shabd-logo

मिस निकाराग्वाला मिस युनिव्हर्स 2023 चा ताज मिळाला

19 November 2023

14 पाहिले 14

 

article-image

72 वी मिस युनिव्हर्स, 2023 ची स्पर्धा एल साल्वाडोर येथे शनिवारी जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. मिस निकाराग्वा, शेनिस पॅलासिओस, हीला मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट देण्यात आला. मेरी वॉलस्टोनक्राफ्टला तिचा आदर्श ठेवण्याबद्दलच्या तिच्या विचारांबद्दल बोलून तिने स्वतःला सर्वोच्च स्थानावर ठेवले. ती म्हणाली, मेरी वॉलस्टोनक्राफ्टच्या कार्यातून प्रेरणा घेत मिस निकाराग्वा महिलांसाठी नवीन संधी आणू इच्छिते. अंतिम प्रश्न फेरीदरम्यान मिस निकाराग्वाच्या उत्तरातून हे व्यक्त झाले. मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेत 84 प्रतिनिधी होत्या. मिस ऑस्ट्रेलिया, मोराया विल्सन आणि मिस थायलंड, अँटोनिया पोर्सिल्ड या दोन अन्य अंतिम स्पर्धक होत्या. मिस थायलंड आणि मिस ऑस्ट्रेलिया अनुक्रमे फर्स्ट आणि सेकंड रनर अप ठरल्या. अंतिम प्रश्न फेरीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अंतिम-स्पर्धकांना 30 सेकंद मिळाले होते. अंतिम प्रश्न फेरीत तिन्ही प्रतिनिधींना एकच प्रश्न विचारण्यात आला.  

मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेमध्ये जॉन लीजेंडचे संगीतमय प्रदर्शन आणि एल साल्वाडोरचे राष्ट्रपती, नायब बुकेले यांचे नम्र भाषण झाले. बुकेले यांनी अल साल्वाडोरला चमकण्यासाठी एक क्षण दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा पॉला
शुगार्ट देखील येथे उपस्थित होत्या.  

या वर्षी मिस युनिव्हर्स टीमने मिस फिलीपिन्स मिशेल डी हिला व्हॉईस फॉर चेंज म्हणून सुवर्ण पुरस्कार प्रदान केला. मिस फिलीपिन्स ऑटिझम संबंधित काम करण्याबद्दल बोलल्या. मिस स्पेन, अथेनिया पेरेझ हिला मिस कॉन्जेनिअलिटी हा किताब देण्यात आला.  

मिस इंडिया 2023, श्वेता शारदा इतर 84 प्रतिनिधींसह रॅम्पवर चालताना दिसत होती आणि 20 फायनलिस्टपैकी एक होती. स्विम सूट फेरीनंतर श्वेता स्पर्धेत पुढे जाऊ शकली नाही.  

या वर्षीच्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे यात 2 ट्रान्स जेंडर प्रतिनिधी, मिस पोर्तुगाल मरीना मॅचेटे आणि मिस नेदरलँड्स रिक्की कोले आणि 1 आई देखील सहभागी होती. या स्पर्धेत प्रथमच पाकिस्तान, व आश्चर्यचकित करणारे नेपाळ, युक्रेन आणि
सुंदर यजमान देश एल साल्वाडोर या देशांचे प्रतिनिधी होते. मिस युनिव्हर्स 2023 चा सेट हुलिओ ने डिझाइन केला होता ज्याचे
ऑनलाइन स्ट्रीमिंग होस्ट झुरी हॉल आणि कॅट्रिओना ग्रे यांनी खूप कौतुक केले. रोकू चॅनेलने आणि X ने विनामूल्य थेट प्रवाह प्रदान केला ज्याच्यामुळे संपूर्ण जगाने या शोचा थेट ऑनलाइन आनंद लुटला.  

पुढील वर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन मेक्सिकोमध्ये केले जाईल. 

अश्विनी तावडे ची आणखी पुस्तके

1

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने क्लस्टर विद्यापीठांच्या निर्मितीसाठी मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता दिली

18 November 2023
2
0
0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत क्लस्टर विद्यापीठे तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील उच्च शैक्षणिक संस्थांसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत.

2

मिस निकाराग्वाला मिस युनिव्हर्स 2023 चा ताज मिळाला

19 November 2023
1
0
0

72 वी मिस युनिव्हर्स, 2023 ची स्पर्धा एल साल्वाडोर येथे शनिवारी जोस अडोल्फो पिनेडा एरिना येथे आयोजित करण्यात आली होती. मिस निकाराग्वा, शेनिस पॅलासिओस, हीला मिस युनिव्हर्स 2023 चा मुकुट देण्यात

3

सिल्क्यरा बोगदा रेस्क्यू ऑपरेशनला व्हर्टिकल ड्रिलिंगसह आणखी 2-3 दिवस लागू शकतात

20 November 2023
1
0
0

12 नोव्हेंबर 2023 रोजी, उत्तराखंडमधील सिल्क्यरा बोगदा कोसळला तेव्हा त्यातील अनेक कामगारांचे जीव धोक्यात आले. सोमवारी, बचाव मोहिमेच्या 9व्या दिवशी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, नितीन गडकरी

---

एक पुस्तक वाचा