संध्याकाळ झाली होती. रायगाव गावात जल्लोषात क्रांतीची मिरवणूक सुरू होती. तालुक्याच्या गावापासून 4 किलोमीटरवर एक छोटं गाव होत. निसर्गाने नटलेलं.... त्याच छोट्या गावातली क्रांती आज महाराष्ट्रात नाव कमवत होती. क्रांती ओपन जीपच्या मध्ये उभी राहिली होती. पाराजवळ गाडी आली आणि चिनू पटकन गाडीमध्ये येऊन बसली. क्रांती तिच्याबरोबर बोलत नाही.
" ये तायडे रागवलीस? तुला म्हाईती हाय ना मला तुला कुस्ती खेळताना बघताना लय त्रास व्हतो म्हणून मी अली न्हाय." क्रांती तिच्याकडे बघत सुद्धा नव्हती.
" तायडे बोल ना ग... तू जिंकणार याची खात्री व्हती मला पण भीती वाटते खेळात जरी लागले तरी... प्लिज ग बोल की..."
क्रांतीने तिच्याकडे तिरक्या नजरेने बघितले. चिनूने तिला घट्ट मिठी मारली. क्रांतीचा सगळा राग चीनुकडे बघून गेला.
गावातल्या लोकांनी तिला हार घातले. गुलाल उधळत होता. आजूबाजूला ढोलताशांचा आवाज होता लोक लेझीम ढोल ताशांच्या तालावर नाचत होती. सगळीकडेच आनंदी आनंद होता. आता चिनूला काही रहावत नव्हते. गाडीतन चिनूने गाडीतून उडी मारली आणि ढोलताशांच्या आवाजांवर दनादन नाचायला सुरुवात केली. दादांनी चिनुकडे बघितलं गावातल्या एवढ्या मोठ्या लोकांसमोर ही पोरगी अशी कशी नाचती दादांना राग आला. दादांनी संतोषला खुणावले आणि संतोष पटकन चीनूकडे गेला आणि चिनूला थांबवलं चिन्ह ऐकतच नव्हती चिनू वेड्यासारखी नाचत होती. हात हलवत होती पाय हलवत होई. तीला इतका आनंद झाला होता तायडी जिंकली म्हणून. शेवटी संतोषने तिला हाताला धरले आणि गाडीत आणून बसवले आणि सांगितलं, "दादा चिडले आहेत चिनू उगच परत नाचायला जाऊ नकोस." गुलालात भरलेली चिनू गप्प बसली पण तिचा उत्साह मात्र काही कमी होत नव्हता तीने पुन्हा गाडीत नाचायला सुरुवात केली. तिच्याकडे बघून क्रांती हसायला लागली आणि तिला म्हणाली," बहुतेक आज माझा सोहळा आणि तू मार खाणारेस" "चालतय ताई तुझ्यासाठी तेवढं करिन मी, काय तुझा आनंद माझा आनंद मार खाल्ला त्याच्यात पण आनंद."
चिनू तशीच वेड्यासारखी नाचत होती. मिरवणूक घरापर्यंत आली आई ओवाळायचं ताट घेऊन उभीच होती. आईने डोक्यावरचा पदर नीट केला क्रांती गाडीतून खाली उतरली. तिच्याबरोबर चिनुसुद्धा खाली उतरली सगळेच जण थांबले. ढोलताशे काई थांबायचं नाव घेत नव्हतं सगळी मुलं बाळं सगळी नाचत होती क्रांती जिंकल्याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता त्यात राजवीर बरोबर जिंकली यामुळे गावात एक उधाण आलं होतं. आईने क्रांतीचे औक्षण केले तिच्या पायावर पाणी घातले. भाकरतुकडा ओवाळून बाजुला टाकला तिची दृष्ट काढली मायेनं डोक्यावरून हात फिरवला आणि कडकडून बोटंमोडली. "आणि कोणी उद्योग करायला सांगितलं होतं ग तुला त्या पोराबर कुस्ती खेळायला ?" आईने लटक्या रागाने तिच्याकडे बघितले पण आनंद या गोष्टीचा होता की आखाड्यात आज आपल्या पोरीनं पैलवानाला हरवलं. नावारूपाला आलेल्या पुरुष पैलवानाला हरवणं म्हंजी लय मोठी कर्तबगारी व्हती. गावात समदीकड पारावर, घरात, रानात, नदीवर जिकडंतिकडं क्रांतीचाच विषय व्हता.
