रामायण
दशरथ राजाला कित्येक वर्ष मुल होत नव्हते. त्याच्या तीन राण्या होत्या, तिघीनाही नव्हते. एकेदिवशी काय होते दशरथ राजा राजा शिकारीला जातो. शिकारीला गेल्यावर नेहमीप्रमाणे शिकार करण्यासाठी बान मारतो, पण तो बाण चुकून एका मनुष्याला लागतो. त्या मनुष्याचा आवाज ऐकल्यावर दशरथ राजा पळत तिथे जिवाच्या आकांताने जातो बाण काढतो आणि विचारतो तू कोण आहेस कोठून आलास. त्यावेळी तो त्याची सर्व माहिती सांगतो. मी श्रावणबाळ यात्रे साठी निघालो होतो माझ्या आई - वडीलांना घेऊन तीर्थ यात्रेला चाललो होतो. माझ्या आई वडीलाना दोन पलक्यात त्यांना बसवले आहे ते दोघेही अंध आहेत. ते माझी वाट बघत असतील त्यांना पाणी आणायला आलो होतो, तो होता गुणी श्रावणबाळ. श्रावण बाळाने त्यांना सांगितले माझ्या आई वडिलांना तेवढे पाणी द्या. दशरथ राजा झालेल्या चुकीची क्षमा मागत होता. श्रावण बाळ त्यांना आई वडिलांना पाणी द्यायला सांगतो आणि प्राण सोडतो.
दशरथ राजाला वाईट वाटते त्याच्या आई वडीलांसमोर जयचीही लाज वाटते पण तो कसातरी जातो, त्याचे वडील म्हणतात आलास श्रावण बाळ किती वेळ लावलास. तेवढ्यात तो पाणी देतो पाणी दिल्या क्षणी ते म्हणतात तू गप्प का आहेस तू माझा श्रावणबाळ नाही. त्या वेळी दशरथ राजाला सगळं सांगावं लागत. चुकून याच्या हातून आपल्या मुलाला बाण लागला हे एकूण कोणते आईवडील दुःखी होणार नाहीत ते तिथेच दशरथ राजाला शाप देतात ज्या प्रमाणे आम्ही आमच्या पुत्रशिवय जीव सोडू तसाच तू पण तुझ्या मुलापासून दूर असताना तुझा प्राण जाईल.हा शाप देतात आणि ते अन्न पाणी त्याग करतात श्रावणबाळ चे आईवडील.