जे.आर.डी.... ‘जे भारतासाठी उत्तम, तेच टाटांसाठी!’ अशा उदात्त विचारसरणीसह तब्बल दीडशे वर्षांचा संपन्न वारसा असलेल्या टाटा उद्योगसमूहाची धुरा ज्या खांद्यांनी अर्धशतकाहून अधिक काळ समर्थपणे वाहिली... आदर्श उद्योजकतेचे आणि व्यक्तित्वाचे मानदंड ज्यांनी आपल्या उन्नत कृतींतून उभारले... विशाल उद्योगसमूहाद्वारे संपत्तीनिर्मिती हाच देशसेवेचा मार्ग निवडून भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक अर्थक्षितिजावर प्रतिष्ठा दिली... त्या जहांगीर रतन दादाभॉय टाटा यांनी आपल्या प्रखर सामाजिक आणि नैतिक जाणिवांतूनच जीवनाचा मोक्ष साधला... त्यांच्या ‘अपत्या’नं, अर्थात एअर इंडियानं, त्यांच्या निधनानंतर पुढील सार्थ शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली... “त्यांनी आकाशाला स्पर्श केला आणि आकाशही हसलं. त्यांनी आपले बाहू पसरले आणि अवघं जग कवेत घेतलं. त्यांच्या दूरदृष्टीनं व्यक्ती आणि संस्था खूप मोठ्या झाल्या.” आपल्या अगणित संस्थांबरोबरच अवघ्या देशाला प्रगतीची वाट दाखवणार्या एका सर्वकालीन महान उद्योगपतीचं वेधक चरित्र. Read more