shabd-logo

रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने

10 January 2024

2 पाहिले 2

रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने

मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरू होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. "गंधवती पृथ्वी" या वचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला.
घरून दापोलीस येताना या वेळेस मी एक निश्चय करून आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदऱ्यासाठी हट्ट धरून बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, "तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको धरू हट्ट." मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्याचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करून गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते. जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरांत तर विचारूच नका. परंतु खेड्यांतूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल, तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो! परंतु त्या सृष्टिमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणांस जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, "जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात." रशियातील मुले फार थंडी नसली, म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवीत आहे.
माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोनतीन गाबड्या लावल्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?
माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिद्र्य येत होते, तरी कज्जेदलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट-कचेऱ्यांशिवाय चैनच पडत नाही. स्वतःचे संपले, तर दुसऱ्याचे खटले चालवावयास ते घेतात. तुझा खटला मी जिंकून दिला, तर मला इतके पैसे; खटला फसला, तर झालेला खर्च सारा माझा." असे सांगून खटला चालविण्याची कंत्राटे घेणारे लोक मी पाहिले आहेत.
वडील दापोलीस आले, म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील एक पैही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा सुरू झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. तेवढ्या महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता, गणेशचतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.
ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेशचतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रुपया दोन आणे जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन.
मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला.
तो कोट हातात घेतला, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात; परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले.
मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो, ते म्हणाले, "पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदीनाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्ह्या, सोंडेघरचा पर्ह्या यांना उतार नसेल; आमचे ऐक." मी कोणाचे ऐकले नाही. हृदयात प्रेमपूर आला होता, तर नदीनाल्यास थोडीच भीक घालणार!
नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वप्नात दंग होतो. आईला किती आनंद होईल, या कल्पनेत मी होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारून गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्ह्या दुथडी भरून वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो, देवाला माहीत! माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही हृदय भरून घेऊन जात होतो.
रस्त्यावरील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाड् कडाड् आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत हेते. त्या पंचमहाभूतांच्या नाचातून मी चाललो होतो.
शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलाचिंब होऊन गेलो होतो. "आई!" मी बाहेरून हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.
"अण्णा आला, आई, अण्णा!" धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.
"इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?" आई विचारू लागली.
"सोंडेघरच्या पर्ह्याला पाणी नव्हते का रे?" वडिलांनी विचारले.
"हो! परंतु मी आलो कसातरी!" मी म्हटले.
"त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून!" वडील म्हणाले.
"गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर." आई म्हणाली.
मी आंघोळीस गेलो. धाकट्या भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, की काही तरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो.
परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट! तो कोट नव्हता, ते हृदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
"अण्णा हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे?" धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारू लागला.
"मग सांगेन. घरात जा घेऊन." मी म्हटले.
"आई! हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलान्. होय, आई?" धाकटा भाऊ आईला विचारू लागला.
आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो.
आई म्हणाली, "श्याम! हा कोणाचा कोट?"
"मोरू जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल!" वडील म्हणाले.
"नाही. हा मी पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे." मी म्हटले.
"पैसे, रे, कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस?" वडिलांनी विचारले.
"कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?" आईने कातर स्वरात विचारले.
"आई! त्या दिवशी तू सांगितले होतेस "हा पहिला व शेवटचा हात लावलेला." ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत, फीचेही खर्चिले नाहीत." मी म्हटले.
"मग उधार का शिवून आणलास, श्याम?" वडिलांनी विचारले.
"भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असा; ते मी जमविले. गेल्या दोन-तीन महिन्यांचे सारे जमविले. त्यांतून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, "तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट." मी मनात ठरविले होते, की गणपतीला नवीन कोट आणावयाचा. पुरुषोत्तम, बघ तुला होतो का?" मी म्हटले.
"अण्णा! हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा! आता माझी पेन्सिल हरवणार नाही. आई, बघ!" पुरुषोत्तम आईला दाखवू लागला.
मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली, "श्याम! तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास, हो. हेच प्रेम, बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर, देवा, दृष्ट नको कुणाची पाडू!"
वडिलांनीही माझ्या पाठीवरून प्रेमाने हात फिरविला. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते, साऱ्या स्मृती होत्या.
"आई, याला कुंकू लावू?" पुरुषोत्तमाने विचारले.
"बाळ, आता घडी करून ठेव. उद्या कुंकू लावून, देवांना नमस्कार करून अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणायला जा, हो." आई म्हणाली.