॥
तायडे राजवीरच नाव ऐकलं व्हतस ना?" चिनूने
क्रांतीसोबत केळी खायला सुरुवात केली. " एकल व्हत पण आज बघितलं." क्रांतीच्या तोंडात
केळीचा तोबरा होता. ॥ 'बघितस लै भारी..." चिनू हसायला लागली.
माज व्हता त्याला तो उतरवला फकस्त बाकी काय न्हाय... मला त्याच्या चेहऱ्यावर मग्रुरी दिसली. समद्या राज्यात तो एकटा असा पैलवान हाय जो कुणालाच हरू शकत न्हाय अस त्याला वाटत व्हत. मग आपली सनकलीच... आज ह्याला सोडायचा न्हाय असा ठरवलं... जे व्हायचं ते होऊ दे..." क्रांतीच्या नाकाच्या पाळ्या फुगल्या व्हत्या. ॥ आन हरली असतीस तर???" चिनूने तिला डिवचले. 'हरली असती तर त्याला चॅलेंज करणारी मी हाय हे तरी कळलं असत त्याला..." क्रांतीच्या डोळ्यासमोर राजवीरचा रागाने लाल झालेला चेहरा आला. आखाड्यातन ताडकण उठून रागाने गेलेला राजवीर तिला आठवला. ॥
कुरुंगुट गावात ढोल ताश्यांचे आवाज घुमत व्हते. पण लो
क वाजवायचे म्हणून वाजवत होते. कारण नेहमीसारखा उत्साह त्यांच्यात नव्हता. राजवीला ढोल ताश्यांचे आवाज असह्य होत होते. राजवीर तडक घरी आला व्हता. संग्रामला त्याने मिरवणूक काढायची न्हाय अस बजावलं होत. थोड्या वेळात आवाज बँड झाला. वाड्यात शांतता पसरली होती. तशी गावात सुद्धा. राजवीरची आई आणि वहिनी त्याच्या औक्षणासाठी दारात थांबली होती. राजवीर आला आणि कोणासोबत काहीही न बोलता वाड्यातल्या त्याच्या खोलीत गेला. संग्राम पाठो पाठ आला. आईने संग्रामला थांबवून विचारले. 'वीर जिकलाय नव्ह ...? "
'व्हय.." संग्राम
आई, "मग वीरला झालं काय?" घरात सगळे त्याला वीर म्हणत असत. संग्रामने तेजश्रीकडे पाहिले. तेजश्रीने डोक्यावरचा पदर नीट केला आणि नजर
खाली केली. संग्राम, आई त्याचा अपमान झालाय म्हण तो चिडलाय."
॥ आई जिकायच्या आनंदात वीरने सगळ्या पैलवानांना परत कुस्ती खेळायला आवाहन केलं. कुणीच तयार व्हायना.. पण..."
आई, "पण काय... संग्राम सांगा अमास्नी.." संग्राम, "रायगावच्या पैलवान पोरगी त्याच्याबरोबर कुस्ती खेळायला तयार झाली आणि जिंकली. आई, " त्याला कितीवेळा सांगितल. अहंकार चांगला नव्ह... त्याच आबाच त्याला समजवून सांगतील. पण राग काय लवकर कमी व्हनार न्हाय त्याच्या
मनातला..." आई त्याचा राग शांत झाला की तो यील खाली.
आन आबा बोलतील त्याच्याशी... आम्हांसनी चापाहीजेल. मिळाला तर बरं व्हईल." तेजश्री स्वयंपाक घरात जायला निघाली.
"आई फळकवणी नको म्हणावं जर आलं बिल घालून द्या." तेजश्री थांबली आणि पटकन आत गेली. तेवढ्यात आबा आले.
