संसाराची गाडी ओढत असताना
रडू येते तिला
पण ती हसतच जिरवते
बालपणी इतिहास घडवण्याची जिद्द
तरुणपणी भविष्याच्या भीतीने ती घाबरतच जाते
पंखात बळ आले की
ती पिंजऱ्यात अडकतच जाते
नवीन स्वप्ने रंगवायची तेव्हा
ती जुन्या आठवणी गाढतच जाते
आयुष्याचा दिवस सरताना
ती नवीन नाते विनातच जाते
बचतीची सवय लावताना
आयुष्यातील आनंद ती विसरतच जाते
पोराबाळांच्या सुखासाठी लढताना
ती जगण्याच भान विसरून
मारण्याच सरन रचतच जाते
लेकराची साद कानावर पडताच
ती धावत सुटते
काळजीने ते काळीज
तिच्या हृदयाच्या ठोक्याप्रमाणे धडधडत राहते
मरण्याआधी तेराव्याची वाट पहाताना
ती जगतच असे जाते
जगतच असे जाते
- प्रिती चव्हाण