shabd-logo

लाचारांचा फड - धर्मातली जात आणि जातीतल राजकारण!

21 September 2024

5 पाहिले 5


article-image

महाराष्ट्राच्या राजकारणाची बदललेली दिशा आणि जातीय, धर्माच्या नावावर चाललेल राजकारण. महाराष्ट्राला अराजकतेकडे कधी नेईल काहीच सांगता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांपासुन ते आमच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत होऊन गेलेले महापुरुष आणि समाजसुधारक यांच्या विचारांची उर्मट महाराष्ट्राने कधी दखलच घेतली नाही. याच कारणाने महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आज ही तसाच खितपत पडलाय, बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय लोंढ्यांच्या टोळ्या कधी थांबणार आहेत काय माहीत. मुंबईला पडलेला परप्रांतीयांचा वेढा आणि पश्चिम महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंत महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव अश्या अनेक मुद्यांतून राज्यकर्त्यांचे पुन्हा एकदा वाभाडे काढणार आहोत. मागील पुस्तकात आपण महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस, घुसखोरी, परप्रांतीय वसाहती अश्या अनेक मुद्यांवर आधारीत चर्चा केली आता "धर्मातली जात आणि जातीतल राजकारण" हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. प्रथमतः हा लेख कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माला लक्ष्य करण्यासाठी लिहिला गेला नसून जात, धर्म, पंथ आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची झालेली विटंबना, संताच्या विचारांची हास, महापुरुषांचा वापर हा फक्त राजकारणासाठीच, धर्माचा बाजार, धार्मिक रूढी परंपरा, लैंगिक शोषण, नामांतर, जातीय वस्त्या, वाघ्या मुरळी प्रथा, बोकड कापणे, मनुष्य बळी, भोंदू बाबा आणि त्यांच्या अंधश्रद्धा ज्या आपल्या समाजासाठी किती घातक आहेत, हे सांगणारा हा लेख अश्या अनेक महत्त्वाच्या मुद्यांमध्ये हात घालण्यासाठी लिहला गेला आहे. याची सर्व वाचकांनी नोंद घ्यावी !

लाचारांचा फड - धर्मातली जात आणि जातीतल राजकारण! ची आणखी पुस्तके

एक पुस्तक वाचा