पाराजवळ सकाळ सकाळ एक टोळकं जमा झालं होतं.सकाळ पासूनचं दोन चार गाबडी नुसती तोटं वाजवीत होतं. सकाळ सकाळचं ठो..ठो... बारं व्हायला लागलेत म्हणल्यामुळे गलका तर होणारच ना? त्यांच्या भोवती येणारी - जाणारी माणसं गराडा टाकित हुती.जसा जसा गरदा जमा होतं व्हता.तसं ती गाबडी चेकाळतं व्हती.त्या रामा सावकाराच्या बंगल्याकून डीजेचा भी आवाज येतं हुता.नेमकं कशाचं काय ? हे ब-याचं जनाला कळतं नव्हतं.
सदू यटण पाठीवर टाकून झपा झपा शॅतात निघाला होता.एवढा गराडा पाहून तेव्हं भी थांबला.उग आपला उल्लीकसा टायेम पास करावा म्हणूनचं तेव्हं तिथं घुटमळला व्हता.
"अरं कमून असं बारं करित्यात रं? "
सबागती त्यांनी बंडयाला परशन केला. कुठं काय घडलं?त्याला काय माहित ? तेव्हं शेतकरी माणूस.लयं कुणाच्या राड्यात पडतंचं नाय.
"आरं काल मोठा भूकंप झालायं की...तुला नाय व्हवं ठावं?"बंड्या त्याच्या हातावर टाळी देत बोलला.
"भूंकंप...??कुठं ?कवा ?" सदू हादरला ना?त्याला काही इश्यचं ठाऊक नव्हता.तेव्हं हादरायचं नाय तर काय?दोन च्यार थोबाडातून नुसते दातं विचकले. उगाच दाताड विचकल्यामुळे तर सदू एकदमचं गांगरला.
आयला हे कमून दात काढयत्यात कायनु? काही जणं चेकाळलेत.काही दाताड इचकितेत.काही त्या तिकडं नाचत्यात..म्हंजी हे काय तरी भारी घडलेलं दिसतंयं पण असं सा-यांन खुशीत गाजरं चघळया सारखं नेमकं काय झालं आसलं? आसला मज्जाच हादरा तरी कसा असलं? असला कसला भूंकप? त्याला प्रशन पडला. आता प्रशन नुसतं सदूला एकट्याला पडलाय व्हयं? आख्खा महाराष्ट्रालाच ह्यो प्रश्न हाय. असल्या प्रश्नांनी लोकांच्या मेंदूचं पारं भरितचं केलं की.त्याचं कुणाला टेन्शान.
"आर,असला हादराच कुणी कवा दिला नसलं?लयं जबर हादरायं तेव्हयं."
"जबर हादरा ?"
हाॅं...जबराटचं.....? बंड्या गुटक्यानं लाल किटाण चढलेले दात इचकित बोल्ला.
"बार उडीत्यात... नाचत्यात...असला कसला ग्वाडं हादरा...? मज्जा लका...तुमची." सदू बंडयाची मज्जा घेतं बोल्ला.
"आर,एवढंचं काय घेऊन बसला.ते बघ डीजे...पण आलाय इकडं."
सदूनं मान वळिली. तिकडून खरचं डीजे येतं व्हता. डीजे बघितल्यावर तर सदू पारं पपचरंचं झाला.
"खरचं की लका..आता ह्यो डीजे कशाला?."
"कशाला म्हंजी? नाचायला...!! बघ...बघ..नाचायला लागली पारू.... पोरं सोरं भी झाल्यात चालू."बंड्याने तर तालचं धरला.चांगलाच नाचायला लागला.
सदूचं टेन्शाॅन गेलं असलं तरी कनफ्यूजन पारचं वाढलं होतं.
" अरं बंड्या हे कसला भूंकप... हे तर लग्नाच्या वरातीवाणीचं सारं.वातावराणं टाईट."
"आयला तू का यंटम का रं? भूंकपच केलाय लका दादांन. जबर हाबाडायं हेव्हं ."
"दादानं...कोण्चा दादा....?"
"आरं, महाराष्ट्रात एकच दादा....??"
"गप,हेकाण्या...दादा कुठं एकच असतो.इथं फुटाफुटावरं दादा पडलेत? खालच्या अळीचादादा, वरच्या अळीचा,मिच मिचं डोळयाचा, तेव्हं डबका दाद्या.इथं काय एक दादा व्हयं?"
"ऐ,यंटम... एकच दादा...वन्लि अजित दादा..." बंडयानं एकदम क्लेअरचं केलं.
"ते पवार सायबाचा पुतण्या का?तेव्हचं दादा ना?"
"हाबडा दिलायं.. आपल्या दादानं."
"हाबडा? कुणाला.??"
"आरं,फोडलानं राष्ट्रवादी पक्ष त्यांनं... फट्दिसी."
"आयला हे पक्ष हायत की फुगं रं? फटाफटाच फुटतेतं लका.मागं ती शिवसेना भी अशीच फाटकुणी फुटली. आता त्यांच होतं हिंदूत्वाचं मॅटर..यांचं काय?
"दादा तेव्हं.इक्कासचा लयं नाद दादाला."
