ही केवळ कपोलकल्पित कल्पना नाही. विलक्षण वेगाने वाढणा-या विज्ञानाचा माणसाच्या संपूर्ण जीवनावर अन् भवतालावर काय परिणाम होईल, याचा वेध घेणारी रंजक तितकीच थक्क करणारी उत्कंठावर्धक तितकीच भयचकित अन् स्तिमित करणारी मालिका कालचे तंत्रज्ञान आज कालबाह्य ठरवणारा विज्ञानाचा भोवंडून टाकणारा वेग. मानवी जीवनाचा प्रत्येक पैलू व्यापून टाकणारे संगणक - विज्ञान अन् इंटरनेटचे महाजाल. सोपी अन् अवघड - सारीच कामे बिनचूक करणारे यंत्रमानव. ही सारी वाटचाल माणसाला, मानवतेला, संस्कृतीला कोणत्या दिशेला नेणार? भविष्यवेध संगणक इंटरनेट यंत्रमानव | Read more