सह्याद्रि पसरला जिथे शेषासम गिरी ||
दौलत घेऊनि सत्ताविस गड शिरी ||
भेसूर कड्यावर बुरूज पहारेकरी ||
ताड,माड सागाची झाडे त्यांच्या शेजारी ||
कळकिचे बेट आकाशात झुंकाड्या मारी ||
करवंदी, बाभळी आणि बोरी, चिल्लार कठिण काटेरी ||
खाली सुपिक शेती जमिन काळजापरी ||
महाराष्ट्राची ती शेतसरी, सुवर्ण आणि भूवरी ||
कापूस, उस, गुळभेंडी, तूर, तिळ, हवरी ||
काराळा, फुले गोजिरी, उधळून महाराष्ट्रावरी ||
राज्याचे तोंब पुढे लवून मुजरा करी