरलेला असावयाचाच! कुणाचे हे ओझे थोडे हलके असते,
कुणाचे थोडे जड असते. कुणाच्या पायात चार काटे अधिक मोडतात, कुणाच्या चार कमी
मोडतात. एवढाच काय तो माणसा-माणसांत फरक असतो! आपण सारेच नियतीच्या
जात्यात भरडले जाणारे. दाणे आहोत. अशा स्थितीत लेखकाने वैयक्तिक अडचणींचा
पाढा वाचण्यात काय अर्थ आहे?
हे मला पूर्णपणे कळते; पण गेल्या तीन वर्षांत या कादंबरीच्या बाबतीत परिचित
आणि अपरिचित वाचकांनी इतक्या पृच्छा केल्या आणि ठिकठिकाणी भेटणाऱ्या लोकांनी
तिच्याविषयी प्रशन विचारून मला इतके भंडावून सोडले की, काही दिवसांनी मी या
पृच्छांची व प्रश्नांची उत्तरे द्यायचे सोडून दिले! मुलाने बापाचा छळ केल्याच्या
हकीकती जगात आपण ऐकतो; पण माझा हा मानसपृत्र अशा रीतीने हात धुऊन माझ्या
मागे लागेल, याची मला कल्पना नव्हती! 'ययाति' केव्हा पुरी होईल, हे मला परवा-
परवापर्यंत कुणालाच- प्रकाशकांनाही- सांगता येत नव्हते. म्हणून खुलाशादाखल हे सर्व
लिहिले आहे. वाचकांची ती पत्रे आणि लोकांचे ते प्रशन माझ्यावरल्या प्रेमाच्या

पोटीच निर्माण झाले होते, याची मला पूर्ण जाणीव आहे. त्या प्रेमाबद्दल मी अत्यंत
कृतज्ञ आहे.

या कादंबरीप्रमाणे दुसरेही काही संकल्प गेली अनेक वर्षे मी उराशी बाळगून
आहे. प्रकृतीची बहुविध अवकृपा थोडी कमी व्हावी आणि त्यांतले एक-दोन तरी साकार
करण्याचे सामर्थ्य लाभावे, एवढीच इच्छा आहे. भोवताली दाटणाऱ्या संध्याछायांची
मला र्ण जाणीव आहे. पण वाढत्या संधिप्रकाशात पायांखालची वाट दिसेनाशी झाली,
तरी क्षितिजावरली चांदणी आपली सोबत करू लागते! शिरोड्यात संध्याकाळी
समुद्रावर फिरायला गेल्यानंतर वर्षानुवर्ष हा अनुभव मी घेतला आहे. उरलेल्या
वाड्मयीन सहलीतही तो कदाचित येईल! नाही कुणी म्हणावे?
कोल्हापूर, २९-८-६१

वि. स. खांडेकर

इतर कौटुंबिक पुस्तके

1
Articles
ययती
0.0
ययाती हे व्ही एस खांडेकर यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. मराठी साहित्यातील हे एक वैशिष्ट्य आहे. सर्व मराठी आणि प्रादेशिक भाषा रसिकांसाठी ययाती वाचणे खरोखरच समाधानकारक ठरू शकते. आशा आहे तुम्हाला वाचायला आवडेल.

एक पुस्तक वाचा