भूषण आल्यावर वीरची तंद्री तुटली. भूषण लहानपानापासूनचा वीर आणि भूषण एकमेकांचे खास मित्र... भूषण मध्यमवर्गीय कुटुंबातला होता. वीरच्या घरच्यांना त्यांची मैत्री आवडत नव्हती. मैत्री बरोबरच्या लोकांबरोबर असावं असं त्याच्या घरच्यांचं म्हणणं होत. दोस्ती श्रीमंत गरीब असा भेदभाव करत नाही. कोणताही छोटा मोठा प्रॉब्लेम आला कि भूषणसाठी वीर असायचा अन वीरसाठी भूषण .... गावात त्यांची दोस्ती आवडायची. वीर काही वर्ष कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी वीर बाहेर होता तेवढेच दोघे वेगळे. भूषण गरीब असला तरी मानी होता. दोस्ती पैशासाठी नाही तर एकमेकांची सुख दुःख वाटून घेण्यासाठी असते. भूषण त्याच्या आई आणि बहिणीसोबत राहत होता. भूषणला शिकायचे होते पण वडील गेल्यानंतर घरातली जबाबदारी त्याच्यावर पण वडील गेल्यानंतर घरातली जबाबदारी त्याच्यावर पडली म्हणून त्याने शेती करायचं ठरवले आणि आधुनिक पद्धतीने शेती करु लागला. वीरला त्याचा निर्णय आवडला होता.
॥ त्या पोरीच्या प्रेमात... भूषन्या लेका तोंड सांभाळून बोल लेका... मी लग्न करीन पण आबा सांगत्याल त्याच पोरीबर... अन ही आजची पोरगी व्हती म्हणून जिकली... न्हायतर..." वीरने त्याच्या हाताच्या मुठी आवळल्या.
"काय लेका... मला ठाव हाय माझा पैलवान असा हरणार न्हाय... तुला ठाव हाय मग कशापायी लोड घेतुयास..." भूषण
लोड घेऊ नको तर काय करू भूषन्या... लोक तोंड काढू द्यायनात भायर..." तेवढ्यात शेतातन खालच्या आळीचा अशोक येताना दिसला. वीरला बघितलं अन पोट धरून हसायला लागला. त्यांच्या जवळ जाऊन दात काढून हसत व्हता.
अशक्या... येडा झालास काय ??? उगाच काय हस्तुयास..." भूषण म्हणाला. वीरला कळत होते तो का हसतोय ते. तो जागेवरून जोरात उठला. भूषणने त्याला मागे ओढले. "अय... अय अंगावर न्हाय यायचं... मला ठाव हाय तू पोरांना लोळवशील पर त्या पोरीन..." परत अशक्या हसायला लागला.
अशक्या लेका उगाच मर खाशील पळ हितन..... आत्ता धरलाय मी वीरला..." भूषणने अजून जोरात वीरचा हात धरला.
"हा काय मला मारतोय... हा स्वतःच मार खावून आलाय..." अशोक तसाच परत जोरात हसायला लागला.
वीरचा हात भूषण सोडला. "मर मग तूला लय मस्ती हाय ..... " वीर त्याला पकडणार तेवढ्यात अशक्या पळाला. त्याच्या मग वीर आणि वीरचा माग भूषण... वीर रागाने लाल झाला व्हता. वेड्यासारखा अशक्याच्या माग पळत होता. अशक्या कुठं सटकला हे दोन मिनिटं भूषणला सुद्धा कळले नाही आणि वीरलाही.
॥ पैलवान तुम्ही मनानं लय दुखावलाय. या बसा हित..." नदीच्या काठावर दोघासुद्धा पुन्हा बसली. वीरचा डोळ्यासमोरुन क्रांतीचा चेहरा गेला.
"मला वाटलं नव्हतं भुषण्या एक पोरगी अचानक माझ्या समोर उभी राहील अन सहज माझा अपमान करून निघून जाईल." वीर
"त्यात कसला आलाय अपमान? हार जीत सगळ्यात असते." भूषणने त्याला समजवले.
"हार जीत असते पण हि दुखावणारी हाय... मी हरलो भुषण्या" वीर शांत झाला.
इतकच सांगेन रागाच्या भरात वाईट इचार करू नकोस... जे होत त चांगल्यासाठी... तुला कुस्ती येते पण तुझा अहंकार वाढत चालला होता. अहंकार वाढला कि तो कधी न कधी खाली येतोच आणि तेच तुझ्याबर झालं. त्या पोरीचा दोष न्हवता. दोष तुझ्या वाढणाऱ्या अहंकाराचा होता. तू माणूस वाईट न्हाईस. फकस्त यात अडकून पडू नकोस." भूषण बोलत होता आणि वीर शांतपणे ऐकत होता. त्याने मान डोलावली.
