हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय? पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत्तर मिळवण्यासाठी कमीत कमी वर्ष भरी तरी महाराष्ट्राला वाट पहावी लागेल.शिवसेना कुणाची या प्रश्नांच उत्तर अजून ही महाराष्ट्राला मिळाल नाही.ते मिळेलंच असं ही नाही.तो वरचं राष्ट्रवादी पक्ष कुणाचा हा प्रश्न महाराष्ट्राच्या मानगुटीवर ठेवण्यात आला आहे. काही प्रश्न कायम प्रश्नच राहतात.नव्या प्रश्नाला जन्म देतात. माणसं बारा बापाचे नसतात पण प्रश्न बाराचंचे काय शंभर बापाचेचं पण असतात.
या महाराष्ट्रात मडकी फुटावीत तशी फटाफट पक्ष कसे काय फुटतात? एवढी प्रचंड गद्दारी कशी काय होते?कोण गद्दार ? कोण खुद्दार ?असे प्रश्न मेंदूचा पार भूगा करत आहेत.चक्क वाघाची शिकार हरणं कशी काय करतात? सध्या महाराष्ट्रात काही घडू शकतं?तुम्हाला हरिण वाघाच्या बछड्याला दूध-भात भरवताना लाईव्ह दृश्यं दाखवलं तर तुमचं कसं होईल? कल्पना करा.नुसता आश्चर्याचा धक्का नाहीतर सरप्राइजचा बाॅम्ब अंगावर पडल्यासारखं वाटेल?सध्या अश्याच आश्चर्याच्या प्रलयात गुदमरतो अख्खा महाराष्ट्र.टीव्ही पुढं तास तास बसून ही उत्तर सापडत नाही.या पापाचा बाप ही....ठरवता येत नाही.
महाराष्टात चाललं ते काय चाललयं? हे असलं भयंकर राजकारण कसं असेल? छे..? हे बहूढंगी बहुरंगी नाटय रंगलेले आहे.एक एक अंक सादर होतो आहे. भंयकर मेहनत घेऊन पडद्या मागे तालिम केली जाते आहे .विधनाभवनाच्माया मंचावर माय बाप जनतेला नुसते सप्राईजचे शाॅक दिले जातं आहेतं. एखाद्याची पोरगी पळून जाणं ही मोठी चटकदार बातमी असते त्यात ती पोरगी खानदानी असेल तर?मग तर काय? चटकदार भेळी पेक्षा भारी काम असतं? पोरगी पळून जाणं ही फार वाईट गोष्टं असते. कुणाची का असेना. प्रंचड सहानुभूती आपली त्या मुलीच्या आई वडीलाबाबत असते तरी गल्लीत,गावात दबक्या आवाजात चविष्ट चर्चा रंगतात.ऐकायला सांगायला बरं वाटतं. रोमांचक स्टोरी ऐकायला पहायला भारी मज्जा येते लोकांना.त्या खानदानी घराण्याच्या अब्रुचं फार खोबरं झालं तरी लोकांना त्याचं फार देणं नसतं.सर्वांनाच मज्जा घ्यायची असते. त्यात एक थ्रिलर दिलेलं असतं. ते हवं असतं सर्वांना .किती ही सहानुभूती असली तरी रोमांचक स्टोरीतील पुढच्या अंकाची उत्सुकता असते. आता पुढे काय? ही उत्कंठाच खरी मज्जा देते.महाराष्ट्र सध्या हीच मज्जा घेतोय.या नाटकाला अजून एक ग्रेड कुणीच दिला नाही.त्यामुळे लहान थोर सारेच मज्जा घेत आहेत?
तुम्ही दोन कोंबड्यांची झुंज पाहिली का?ते कोंबडे रक्तबंबाळ जरी झाले तरी कोण जिंकणार आहे हे आपल्याला पाहायचं असतं. किंवा बाॅक्संसिंगचा खेळ ?स्पेन्स फार क्रुर असतो.त्याला दया माया नसते.झुंज लावणारे क्रुर व झुंजीची मज्जा लुटणारे हे क्रुर असतात हे मान्य केलं तरी खेळं तर हवाच असतो ना ?आपण भावूक होऊ नाही. कशाला टेन्शन घ्यायचं? तुम्हाला हे सारं पाहून लोकशाही बाबत टेन्शन आलं असेल.जनरली ते कुणाला ही येऊ शकतं.तसचं सारं चालू आहे हे.पण करणार काय तुम्ही ?
ते राज्य चालवत आहेत की राजकारण खेळतं आहेत? राजकारणाचा खेळ खेळत आहेत. त्यांचा खेळ आपण एन्जॉय केला पाहिजे .आपला मेंदू का तापून घ्यावा? खरं तर राजकरणात विचार तत्व वगैरे ची अजिबात गरज नसते. तशी नाटक रंगवता आली पाहिजेत.लोकापुढे जे भासाचं नवं जग उभे करू शकतात तेच उत्तम अभिनेते होऊ शकता.लोक त्याना नेता मानू लागतात.एकदा का नेता म्हणून तुम्हाला लोकांनी मान्य केलं की ते राजकारण खेळायला मोकळे.
तुळशीची माळ घातली की मांसाहारी केला जात नाही.काही ढोंगी माळक-याची गोष्टं आम्हाला नेहमी सांगितली जायची. माळ खुंटीला टांगून येथेष्ट मटनावर ताव मारून ढोंगी माळकरी साळसुदपणे भजन म्हणत असतं.त्या दांभिक माळक-यात आणि राजकारणी नेत्यांत फारसा फरक नसतो.
तो मी नव्हेच या नाटकाचा अंक पण ते छान रंगवू शकतात. आपण निष्ठा, प्रामाणिकपणा तत्वज्ञानात गुरफटून गेलो तर त्यांच्या या नाटकाची मज्जा कशी घेणार? ते जसं सारं गुंडाळून सावपणासाठी घसा फोड करत राहतात तसं आपण सारं खुंटीला टांगायचं? जमलं तर घ्यायचा ताव मारून.
मित्र ह़ो,राजकारण एक खेळ समजा नाही तर बहुरंगी बहुढंगी नाटक समजा....आनंद भेटेल. फार गंभीर विचार करायचा विषयाचं राहिला नाही राजकारण.अंधभक्त,मावळे,पाईक,निष्ठावंत,कट्टर खंदे समर्थक यां सर्वांना सांगायचं.फार गंभीर वैगरे होऊ नका. तुम्ही तुमचं रक्त तापू नका.आमचं ही. हे सारं राजकारण एन्जॉय करा...अंक तिसरा....लवकरच सादर होतोय...
नाटक...नाटक..नाटिका..नाट्य पुष्पं....
जीव मुठीत घेऊन बसा.
परशुराम सोंडगे,बीड