"सुलोचनाबाई लेकरू दुखावलं हाय व्हइल शांत जरा टाइम ठेवू त्याला." आबांनी डोक्यावरचा फेटा काढला आणि सुलोचनाबाईकडे दिला. तेजश्री चहा घेऊन आली आणि सगळ्यांना दिला.
॥ सुनबाई अहो तुम्ही कशापायी चा केला रखमाबाई न्हाईत का?" आबा
हयात पण ..." तेजश्री
पण आम्हांसनी पाहिजे व्हता महान त्यांना सांगितलं करायला." चहाचा एक पुरका मारून संग्राम बोलला.
हाताच्या मुठी आवळत वीर तसाच गादीवर कितीतरी वेळ अडयाकडे बघत पुन्हा पुन्हा क्रांती बरोबरची कुस्ती आठवत होता. अस काय झालं की ह्या पोरीबरोबर मी हरलो. न्हाय अस न्हाय व्हायला पाहीजेल व्हत. आमच्यावर लोक हस्त्यात बघितलं आम्ही... तिचा माज आम्ही उतरवनारकायपण झालं तरी. डोक्याचं दही झालाय..." वीरने डोळे मिटले. डोळ्यांवरून हात फिरवत उठला आणि शर्ट काढला त्याचे पिळदार शरीर आरश्यात न्याहाळले.
हे शरीर कमावलं ते पोरीकडून हारायला... न्हाय न्हाय... हे शक्य न्हाय..." त्याने त्याचा हात आरशावर आपटला. एक क्षणात आरश्याच तुकडा जमिनीवर खळकन पडले. हातातून रक्त व्हायला लागले. आवाज ऐकून सगळे पळत वरती आले. वीर ची अवस्थाबघून सगळ्यांना वाईट वाटले.
॥ आर हा काय यडेपणा हाय वीर..." आईने त्याचा हात हातात घेतला. तेजश्री ज बाई हळद अन कापड ." आई ने ऑर्डर सोडली तसे तेजश्रीपळत आन..." खाली गेली. हळद आणि रुमाल घेऊन आली. आबा फक्त वीरकडे बघत होते. संग्रामने त्याचा हात हातामध्ये पकडला होता. हातामधून टपटप रक्त सांडत होते. त्याच्या हाताला हळद लावली आणि रुमाल बांधला.आबांनी सगळ्यांना जायला सांगितले. सगळे गेल्यावर आबांनी त्याच्या दंडावर थोपटले.
॥ पोरीकडून हारलास म्हणून वाईट वाटतंय का हारालास म्हणून... आर माझ्या पैलवाना तू ह्याचा इचार कर की जवापसन तू आखाड्यात उभा राहिलास तवापसन एकदा बी हरला न्हाईस मग आज त्या पोरीबर कसा हारालास??? कारण आजवर कुठल्या पोरीकड नजर वर करून बघितलं न्हाईस हात लावायची तर लांबची गोष्ट... पोरीला हात कसा लावायचा ह्या ईचारात व्हतास तोच तीन तुला हरवलं..."
आबा बोलत होते आणि वीर ला ते पटत होते. "तिला कसा अन कुठं हात लावायचा याच ईचारात व्हतो मी... न्हायतर मी हरलो असतो???" वीर स्वतःसोबत बोलत होता.
"चला कळलं न्हवं तुमचा वेळ घ्या तुम्ही अन ह्यातून लवकर भायर पडा..." वीरन मान हलवली. आबा बाहेर गेले. वीर उठला आणि मळ्यात जाऊन बसला. खूप वेळ शांत बसल्यावर त्याला बर वाटल. कितीतरी वेळ तो पाटातून वळणावळणाने वाहणाऱ्या पाण्याकड बघत बसला होता. तेवढ्यात भूषण माहे येऊन उ
भा राहिला.
॥ कसला इचार करताय पैलवान... प्रेमात तर न्हाय ना पडला त्या पोरीच्या...?" भूषण हसत त्याच्याजवळ बसला.