फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियावर स्वत:चे अकाऊंट चालवणे. परदेशांतील मुला-लेकरांबरोबर स्काईपवरून समोरासमोर संवाद साधणे. यूटयूबवर देशोदेशींचे नवे-जुने दर्जेदार सिनेमे विनामूल्य पाहणे. नवे-जुने सिनेसंगीत, नाटयसंगीत, शास्त्रीय संगीत ऐकणे. वीज, टेलिफोन, मोबाइलची बिले ऑन-लाइन भरणे. रेल्वे वा एस्टीची तिकिटे ऑन-लाइन आरक्षित करणे. घरगुती वस्तूंची ऑन-लाइन खरेदी-विक्री करणे. बँकिंगचे सारे व्यवहार इंटरनेटवरून करणे. स्वत:चा मराठी इंग्रजी ब्लॉग लिहिणे. गुगलवरून प्रश्नाचे उत्तर मिळवणे. हे सारे कमालीचे सोपे असते. यांतील ब-याच गोष्टी तर मराठीतूनही करता येतात आणि त्यासाठी कोणत्याही पूर्वज्ञानाची वा शिक्षणाची गरज नसते. हे सारे मला यायलाच हवे ! तर हे पुस्तक मला घ्यायलाच हवे Read more