पांडुरंग सदाशिव साने ची आणखी पुस्तके

इतर इतर पुस्तके

57
Articles
श्यामची आई
0.0
श्यामची संस्कारी आई सानेगुरुजींनी विशाल मानवतेची शिकवण देणारे विपुल साहित्य निर्माण केले. साहित्याच्या विविध प्रांतांत त्यांनी अविरत योगदान दिले. ‘श्याम’, ‘धडपडणारा श्याम’, ‘श्यामची आई’ या पुस्तकांतून त्यांनी आपली जीवनगाथा कथन केली. पैकी ‘श्यामची आई’ हे पुस्तक मराठी भाषेतील अक्षरधन ठरले आहे. माय-लेकरातील प्रेम व संस्कारांच्या हृदयस्पर्शी आठवणी या पुस्तकात आहेत. श्यामच्या बालमनावर जे माणुसकीचे संस्कार त्याच्या आईकडून झाले त्या घटना या अजरामर कलाकृतीत कथन केल्या आहेत. सानेगुरुजींनी १९३३ साली नाशिकच्या तुरुंगात अवघ्या पाच रात्रींत हे पुस्तक लिहिले. एकदा आश्रमातील मित्रांनी त्यांना विचारले होते, ‘‘गुरुजी, तुमच्या जीवनात हा कस्तुरीचा सुगंध कोठून आला? तुमच्यामध्ये ही सेवावृत्ती, नि:स्पृहता कशी निर्माण झाली?’’ त्यावेळी गुरुजी अश्रुपूर्ण नेत्रांनी म्हणाले, ‘‘गडय़ांनो, हे सारे माझ्या आईचे देणे आहे बरं. आई माझा गुरू आणि तीच माझी कल्पतरू. प्रेमळ बोलावयास तिनेच मला शिकविले. केवळ मनुष्यावरच नव्हे, तर गाई-गुरांवर, फुलपाखरांवर, झाडा-माडांवर प्रेम करावयास तिनेच शिकविले.
1

प्रारंभ

1 January 2024
1
0
0

आईने तेलकट खाल्ले, तर मुलाला खोकला होईल, आईने उसाचा रस, आंब्याचा रस खाल्ला, तर मुलाला थंडी होईल, त्याप्रमाणे आईने मुलादेखत आदळआपट केली, भांडणतंडण केले, तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया

2

रात्र पहिली सावित्री-व्रत

1 January 2024
1
0
0

आश्रमातील प्रार्थना झाली. सारे सोबती सभोवती मंडलाकार बसले होते. श्यामच्या मुखचंद्राकडे सर्वांचे डोळे लागले होते. तो भ्रातृसंघ म्हणजे एक अपूर्व दृश्य होते. वाळवंटातील झरा अधिकच सुंदर व पवित्र वाटतो. अं

3

रात्र दुसरी अक्काचे लग्न

1 January 2024
1
0
0

आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ ह

4

रात्र तिसरी मुकी फुले

1 January 2024
1
0
0

"बारकू, भाकर खाल्ली की नाही रे ? येतोस ना आश्रमात?' शिवाने विचारले. 'आई, वाढ ना लौकर. तिकडे सुरूसुध्दा होईल गोष्ट.' बारकू आपल्या आईला घाई करू लागला. 'कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई

5

रात्र चवथी पुण्यात्मा यशवंत

1 January 2024
1
0
0

"त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती.' श्यामने गोष्ट सांगावयास सुरूवात केली. "जरा थांब. बारकू यावयाचा आहे. काल तो भाकर न खाताच आला होता.' शिवा म्हणाला. "तो पहा आलाच. ये बारकू ये; माझ्याजवळ ब

6

7

रात्र सहावी थोर अश्रू

1 January 2024
0
0
0

लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे.' श्यामने सुरूवात केली. 'संध्याकाळी मी खेळावयास जात असे. छाप्पोपाणी, लंगडी, धावणे, लपंडाव, लक्षुंबाई ताक दे, डेरा फुटला मडके दे, असे ना

8

रात्र सातवी पत्रावळ

1 January 2024
0
0
0

"कोकणात पुष्कळशा घरी पत्रावळीवर जेवण्याची पध्दत आहे. साधेपणात किती तरी सुंदरता व स्वच्छता असते . ताटांना ती कल्हई लावा व ती पोटात दवडा घाण सारी. माझ्या वडिलांना पत्रावळीवर जेवणे फार आवडे. बायकांनासुध्

9

10

रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना

1 January 2024
0
0
0

बाहेर पिठूर चांदणे पडले होते. मंदिराच्या गच्चीवर सारी मंडळी बसली होती. दूरचा नदीप्रवाह चांदीच्या प्रवाहासारखा दिसत होता. नदीला विश्रांती माहीतच नाही. सारखे वाहणे तिला माहीत. तिची प्रार्थना, कर्ममय प्र

11

रात्र नववी मोरी गाय

1 January 2024
0
0
0

"बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारीत होता. गाय दुस-याची असली तरी ती देवता आहे. जा रे बारकूला त्याच्या घरून आणा.' श्याम म्हणाला. "तो बाहेर बसला आहे ऐकत, आत