"इक्कास?कोण्चा इक्कास? सरकार कोणाचं भी आलं तर आपलं हाय ते हायचं.शेतक-याला काय?डेंगळ?"
"आर,इक्कासाची लांब लचक दृष्टी हाय दादा कडं.ईक्कासाठीच हा यगळा इचार केला त्यांनी.शेतक-यासाठीच तर पाऊल उचलयं दादांनी."
"उग फेकू नक्कू.शेतक-यांच कोण ईचार करतयं? स्वार्थ असलं त्यांचा काही.आर,हे पुढारी लयं गंडयाचे असतेत?खायचं एका दातांनी नि दाखवायचं यगळच दात."
"आर,सत्ते शिवाय प्रश्न नाय सुटतं.अॅडजेसष्ट
"आयला ....पण ही गद्दारीचं की." सदूला काय राजकारणातले छक्के पंजे कळतेय? ते आपला सरळं बोलत हुता.
"गद्दारी...?नाय नाय पक्ष दादांचा खरा हाय."
" हे तर लयच झालयं? ज्या ताटात खाल्लं त्याचं ताटात हागल्या सारखं झालं."
"ऐ,हेकण्या,महत्वाचं काय रं? "
" इक्कास."
" इक्कास काय इरोधात बोंबलून होतो का?आर, ईरोधआत असलं की नुसत्या वाटा अडीतेत? इरोधातलं आमदार म्हंजी...उग बुजगावण्या गत राहतं? आहे म्हणतं येतं नाही नाही म्हणता येतं नाही.ईक्कास करायचं म्हणलं की सत्ता पायजी.उग तंडत बसून उपेग नसतो.म्हणून ह्यो यगळा इचार केला दादांनी."
"आर,पण कुणी तरी ईरोधआत भी पायजी ना?सारेच एक झाल्यावर ? लोकशाही कशी तग धरिल?"
"लोकशाहीच नक्कू टेन्शन घेऊ तू."
"असं गापकुणई गडी फुटायचे म्हणाल्यावर काय तरी जबराटचं कारण असलं?असलं मोठाले गडी कसं काय फुटत्यात? तसली ईडी का काडी तर माग नसलं ना ?"
"नाय नाय...दादा तेव्हं.. त्याला कोण घाबरू शकतं?"
" तू काय भी म्हणं बंड्या.काही तरी हूकचं अडकईलं असणं? त्या शिवाय अशी मोठाले पक्ष कसे फुटतेलं? गेल्यावर्षा तेव्हं शिवसेना पक्ष फुटला तवा गुवाहाटी...डोंगार, झाडी..हाटील. सारं गडी स्पेशल इमानानं गडी सहल करून आणले हुते.त्यांनी लयं मज्जा केल्ती. त्यांचा डान्स भी आल्ता की मोबाईल वर.खोके काय ते पण भेटल हुतं जणू?"
"खरं,हे खरं नसतं?"
"मग हे एकदम फुकटचं कसं गद्दार हुतेल.एवढं मंत्री राहिलेलं नेतं कसं काय गळाला लागले असत्यालं?"सदूच्या मेंदूचा पारं भजं झालं होतं.
"दादांची घुसमटं भी व्हती म्हणा तशी."
"घुसमट?काय घुसमटं असलं बुवा? काही भावकीचं मॅटर आसलं? चुलत्या पुतण्याचं कुठं जमतं आपल्यात. पुराणा पासून तेचं आलं.भावकी ती भावकी.उण्याची वाटेकरी." सदा असा बोल्यावर बंडयाचं डोकं गरम झाल. बंडया कट्टरं गडी.
"गप,गैभाण्या,इक्कास साठी फूटलेत दादा.."
"इक्कास..?कोण्चा?'
"महाराष्ट्राचा..शेतक-याचा...!!"
"हे भारी मॅटर रंगिलं...शेतक-याच्या इक्कासाचं.
"बरळायला माझं काय जातं? पण त्या थोरल्या वाडयाचं कसं व्हुईल?"
"सावरकरांचा नि त्यांचा लयं छत्तीसचा आकडा हुता."
"ते बघ,सारेचं नाचतेत? मंत्र्याच्या स्वागतला...!!"
"वरचं असं गुटमॅट झाल्यावर खालच्याची लयं पंच्यात हुती? मुळयादं झाल्यासारखं सांगता येत नाही.सोसता येत नाही."
"राजकारणात कायम कुणीच कुणाचं मित्र नसतं आणि..दुश्मन नसत. राजकारणात लयं इमोशनल.व्हायचं नसतं.डोकं वापरायच असतं."
"ते कसं?"
"जिकडं...घुग-या "तिकडं..उदो..उदो..वाहत्या नदीत घ्यायचं हात पाय धुवून..."
"बंड्या डोकं लका...तुला.आम्ही होकार इमोशनल होऊन मतदानाच्या टायमाला काशि करायचो.आता नक्की डोकं वापरायचं...हे काळीज काढून कुणाला नाही दयायच.
"मग करायचा डान्स? दादांचा नाद करायचा नाय."
सदू आणि बंड्या गर्दीत शिरले.नाचू लागले. बीजे वाजतं होता.नाद करायचा नाय....नाद करायचा..