shabd-logo

विकास हवा… विनाश नको...

6 June 2023

5 पाहिले 5

 विकास हवा… विनाश नको... 

 कोकणात राजापूर येथील
बारसू येथे रिफायनरी उभारण्यात येणार असल्याच्या बातम्या वाचून मी अस्वस्थ झालो
कारण माझा जन्म कोकणातलाच दापोली तालुक्यातील...कोकणातील नैसर्गिक साधन - संपत्ती
बद्दल मला प्रचंड प्रेम आहे. त्यामुळेच मी नेहमी म्हणतो,’’ आता यापुढे  मुंबईत कर्ज काढुन घर घेण्यापेक्षा मी कोकणातील
गावाला जाऊन राहीन. तिकडेच काही तरी काम – धंदा करेन ! माझ्या मते गावातील जमीन
विकून मुंबईत घर घेण्यासारखा दुसरा गाढवपणा नाही. यापुढे बहुसंख्य मराठी माणसाला
मुंबईत घर घेणे परवडणार नाही. हे वास्तव आहे. आज कोकणात येऊ घातलेल्या
रिफायनरीच्या जागा परप्रांतियांनी अगोदरच विकत घेऊन ठेवल्या आहेत. त्या जागेत
रिफायनरी होईल की नाही हा नंतरचा भाग पण त्यांनी एकरी तीन - चार लाखाला घेतलेल्या जमिनीचे
आज ते सोळा – वीस लाख मागत आहेत म्हणजे चार पट जास्त...त्या जमीनी त्यांना विकल्या
कोणी ? तर मराठी माणसाने... कशासाठी ..? भावकीत वाटण्या
करण्यासाठी...ते पैसे घेऊन काय केले असेल तर मुंबईत एखादा खुराडा विकत घेतला
असेल... त्या खुराड्यात जीव गुदमरला की वर्षातुन दोन – तीन वेळा तेथे शुद्ध हवा
खायला कोकणात येतात आणि ती खाऊन मुंबईला गेल्यावर म्हणायला मोकळे होतात कोकणाचा
अजुन काही म्हणावा असा विकास झालेला नाही. कोकणात स्थानिक असणार्‍या लोकांकडे खुप
कमी जमीन शिल्लक राहिलेली आहे हे वास्तव आहे. त्यामुळे त्यांच्या समोर
उदर्निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहेच ? पण तो का झाला ?
वाटणीत
आलेली जमीन न विकता मुंबईत राहणार्‍या चाकरमण्यांनी त्या जमीनीत थोडी - थोडी
गुंतवणुक केली असती तर तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळाला असता. मग हे असे
रिफायनरी सारखे प्रकल्प कोकणात आणायची गरज भासली नसती.. आज कोकणाची जी
दुर्दशा झाली आहे त्याला कोकणातील चाकरमणीच जास्त जबाबदार आहेत. हे सत्य नाकारता
येणार नाही.  

 आज कोकणातील स्थानिक
लोक त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल असे प्रकल्प कोकणात येत असतानाही केवळ
पर्यावरणाचा विचार करुन त्या प्रकल्पाला विरोध करत आहेत. पण आज किती चाकरमणी
त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात आहेत ? ते कसे राहणार ? कारण त्या जमीनी
परप्रांतियांना विकण्याचा गाढवपणा त्यांनीच केलेला आहे. आज कोकणातील बहुसंख्य
भागात कोणीही शेती करत नाही... कारण कित्येकांकडे शेती करण्या इतकी जमीन शिल्लकच
राहिलेले नाही. अंब्या फणसासारखी झाडे फल्यांसाठी तोडुन झालेले आहेत. कोकणातील
चाकरमणी कोकणातीलच वडीलोपार्जित जमीनी विकून कोकणात बंगला बांधतात...खरे तर हा
मोहरा देऊन भुरी घेण्याचा प्रकार आहे पण तो होतोय. आता कोकणातील रिफायनरीला विरोध
करणार्‍यापैकी कित्येकांनी आपल्या जामिनी परप्रांतियांना विकल्या असतील... म्हणजे
त्यांना कोकणातील शुद्ध हवा हवी पण कोकणाचा विकासाचे त्यांना काहीही पडलेले नाही
कारण त्यांना तेथे चार दिवस राहायचे असते... त्या जमीनी परप्रांतियांना विकल्या
गेल्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले,’’
प्रकल्पाला
70 % लोकांचे समर्थन आहे. त्या जमीनी परप्रांतियांनी विकत घेतल्यामुळेच ओसाड
पडलेल्या होत्या. त्यामुळेच माजी मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांना पत्र लिहिले असावे
की या मोकळ्या जागेचा रिफायनरीच्या प्रकल्पासाठी विचार केला जाऊ शकतो... पण
त्यांना हे सुचविले कोणी ? हा संशोधणाचा विषय आहे... कोकणात रिफायनरी आल्यामुळे
कोकणवासीयांचेच फार नुकसान होईल या भ्रमात कोणी राहु नये... आज शुद्ध हवेची गरज
प्रत्येकाला आहे... तुम्हाला आयती शुद्ध हवा मिळत होती ती तुम्हाला घ्यायचीच नसेल
तर त्याला कोकणवासी तरी काय करणार ..? प्रगतीला विरोध नाही...तो
होता कामा नये... पण जे काही कराल ते सारासार विचार करुन करा कारण एकदा का ही चुक
झाली की ती सुधारता येणार नाही....कोकणाला विकास हवा… विनाश नको... 

लेखक – निलेश बामणे 

   

1

विकास हवा… विनाश नको...

6 June 2023
0
0
0

 विकास हवा… विनाश नको...   कोकणात राजापूर येथील बारसू येथे रिफायनरी उभारण्यात येणार असल्याच्या बातम्या वाचून मी अस्वस्थ झालो कारण माझा जन्म कोकणातलाच दापोली तालुक्यातील...कोकणातील नैसर्गिक साधन - स

2

डार्लिंग ( एक विनोदी काल्पनिक कथा )

8 June 2023
0
0
0

 डार्लिंग ( एक विनोदी काल्पनिक कथा )      दोन दशकांपूर्वी रविवारची सकाळ होती. सकाळचे दहा वाजले होते. विजय पेपर वाचत वाचता सोनल सोबत गप्पा मारत होता. त्याची आई बाजारात गेली होती तर बाबा त्यांच्या मित

3

क्रुरता....

10 June 2023
0
0
0

 क्रुरता....   एखाद्या हिंस्त्र प्राण्याची शिकार करतानाची क्रुरताही लाजेल  इतकी क्रुरता हल्ली माणसात दिसू लागली आहे...  तो हिंस्त्र प्राणीही आपले पोट भरण्यासाठी शिकार करतो...  पण आज माणुस माणस

---

एक पुस्तक वाचा