12

13

रात्र दहावी पर्णकुटी

1 January 2024
0
0
0

"मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग गं भाऊला मला घेऊन जायला. 'वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. 'तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे?' भाऊ म्हणाला. 'ने रे तिलासुध्

14

रात्र अकरावी भूतदया

3 January 2024
0
0
0

"राम ! तो दिवा बाजूला कर. माझ्या डोळयांवर उजेड नको.' श्याम म्हणाला. आज बाहेर जरा पाऊस पडत होता. गार वारा वाहत होता. म्हणून मंडळी आतच बसली होती. रोज आकाशाच्या खालीच प्रार्थना व हे कथाप्रवचन होई! श

15

16

रात्र बारावी श्यामचे पोहणे

3 January 2024
1
0
0

कोकणामध्ये पावसाळयात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हातानेसुध्दा पाणी घेता येते, इतक्या भरतात. पावसाळयामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना या वेळेसच पोहावयास शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला

17

रात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण

3 January 2024
0
0
0

"जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते, दक्षिणा भिक्षुक ब्राह्मणाला घेण्याचा अधिकार. कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्येशिवाय इतर धंदा नसतो. म्हणून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, असे सांग

18

रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या

4 January 2024
0
0
0

आमच्या आईला श्रीखंडाच्या वड्या फार चांगल्या करता येत असत. आईचा पाक कधी बिघडत नसे. वड्या खुसखुशीत सुंदर व्हावयाच्या. त्या वड्या करून देण्यासाठी आईला पुष्कळदा शेजारीपाजारी बोलावीत असत व आईही आनंदाने

19

रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम

4 January 2024
0
0
0

लहानपणी मी देवाची भक्ती फार करीत असे. निरनिराळ्या पोथ्या वाचून भक्तीचे बीज हृदयात पेरले गेले होते व ते हळूहळू वाढत होते. शाळेतील मुले माझ्या घरी जमत व मी त्यांना देवादिकांच्या, साधुसंतांच्या गोष्ट

20

रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन

4 January 2024
0
0
0

सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते. त्या वेळेस उत्तरेकडची गंगा, दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटावयास येते, अशी गोड कल्पना आहे. आपल्या भारतवर्षात निसर्गाला सुध्दा कोमल भावन

21

22

रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण

5 January 2024
1
0
0

"मी लहानपणी पोथ्यापुराणे पुष्कळ वाचली; परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवं,... अनन्तं वासुकिं शेषं,... अच्युतं केशवं विष्णु..., अशी दोन-चार लहान लहान स्तोत्रेच ये

23

24

रात्र अठरावी अळणी भाजी

5 January 2024
0
0
0

राजा व राम नदीवर गेले होते. एका शिलाखंडावर दोघे बसले होते. राजा म्हणाला, "राम! मला येथून जावेसेच वाटत नाही. येथील ही नदी, ही वनराजी, हे मोर सारे पाहून किती आनंद होतो. परंतु सर्वांत मोठा आनंद म्हणज

25

रात्र एकोणिसावी पुनर्जन्म

5 January 2024
0
0
0

"माझे वय त्या वेळेस अकरा वर्षांचे होते. मला प्रथम पुण्यास मामांकडे इंग्रजी शिकण्यासाठी ठेवण्यात आले होते. माझा मोठा भाऊ तेथेच शिकावयास होता. परंतु मी मामांकडे नीट वागलो नाही, त्यांच्याकडून मी दोन-

26

रात्र विसावी दूर्वांची आजी

5 January 2024
1
0
0

'आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे; तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्हणून ती

27

रात्र एकविसावी दूर्वांची आजी

7 January 2024
0
0
0

'आमच्या घरी आमची एक दूरची आजी राहत असे; तिचे नाव द्वारकाकाकू. आमचे वडील वेगळे झाले, तेव्हा ती वडिलांकडे राहावयास आली. तिचे शेतभात होते. त्याची व्यवस्था वडील बघत. वडिलांवर तिचा लोभ होता. म्हणून ती

28

रात्र बाविसावी आनंदाची दिवाळी

7 January 2024
0
0
0

दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसू

29

रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर

7 January 2024
1
0
0

मे महिन्याच्या सुटीत मी घरी गेलो होतो. इंग्रजी चवथीत मी गेलो होतो. मी घरी गेलो, म्हणजे आईला आधार वाटे. कारण ती नेहमी आजारी असे. एक दिवस ताप येई; दुसऱ्या दिवशी ताप निघाला की ती पुन्हा कामाला लागावय

30

रात्र चोविसावी सोमवती अवस

10 January 2024
1
0
0

ज्या सोमवारी अवस येते, तिला सोमवती अवस म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राम्हणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी १०८ वस्तू देवाला वाहावयाच्या असतात.

