shabd-logo

विठुराया

3 June 2023

4 पाहिले 4
॥ श्री ॥


तूच माय नि तू बाप, 
जगताची माऊली |
उन्हातल्या पामराला, 
मायेची सावली ॥धृ॥

प्रल्हादाचे स्वर जेव्हा, जेव्हा कानी येई ।
पंढरीचा पाडूरंग, ही तल्लीन होई |
तुझ्यापाई वाहीन, झिजवीन काया ||
तुझ्याविना नाही कोणी मज विठुराया ||१||

ऐकूनी वाणी तयाची, कर्ण तृप्त जाहले ।
पंढरीच्या वारीमंधी, सावळे आभाळ पाहिले |
तुझ्या कुशी मंधी भासे, माऊलीची माया ||
तुझ्याविना नाही कोणी मज विठुराया ||२||

येता दर्शना पंढरी, नयनी रुप साठले |
श्रवणी कर्ण नाम तुझे, कंठी भाव दाटले |
तुज चरणी ठेऊनी माथा, पडतो रे पाया |
तुझ्याविना नाही कोणी मज विठुराया ||३||



मोहन (अक्षय) साळे
(अक्षसंकेत)
९५५२९५७६६७

मोहन (अक्षय) साळे ची आणखी पुस्तके

एक पुस्तक वाचा