आपल्या कार्यकतृर्त्वाद्वारे शिक्षणपद्धतीत चमत्कार घडवून जग बदलण्यास अमूल्य असे योगदान दिले आणि आपल्या शिकवण्याच्या नवनवीन पद्धतींद्वारे विद्यार्थ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल करून त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध केले- अशा जगभरातील दहा अद्भुत महिला शिक्षकांचा परिचय प्रस्तुत पुस्तकात करून देण्यात आला आहे. माँटेसरी शाळेच्या जनक म्हणून नावलौकिक मिळवणार्या आणि विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देणार्या मारिया माँटेसरींनी विकसित केलेली शिक्षणपद्धती आजही लाखो मुलांना शिकवण्यासाठी वापरली जाते. दृष्टिहीन जगाला दृष्टी देणार्या अॅनी सुलीवॉन मेसीने हेलन केलर आणि तिच्यासारख्या असंख्य मुलांशी संवाद साधण्याचे आवाक्याबाहेरचे कार्य यशस्वीरीत्या करून शिकविण्याचा एक नवीन मंत्र सांगितला. मुलांना अंधारातून प्रकाशात आणणार्या फ्रिएद डिकर-ब्रँडेलसने नाझींच्या कैदेत असतानाही छळछावणीतील लहान मुलांना चित्रकला शिकवून आपल्या मनातील भावना व्यक्त करायला शिकवले. ओनेसिम डोरवाल या कॅनडाच्या इतिहासात शिक्षणाचा पाया रोवणार्या आदर्श महिला शिक्षिका ठरल्या. याव्यतिरिक्त ‘फ्रीडम रायटर्स’ची संस्थापक एरिन ग्रुवेल, मुलींच्या शिक्षणासाठी लढा देणारी मलालाई जोया आणि रादेन अयू कार्तिनी, प्रत्येक विद्यार्थ्याची जाणीवपूर्वक दखल घेणार्या मार्वा कॉलिन्स, अंतराळ शिक्षिका क्रिस्टा मकॉलिफ आणि विशेष शिक्षण शिक्षिका डेनिस फ्रुक्टर या इतर शिक्षिकांचाही यात समावेश आहे. नावीन्यपूर्ण शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थी घडविणार्या या महिला शिक्षिकांचा हा प्रवास विलोभनीय आणि विस्मयचकित करणारा आहे. आपल्या कुटुंबासह टोरँटो येथे राहणार्या हेलन वोल्फ या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना 30 वर्षांहून अधिक काळ शिकविण्याचे कार्य करीत आहेत. इंग्रजी भाषा शिकविणार्या या शिक्षिकेने मुलांसाठी लिहिलेले हे पहिलेच पुस्तक आहे. Read more