shabd-logo

आपलाच संवाद आपुल्याशी

27 February 2023

11 पाहिले 11

सज्जन आणि दुर्जन

जगात सज्जन आणि दुर्जन अशी दोनच प्रकारची माणसं राहतात.सज्जनचा सदैव दुर्जनाशी संघर्ष असतो.प्रत्येकाला आपण सज्जनच असावं असं वाटतं.दुर्जन तर कुणालाच व्हायचं नसतं.उलट आपण दुष्टं किंवा दुर्जन असू नाही किंवा तसं कुणी समजू नाही असा प्रत्येकाचा अटृटाहास असतो.आपल्या  दुर्जनत्वाचं प्रदर्शन करावं असं कुणालाचं वाटतं नाही.दुर्जनत्व लपवून ठेवण्याचा अटोकाट प्रयत्न माणूस करत असतो. त्यामुळे सज्जन असण्याचा  आवं चेह-यावर पसरून माणसं वावरत असतात.

आपण किती शहाणे आहोत हे दाखवण्यासाठी  जशी माणसं झगडतात तशीच आपण किती सज्जन आहोत याचा ही 'शो ' माणसं जिथं तिथं करतच असतात.अनेकदा सज्जनतेचे सोहळे साजरे होताना आपण पहातोच असतो.

सुगंध जसा शपथ घेऊन सांगावा लागतं नाही.तो आपोआपच जाहिर होत असतो.तसंच दुर्गंध दडवून नाही ठेवता येत.तो कुणालाच हवा नसतो पण तो बाहेर पसरतोचं. अनेकदा आपल्याला दुर्गंध सहनच करावा लागतो.आपण सज्जन असावा असं वाटणं व किंवा तसा आव आणणं आपण समजू शकतो.कुणी सज्जन असू नाही किंवा

कुणी अधिक सज्जन होत असेल अथवा तसा कुणी प्रयत्न करत असेल तर काही लोकांना रूचत नाही.त्याला दुर्जन ठरवण्याचा काही लोक चंगच बांधत असतात.त्याचं दुष्टत्व  ढोल वाजवून सांगितलं जातं.

सहसा कुणी कुणाच्या  सज्जनतेचा स्विकार करत नाही. त्यामुळेच अनेक साधू संतांना पिडा देण्यात हे जग पुढे आहे.इतिहास अश्या संघर्षाच्या  कथाच तर असतात.सज्जनतेचा विजय होतो असा इतिहास सदैव सांगतो.कथा ,कांदब-या, चित्रपटातून ही  सज्जनतेचा विजय होतो असंचं दाखवतात. प्रत्येकाला तेच तर  हवं असतं.

प्रत्येकालाचं सज्जनच व्हायचं असून ही दुर्जनांची संख्या या जगात का जास्त आहे?असा प्रश्न  तुम्हाला ही पडलाचं आसेल.वास्तव तसं असतं नाही.या जगात सज्जनांची संख्या जास्तच आहे.दुस-याचं सज्जनत्व स्विकारणं बहुतेक लोकांना जमतंचं असं नाही.

दुस-याला सज्जन समजणं  हे पण सज्जन असण्याचं  मुख्य लक्षण आहे.तुम्हाला कुणी सज्जन समजत नसले तरी आपण प्रत्येकाला सज्जन समजणं आवश्यक आहे.दुष्टांना पण इज्जत देणं सोपं नाही पण सज्जनांची संख्या वाढवण्यासाठी आज पासून आपण ते सुरू करू.मग ?

सुप्रभात

परशुराम सोंडगे

||Youtuber||Blogger||

परशुराम सोंडगे ची आणखी पुस्तके

1

आपलाच संवाद आपुल्याशी

27 February 2023
1
0
0

सज्जन आणि दुर्जन जगात सज्जन आणि दुर्जन अशी दोनच प्रकारची माणसं राहतात.सज्जनचा सदैव दुर्जनाशी संघर्ष असतो.प्रत्येकाला आपण सज्जनच असावं असं वाटतं.दुर्जन तर कुणालाच व्हायचं नसतं.उलट आपण दुष्टं किंवा दुर

2

नशिबाचे रडगाणे का गाययचं?

20 May 2023
0
0
0

मराठी पुस्तके, मराठी सुविचार   माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.असं अनेक जण समजतात.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते.

3

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?

8 July 2023
0
0
0

हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय? पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत

4

पक्ष फुटी ,सदू आणि बंडया

12 July 2023
0
1
0

पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो... बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी

---

एक पुस्तक वाचा