सतराव्या शतकात युरोपमध्ये घडलेली एक विचित्र सत्यकथा आहे ही... वैज्ञानिक संशोधनातून नव्या संकल्पना पुढे येत होत्या. त्या जुन्या धार्मिक समजुतींना आव्हान देत होत्या. या दोन्ही शक्तींमधील संघर्षाला धार चढत होती, ती राजदरबारातील लहरी माणसांच्या कटकारस्थानांमुळे. अशाच एका कारस्थानाच्या पार्श्वभूमीवरची ही कथा... केपलर नावाच्या एका महान संशोधकाच्या म्हाता-या आईला चेटकीण ठरवून जिवंत जाळायचा कट आखला गेला. त्या खटल्यातून आपल्या निष्पाप आईला कसं वाचवायचं, या विवंचनेनं ग्रासलेल्या केपलरना कोणत्या मानसिक ताणतणावातून जावं लागलं, याचं भावस्पर्शी चित्रण करणा-या मूळ जर्मन कादंबरीचा हा सरस मराठी अनुवाद... Read more