सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?
खर सांग आई मला ते तुला दिसतात का?
खर सांगा तुम्ही मला त्यांच्याकडे मागतात का?
माझ्यासाठी ते तुम्हाला वाट पहायला लावतात ना!
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?
आयुष्यातील पाहिलं पाउल टाकताना
ते मला तुमच्या कुशीत सोडतात का?
झोपताना तुमच्या रुपात तेच मला भेटतात ना
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?
बाबांच्या खांद्यावर खेळताना
तेच मला सावरतात का?
हळूहळू चालताना, छोट्या छोट्या पावलांनी
तेच मला झेलतात ना
चिऊ काऊ मध्ये ते मला दिसतात का?
रोज रोजचे चॉकलेट बिस्कीट तेच मला देतात ना
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?
हट्टाच्या गाडीला चाके त्यांचीच चालतात का?
रुळावरून घसरल्यावर तेच मला रागवतात ना
सांग सांग आई मला देवबाप्पा असतात का?
आयुष्याच्या शेवटी तेच मला तुमच्याकडून
हिसकून घेतात का?
शेवटी ते तुम्हाला दुखच देतात ना
,आता तरी खर सांग आई मला देवबाप्पा असतात का?
- प्रिती चव्हाण