उर्दू भाषेतले प्रख्यात कथाकार सआदत हसन मंटो विश्व कथा साहित्यातले असे नाव आहे, ज्यांना साहित्याबद्दलची समज आणि आवड आहे, अशा प्रत्येक वाचकाला माहीत आहे. मंटोने त्यांच्या जीवनकाळात समाजाच्या ज्या घाणेरड्या बाजूचा अनुभव 'घेतला होता, तेच त्यांनी त्यांच्या कथेतून शब्दबद्ध केले. मंटोच्या कथा एकप्रकारे मानसिक खळबळ माजवून देणाऱ्या कथा आहेत. त्यात समाजातील दलित, वंचित लोकांचे विवश आणि वेदनादायक जगणे त्यांनी प्रमाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या वर्णनातून जे ध्वनीत होते, ते असामान्यपणे जगण्या-मरण्याची कला आणि या दरम्यानचा संघर्ष व्यक्त होतो. त्यांच्या कथांचे मुख पात्र अशा यातना भोगणारे आत्मा आहेत, जे कमजोर असतानाही बुलंद इच्छाशक्तीच्या जोरावर कट्टर धर्मांधतेच्या विरोधात उभे रहातात.'मंटोच्या २१ श्रेष्ठ कथेत' त्यांच्या श्रेष्ठ कथा निवडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या जगातील निरनिराळ्या भाषेत अनुवादीत झाल्या आहेत. आशा आहे की हे संकलन देखील वाचकांना मनापासून आवडेल. Read more
0 अनुयायी
3 पुस्तके