आज देखील भारतात अनेक लोकांना पैश्याचे नियोजन जमत नाही,पैसा तर कमवतात मात्र शेवटी शिल्लक काही राहत नाही अश्या लोकांनी पैश्याच्या नियोजनावर लक्ष देणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल ते जाणून घेऊ या आज
सर्वात पहिले जर आपण 10 हजार रुपये महिन्याला कमवत असाल तर त्याचे 3 भाग करा पहिले 50 टक्के घराच्या खर्चावर जसे किराणा,लाईट बिल,शाळेची फी असा अती आवश्यक खर्च दुसरे 30 टक्के तुमच्या लाईस्टाईल वर जसे तुमचे परिवाराचे कपडे,प्रवास,मनोरंजन या सारख्या जीवनातील आनंद देणाऱ्या गोष्टी किव्वा भविष्यात मोबाईल अथवा स्वप्नातील कोणतीही वस्तू घेण्यासाठी त्या 30 टक्के मधून बचत करून रोख मध्ये ती वस्तू घ्या लोन च्या जाळ्यात अडकु नका आणि तिसरे म्हणजे 20 टक्के उरलेली रक्कम गुंतवणूक करा शेअर मार्केट,गोल्ड बाँड, म्युचल फंड आणि हे फक्त 3 महिने तुम्हाला अवघड जाईल त्या नंतर तुमच्या कडे शिल्लक पण दिसेल आणि घरात आनंद देखील तर एक प्रयत्न करायला हरकत नाही तर या येणाऱ्या पगारातून करा सुरवात आणि लेख कसा वाटला नक्की कमेंट करा सोबत तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती वाचायला आवडेल तेही कळवा धन्यवाद.