"झालास शांत...? निघायचं ?" भूषण
"तू जा मी जरा वेळ बसतो." भूषणला समजले कि याला एकांताची गरज आहे. भूषणने त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि निघून गेला. "क्रांती सगळं भरलं नव्ह. बदाम, काजू, पिस्त...? आई क्रांतीला बॅग भरायला मदत करत व्हती.
" हो ग आई सगळं भरलं. अन नवीन ठिकाणी जाणार तिकड सगळं असत ग..." क्रांती.
"तुझ्या दादांना काय खूळ भरलंय काय म्हाईत लग्नाचं वय झालं पोरीचं अन कुस्तीत मोठं नाव करायचं त्यांना... घरापासन एवढ्या लांब धाडत्यात लेकीला माझ्या.. आव तुमच्याशिवाय ती कुठं गेली सुद्धा न्हाय अन दिल्लीला की पाठवाया लागलाय तुम्ही तिला ? हरितात्या शिकवत्यात नव्ह तिला सगळं." आईच एकून चिनू आणि क्रांती हसायला लागल्या. तेवढ्यात दादा आले. डोक्यावर टोपी आणि डोक्याला अष्टगंध अबीर लावलेला हसतमुख चेहरा. गळ्यातला नारंगी पंचा काढला आणि खाली बसले.
"लेक टीव्हीवर दिसलन तवा सगळ्या गावात सांगत सुटलं माझी लेक माझी लेक म्हण... थोडं मन घट्ट करा... काय...?" आई जरा शांत बसली.
"विशीच्या घरात आली पोरगी पोर बाळ कधी व्हनार ? विशीत मला मला संत्या अन क्रांती झाली सुद्धा व्हती." चिन ख ख करून हसायला लागली. सुद्धा व्हती." चिनू खु खु करून हसायला लागली. तेवढ्यात संतोष आला.
"संध्याकाळी सहाची ट्रेन हाय... हितन आपल्याला तीन वाजता तरी निघालं पाहिजे. क्रांते जेवण बिवन दाबुन कर. तस आई अजून बांधून देईलच डब्बा ." संतोष घाई घाईत म्हणाला.
दादा झालाय माझं सगळं. फकस्त जेवते अन निघू." क्रांती.
"असं
कस निघायचं? देवळात जाऊन
विठुरायाचदर्शन घिवूनच निघायचं म्हंजी पुढची सगळं काम मार्गी लागत्यात." दादांनी इथूनच नमस्कार करत म्हणाले.
हो दादा जाणार कि..." क्रांती म्हणाली.
क्रांती ह्या वर्षी नॅशनल ला उतरणार होती. त्यासाठी तीला ट्रेनिंगसाठी दिल्लीला जायचं होत. तिच्यासोबत रत्नासुद्धा जाणार
होती. त्याचीच सगळे तयारी करत होते.
वीर नदीच्या पाण्यात दगड टाकत होता. त्याला मैदानावरची कुस्ती आठवत होती. रागाने लाल झालेला क्रांतीचा चेहरा आठवत होता. हात मिळवत कधी तिने कमरेत हात घालून खाली पाडल मला सुद्धा कळलं न्हाय. बराच वेळ झटपट केली प तिच्या हाताचा तिडा सुटता सुटत नव्हता. आपण कस हरलो हेसुद्धा त्याला समजत नव्हते. त्याला एवढं आठवत होत कोणीतरी माणूस संग्राम दादाला म्हणत होता. "साहेब पैलवानाला गाडी मागावा... दवाखान्यात न्हायची गरज न्हाय पण लागलाय लै..."
त्याने विचार करत हातातला दगड पाण्यात भिरकावला आणि वाड्याकडं गेला.
वाड्यात गावातली बरीच मंडळी बसली होती. आबांनी वीरला बघितलं. आणि हाक मारली.
"पैलवान या तुमचीच वाट बघत व्हतो. हि मंडळी आल्यात पारगाव वरन त्यांच्या पोरीच स्थळ तुमच्यासाठी घिऊन आबांनी मिश्यांचा आकडा पिळला.
"पोरगी शिकलेली हाय, नोकरी करती. पण पावन म्हणत्यात ती लगीन झाल्यावर नोकरी करायची नाय." संग्राम म्हणाला.
"आबा आमास्नी यांच्या पोरीबर लग्न न्हाय करायचं. आम्हास्नी तुमच्याशी बोलायच हाय." वीर म्हणाला तस सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागले. आबा जागचे उठले. त्यांनी हात जोडले. "माफ करा पावन. आमच्या लेकाच्या मनात कायतरी येगळं दिसतयं." सगळे निघून गेले. संग्राम त्यांना सोडवायला बाहेर गेला. आबाच्या समोर आता वीर बसला होता.