झुंज नियतीशी ते आणि त्यांचे ध्येय यांच्यामध्ये 'आव्हान' म्हणून जेव्हा नियती उभी राहिली तेव्हा..१७व्या शतकात भारतीय उपखंडात जणू अंधकारांचं साम्राज्य होंत.. क्रूर लढाया, अमानुष अत्याचार आणि धर्माच्या नावाखाली होणार संस्कृतीचा आणि अध्यात्माचा ऱ्हास यामुळे स्वाभिमान लयाला गेला होता, पण छत्रपती शिवाजी ह्या दृष्टाच्या लढवय्यांन हाच हरवलेला स्वाभिमान नव्यानं संपादित केला. आर्थिक समतेची आणि दुर्बलांच्या सक्षमीकरणाची मुहूर्तमेढ रोवली, नियतीनं छत्रपती शिवाजीची सत्वपरीक्षा पदोपदी घेतली. एकीकडे पराभूत झालेला, खचलेला बहुजन समाज; तर दुसरीकडे मुघलांचं शक्तिशाली साम्राज्य आणि त्यात पाश्चात्य शक्तींनी नौदलावर मिळवलेले सर्वाधिक अशा सर्व अंगांनी शिवाजी महाराजांपुढे आव्हानं आ वासून उभी होती, मग युगानुयुगे सर्वांत प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या भारतात परस्पर विरोधी विचारधारांचा, श्रद्धांचा आणि विभिन्न दृष्टिकोणाचा जणू संघर्षच पेटला. चला तर मग, या संघर्षमय गडद अंधारात लख्ख चकाकणाऱ्यां त्या विद्युल्लतेचा अनुभव घेऊ. आजही ती भारतीय उपखंडाला प्रकाशमान करत आहे.. तिचे प्रतिध्वनी इथल्या कानाकोपऱ्यांत आजही निनादताहेत! Read more
0 अनुयायी
3 पुस्तके