shabd-logo

नशिबाचे रडगाणे का गाययचं?

20 May 2023

13 पाहिले 13

मराठी पुस्तके, मराठी सुविचार 

article-image


 माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.असं अनेक जण समजतात.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते. ती आपलं नशिब आपल्या कपाळावर कोरून जाते.तिनं लिहिलं कुणीचं बदलू शकत नाही. हे पटवून देण्यासाठी ती अनेक गोष्टी सांगत असे.त्या गोष्टी  छान असतं.नेमकं सटईने आपल्या कपाळावर काय लिहून ठेवलं आहे हे आरश्यात आम्ही कपाळ न्याहाळत बसतं असतं.नशिबाचे शिलालेख वाचण्यासाठी धडपडत असतं. माणसांना ते दिसतं नाही.

              नशिब सा-यांनाच असतं.ते मागील जन्माच्या तुमच्या पाप पुण्यावर ते अंवलंबून असतं.त्याला प्रारब्ध असं ही म्हणतात.प्रारब्ध बदलता येत नाही. पुढे काय घडणार आहे याचा एक प्लॅनच तयार असतो.ज्योतिषशास्त्र याचं गोष्टीवर अवलंबून असतं.थोडक्यात ज्योतिषी तो प्लॅन समजून घेतात. लोकांना सांगतात.आपलं पोट भरून घेतात.तुमचा विश्वास आहे या गोष्टींवर ?

तुम्ही विश्वास ठेवा अथवा न ठेवता हे घडतं असतं.जे मी घडतं असतं ते माणसाच्या हातात नसतं.भुतकाळ आता लिहून ठेवता येतो. त्यालाचं आपण इतिहास म्हणतो.आठवणींच्या रूपात तो मनात साठवून ठेवलेला असत़ो.भविष्यकाळ आपल्याला कळतं नाही.तिन्ही काळाच ज्ञान असलेला फक्त एकचं देव आहे.सर्वज्ञ भगवान परमात्मा.

  योगायोग तर माणसाच्या आयुष्यात घडतं असतात.कर्मधर्मसंयोग म्हणजे तर नशिबचं असतं,ना? नशिब म्हणा किंवा योगायोग म्हणा जे घडतं असतं ते  आपल्या हातात नसतं.

                 आता ,बघा ना, पाऊसाचे थेंब आकाशातून पडत राहतात.काही गुलाबाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांवर पडतात.कोवळया उन्हात फुलांच्या कुशीत हसतं राहतात.कुणी चातकाच्या चोचीत पडतात. त्याला तृप्त करतात.कुणी तप्त मातीची तहान भागवतात.कुणी हागणदारीत पडतात.कुणी शिंपल्यात पडून मोती होतात.

        तसचं फुलांचं पण आहे.कुणी देवाच्या पायी,कुणी प्रेताच्या अंगावर ,कुणी एखादं सुंदरीच्या केसात गजरा होऊन हसणं राहतं.एखादंला हाव-या माणसाच्या शेंबड्या नाकात ही हुंगलं जावं लागतं.

आपण कसे वापरले जावं हे काही फुलांच्या  हाती नसतं.नशिबवान कुत्री मर्सिडीज गाडीतून फिरताना पाहिलीच असतील.दारोदार हिंडणारी कुत्री आणि माणसं ही असतातच की.योगायोग म्हणा किंवा नशिब म्हणा.हे घडतं असतं.अनेक मूर्ख चांगल्या खूर्च्या बळकावतात. तसेच अनेक तज्ञ खितपत पडतात.दोन घासासाठी अपार कष्ट करावं लागतं.ताटला लाथ मारणारी माणसं आहेत. चव भुकेत असते. अन्नात नाही. काहीचं गोड न लागणारी माणसं ही असतातच की.


article-image


अनेक गोष्टीला आपण व्यवस्थेला दोष देत राहतो. रेल्वेचा अपघात झाला रेल्वे प्रशासन आपल्या ऐरणीवर असतं.संसार नीट चालत नाही आपला डायरेक्ट विवाह संस्थेवरच आक्रमण असतं.लफडी झाली तरी आपण पोर्न साईटवर बंदी आणण्याची मागणी करतो.पूर्वी हे सारी खापरं आपण नशिबाच्या डोक्यावर फोडून मोकळे व्हायचो.नशिबाच्या नाववर अनेक अपयश पचवायची सवय आहे माणसाला.अर्थात यशाचं श्रेयं हे माणस स्वतः च्या प्रयत्नाला देतात. दुस-याचं यशाचं श्रेय आपण नशिबाला देत असतो.नशिब माणसाच्या सोबतीला कायम राहिलेले आहे.निर्माता कायम या जगात विषमतेचे बीज पेरत आला आहे.वर्ण,लिंग ,शरीर, प्रदेश, बुध्दी, सौंदर्य अश्या अनेक बाबतीत माणसा मध्ये भेद केले आहेत.नशेत पबमध्ये नाचणारी धुंद माणसं आणि दोन घासांसाठी तडफडणारे माणसं याच जगात राहतात. माणसं समतेची हाक देतात पण सर्वत्र विषमतेचे राज्य आहे.

ठेवीले अंनते तैसेचि राहवे|चि

त्ती असू द्यावे् समाधान||हा अभंग पाठ करूभरठी सुविचार न ठेवला की दु:खात ही आनंद शोधण्याचं बळ येतं. सा-याचं गोष्टी नशिबाच्या हवाली करतात माणसं.प्रयत्न संपलं की नशिबच येत पुढे.ते ब-याचदा सोयीचं असतं.

प्रयत्न असेल किंवा नशिब असेल,योगायोग असेल चित्त समाधानी ठेवा असा सल्ला तुकोबांचा आहे.कर्मवादावर व प्रयत्नवादावर काथ्याकुट करीत बसण्यापेक्षा चित्ताचं समाधान महत्वाचं आहे.हे सोप काम नाही.

चित्ती समाधान....एकचं ध्येय.

सुप्रभात

     परशुराम सोंडगे

   ||Youtuber|| Blogger||़

परशुराम सोंडगे ची आणखी पुस्तके

1

आपलाच संवाद आपुल्याशी

27 February 2023
1
0
0

सज्जन आणि दुर्जन जगात सज्जन आणि दुर्जन अशी दोनच प्रकारची माणसं राहतात.सज्जनचा सदैव दुर्जनाशी संघर्ष असतो.प्रत्येकाला आपण सज्जनच असावं असं वाटतं.दुर्जन तर कुणालाच व्हायचं नसतं.उलट आपण दुष्टं किंवा दुर

2

नशिबाचे रडगाणे का गाययचं?

20 May 2023
0
0
0

मराठी पुस्तके, मराठी सुविचार   माणसांना नशिब नावाचं काही तरी असतं.आपल्या आयुष्यात चांगल वाईट काही घडत असते त्याचे कारण नशिब असतं.असं अनेक जण समजतात.आजी सांगायची सटई नावाची कुणी तरी एक दैवशक्ती असते.

3

राजकारण आहे की बहुरंगी बहुढंगी नाटक?

8 July 2023
0
0
0

हल्ली महाराष्ट्रात जनता सरप्राइज शाॅक खाऊन खाऊन घायाळ झाली आहे.उत्सुकता माणसाला पराकोटीचा आनंद देत असते.सस्पेंन्स..आता पुढे काय? पुढे काय..?? पक्ष फुटला..आता राष्ट्रवादी कुणाची ? या प्रश्नांच उत

4

पक्ष फुटी ,सदू आणि बंडया

12 July 2023
0
1
0

पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो... बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी

---

एक पुस्तक वाचा