क्रुरता....
एखाद्या हिंस्त्र
प्राण्याची शिकार करतानाची क्रुरताही लाजेल
इतकी क्रुरता
हल्ली माणसात दिसू लागली आहे...
तो हिंस्त्र
प्राणीही आपले पोट भरण्यासाठी शिकार करतो...
पण आज माणुस
माणसाचीच शिकार करत सुटला आहे क्रुरतेने
पण कशासाठी ...? एक
न सुटलेले कोडे आहे...
एक अल्पवयीन मुलगी
बापाच्याच पोटात चाकु घुपसते...प्रियकरासाठी ...
एक पत्नी
हनीमुनच्या दिवशी नवर्याचेच लिंग कापते.
वसतीगृहाचा पाहरेकरी
तेथे राहणार्या एका मुलीचा बलात्कार करुन तिचा खून करतो.
एक अविवाहीत माता
नुकत्याच जन्माला आलेल्या मुलाचा गळा घोटते.
एक वयस्कर नवरा
आपल्या पत्नीला मारून तिच्या शरीराचे तुकडे करुन कुत्र्याला खायला घालतो.
एक मुलगा
दारुच्या नशेत आपल्याच बापासमोर आपल्या आईवर बलात्कार करतो.
एक पत्नी तिच्या प्रियकराच्या
मदतीने आपल्याच नवर्याचा काटा काढते...
माणसातील दया, माया, मानवता, माणुसकी
संपत चालली आहे...असेच चित्र दिसत आहे सभोवताली...
प्रेमाच्या
नावाखाली आपल्या कामुकतेला जोपासत अनैतिक सबंधाना पोसत... क्रुरतेच्या रोपांना
खतपाणी घातले जात आहे... आज...
हे कोठेतरी
थांबायला हवे...नाहीतर...माणुस आणि प्राणी यात अंतरच उरणार नाही... माणसाच्या क्रुरतेमुळे...
© कवी – निलेश
बामणे ( 10/06/2023 )