shabd-logo

बालपणीच्या गमती जमती

8 June 2024

6 पाहिले 6

क्षण ते हसत्या खेळत्या चेहऱ्याने केलेले उद्योग ते. आठवणीत राहणारी परत न येणारे नदीच्या प्रवाहाप्रमाने चालणारा पहिला आयुष्याचा टप्पा तो.अनेक असतील पुढे आयुष्याचे टप्पे , पण मजा नाही कोठेच ती. किती किस्से सांगावे संपता काही संपेना, दिवसावर दिवस गेले ते बालपण संपले ते.

लहानपणी मी कशी होते नुसतं आठवलं तर म्हणनाराच नाही कोणी की ती मी होते. माझे व्यक्तीमत्वच होत तसं एकदम तब्बेतीने गुटगुटीत, मोठे डोळे ani मातीत खेळण्याची सवय. शाळेत तर मी सगळ्यात शांत. वर्गात कधी बोलण्याची नावं लिहायला लावली तर कधीच माझं नावं येत नसे. मी जास्त दंगा न केल्याने मला सगळे शिक्षक तेवढ्या बाबतीत नावजायचे. अख्या शाळेत शांत म्हणून माझी शाळेत ओळख होती.

दिवसभर लहानपणी कधी घरात बसले आठवतच नाही. कसलेही ऊन असो संपूर्ण गाव फिरून यायची तेही कसलेही ऊन असो, ऊनाची मी फिरायची. एकदा काय झालं मी माझी चप्पल कोठेतरी विसरून आले, आणि मला आठवेनाच चप्पल नक्की मी काढली कोठे. त्यावेळी आई मला फार ओरडली. त्या दिवसापासून बिना चापलीच फिरणं सुरू केलं. काय करणार चप्पल सारखीच हरवत होते ना, पण त्या कडक उनात कधी मला वाटलाच नाही की पाय पोलतायेत चप्पल घालावी.

माझं बालपण एका खेडे गावात गेलंय.गावासारखा गाव होतं आमचं. गावात लहानपणी मातीचेच रस्ते, मातीची घरं, गावात पार सर्व काही अनुभवलय.

Sakshi mahamuni ची आणखी पुस्तके

एक पुस्तक वाचा