31

32

रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय

10 January 2024
0
0
0

रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय संध्याकाळचे चार-पाच वाजण्याची वेळ होती. सुट्टी होती, म्हणून मी घरी गेलेलो होतो. आई देवळात दर्शनाला गेली होती. मी घरीच होतो. देवदर्शन करून आई आली तेव्हा मी तिला वि

33

34

रात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण

10 January 2024
0
0
0

रात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण मे महिन्याची सुट्टी होती. आम्ही सारी भावंडे त्या वेळी घरी जमलो होतो. पुण्यास मामांकडे शिकावयास राहिलेला माझा मोठा भाऊ घरी आला होता. तो पुण्यास देवीच्या साथीत आजार

35

रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय

10 January 2024
0
0
0

आमच्या घरात त्या वेळी गाय व्याली होती. गाईच्या दुधाचा खर्वस घरी केला होता. आईला माझी आठवण येत होती. मला खर्वस फार आवडत असे. मी लहान होतो, तेव्हा गवळवाडीची राधा गवळण माझ्यासाठी तिच्या घरी खर्वस असल

36

रात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी

10 January 2024
0
0
0

रात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी आमच्या गावापासून काही थोड्या अंतरावर लाटवण म्हणून एक गाव आहे. तो फडक्यांचा गाव. तेथे फडके इनामदार अजून राहतात. हरिपंत फडके प्रसिद्ध सरदार त्यांच्यांतीलच ते आहे

37

38

रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने

10 January 2024
0
0
0

रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरू झाली. पावसाळाही सुरू झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कस

39

40

रात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ

10 January 2024
0
0
0

राजाला आज परत जावयाचे होते. त्याला वाईट वाटत होते. श्यामच्या आईच्या सगळ्या आठवणी ऐकावयाला आपण नाही, म्हणून त्याला वाईट वाटत होते. परंतु कर्तव्य कठोर आहे. कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात. च

41

रात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक

10 January 2024
1
0
0

त्या दिवशी सावकाराचा माणूस कर्जवसुलीसाठी आमच्याकडे आला होता. तो दूत आमच्या घरी आला म्हणजे आईला मेल्याहून मेल्यासारखे होत असे. कर्जापायी सुख नाही. कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक होय. मेले तरी कर्ज काढू

42

43

रात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ

10 January 2024
0
0
0

श्याम अलीकडे खिन्न दिसत असे. आईच्या आठवणीचा तर तो परिणाम नसेल? आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर येऊन तर तो कष्टी नसेल झाला! "श्याम! तुझ्या तोंडावर हल्ली हास्य खेळत नाही. तू उदासीन का दिसतोस? तुला

44

रात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी

11 January 2024
0
0
0

रात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी श्यामने सुरुवात केली: "आमचे कर्ज दिवसेंदिवस वढतच चालले होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एकदोन मोठी श

45

रात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन

11 January 2024
0
0
0

रात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन "मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो; परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे

46

रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!

11 January 2024
0
0
0

रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही! "आजचे पेळू चांगले नाहीत, सूत सारखे तुटत आहे. नीट पिंजलेले दिसत नाहीत. गोविंदा! तू पिंजलास ना कापूस?" भिकाने विचारले. "आजचे पेळू श्यामचे आहेत. त्यांनी आज पिं

47

रात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा

12 January 2024
0
0
0

रात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा श्यामच्या गोष्टीस सुरुवात झाली होती. दूर कुत्री भुंकत होती. वडार लोक उतरले होते; त्यांची ती कुत्री होती. "सखूमावशी रात्रंदिवस माझ्या आईची शुश्रूषा करीत होती.

48

रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव

12 January 2024
0
0
0

रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव "त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला." आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दि

49

50

रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती

12 January 2024
0
0
0

रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली,

51

52

रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध

12 January 2024
1
0
0

रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध "गड्यांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज

53

रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव

14 January 2024
0
0
0

रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव "त्या लिंबाला पाणी घाला रे, सुकून जाईल नाही तर. त्या नवीन फणसाच्या माडालाही घाला." आई वातात बोलत होती. त्या वातात, तिने स्वतःच्या हाताने नवीन लावलेली झाडे ती तिला दि

54

रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती

14 January 2024
1
0
0

रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली,

55

56

रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध

14 January 2024
0
0
0

रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध "गड्यांनो! आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदयाकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक ठळक तारे मी दाखविले. आज

57

रात्र पाचवी मथुरी

14 January 2024
0
0
0

रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती. राम म्हणाला, 'आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल. तू पडून रहा.' "अरे आईची आठवण म्हणजे सकल दु:खहारी मलम आहे. भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दु:

---

एक पुस्तक वाचा