एक तरी गुलमोहर असावा, माझ्याही अंगणात.....
हिरव्यागार पानाआडून रंगबिरंगी,
लाल, पिवळ्या, केशरी रंगांची उधळण करणारा....
दुःखाच्या भर उन्हातही,
हसत, बहरत तग धरून उभा राहा माझ्यासारखा,
असं मोठ्या माजात महणणारा......
एक तरी गुलमोहर असावा, माझ्याही अंगणात.....
पानझडी नंतर येणाऱ्या, वसंताची चाहूल देणारा...
मरगळलेल्या मनाला, प्रसन्नतेची ऊर्जा देणारा....
एक तरी गुलमोहर असावा, माझ्याही अंगणात.....