आई देवाला साकडं घालशील का?
एकतरी गाऱ्हाणं करशील ना
त्याला तू एक सांगशील का?
माझ्यासाठी ताई मागशील ना
तिला हे जग दावशील का?
माझ्या राखीसाठी तिला आणशील ना
माझ्यासारखं तिला खेळावशील का?
जगण्याची आशा तीला लावशील ना
तिला माझ्यासारखे हक्क देशील का?
माझ्यासारखं तिला रागवशील ना
माझ्या पेक्षा तिला शिकवशील का?
मोठा भाऊ मला बनवशील ना
मला पाकिटाचा खर्च देशील का?
तिच्या हट्टाची गाडी ढकलशील ना
थकल्यावर तिलाच बोलावशील का?
आता तरी तिच्यासाठी मला हसवशील ना
-प्रिती चव्हाण