अल्बर्ट आइन्स्टाइन..... 20 व्या शतकातील सर्वांत प्रतिभाशाली आणि द्रष्टा विचारवंत. विज्ञानात उत्तुंग योगदान देणारा हा लोकप्रिय शास्त्रज्ञ प्रत्यक्ष माणूस म्हणून कसा होता, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरेल. प्रस्तुत पुस्तकातून आइन्स्टाइन यांच्या धारणा, तत्त्वज्ञान आणि विविध विषयांवरील मतं यांबद्दल जाणून घेता येईल. राजकारण, धर्म, शिक्षण, जागतिक अर्थव्यवस्था, आयुष्याचा अर्थ, सैनिकीकरण व तंत्रज्ञान, संस्कृती आणि समृद्धी... अगदी असंख्य विषय. मानवजातीचं कल्याण हेच विज्ञानाचं सर्वोच्च ध्येय असायला हवं, असं ठामपणे सांगणार्या आइन्स्टाइन यांचा शांतताप्रिय जग या संकल्पनेवर दृढ विेशास होता. मानव आणि मानवी मूल्यं यांत अधिकाधिक अंतर निर्माण होणार्या आजच्या विज्ञानयुगात अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा हा मानवतावादी दृष्टिकोन जाणून घेणं अपरिहार्य आहे. Read more