shabd-logo
Shabd Book - Shabd.in

Yaa Sam Haa [paperback] Pitre, Mjr. Gen. Shashikat,Anand Hardikar,Kamal Shedge [Feb 01, 2020]…

Mjr. Gen. Shashikat Pitre , Anand Hardikar (Editor), Kamal Shedge (Illustrator)

0 भाग
0 लोकांनी विकत घेतले
0 वाचक
14 October 2023 रोजी पूर्ण झाले
ISBN क्रमांक : 9788194305101
यावर देखील उपलब्ध Amazon

मराठ्यांच्या इतिहासात युगप्रवर्तक शिवछत्रपतींचा खराखुरा वारसदार शोभणारा अजिंक्य रणधुरंधर म्हणजे दुसरा पेशवा... थोरल्या बाजीराव. ऐन विशीच्या उंबरठ्यावर वडिलांच्या मृत्यूमुळे पेशवेपदाची जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली. त्याच्या क्षमतेबद्दल शंका बाळगणाऱ्या अनेक ज्येष्ठ सरदारांच्या मनांतली असूया आणि द्वेष दूर सारण्यासाठी हवे होते ते लक्षणीय यश बाजीरावाने अवघ्या चार वर्षांतच मिळवले. मराठा सैन्याजवळ प्रचंड तोफखाना नव्हता. तथापि ती उणीव खिजगणतीतही न घेता त्याने वेगवान घोडदळ कल्पकतेने वापरले. रणांगणाची नेमकी निवड करण्यात, भौगोलिक वैशिष्ट्यांचा लष्करी फायदा उठवण्यात आणि कमीत कमी शक्ती वापरून शत्रूला शरण आणण्यात तो कमालीचा यशस्वी होत गेला. ज्याच्या अश्वारोही युद्धनेतृत्वाची फील्डमार्शल माँटगोमेरीसारख्या सुप्रसिद्ध पाश्चिमात्य सेनानीनेसुद्धा गौरवपूर्ण दखल घेतली, तो हा स्वराज्यविस्तारक अजिंक्य वीर! बाजीरावाच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीतील विविध मोहिमांचा, त्याच्या अद्वितीय अश्वारोहणकौशल्याचा, अभिजात व्यूहरचनांचा, सरदारांपासून बारगीरांपर्यंत सर्वांनाच बरोबर घेऊन विजय खेचून आणणाऱ्या अलौकिक स्वभाववैशिष्ट्यांचा तपशीलवार वेध घेणारा हा ग्रंथ. नकाशांसहित. Read more 

Yaa Sam Haa paperback Pitre Mjr Gen Shashikat Anand Hardikar Kamal Shedge Feb 01 2020

0.0(0)

Book Highlights

no articles);
कोणताही लेख सापडला नाही
---

एक पुस्तक वाचा