shabd-logo

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १

12 June 2023

13 पाहिले 13

अर्जुनविषादयोग

धृतराष्ट्र म्हणाला,

हे संजया । धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युध्दाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले ? ॥ १ ॥

संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरचना केलेले पांडवाचे सैन्य पाहिले आणि द्रोणाचायाजवळ जाऊन तो म्हणाला ॥२॥

अहो आचार्य ! तुमच्या बुध्दिमान शिष्याने दुपदपुत्र धृष्टद्युम्नाने व्यूहरचना करुन उभी केलेली ही पाडुपुत्राची प्रचंड सेना पहा. ॥३॥ 

या सैन्यात मोठमोठी धनुष्ये घेतलेले भीम, अर्जुन यांसारखे शूरवीर, सात्यकी, विराट, महारथी द्रुपद, ॥४॥

धृष्टकेतु, चेकितान, बलवान काशिराज, पुरुजित् कुन्तिभोज, नरश्रेष्ठ शैब्य, पराक्रमी युधामन्यू, ॥५॥

शक्तिमान् उत्तमौजा, सुभद्रापुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे पाच पुत्र हे सर्वच महारथी आहेत. ॥६॥

अहो ब्राह्मणश्रेष्ठ ! आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत, ते जाणून घ्या, आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत, ते मी आपल्याला सांगतो. ॥७॥

आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युध्दात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा ॥८॥

 इतरही माझ्यासाठी जिवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युध्दात पारंगत आहेत. ॥९॥

भीष्मपितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे; तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. ॥१०॥

म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांनीच निःसंदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. ॥ ११ ॥

कौरवांतील वृध्द, महापराक्रमी, पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अन्तःकरणात आनन्द निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला ॥१२॥

त्यानंतर शंख नगारे, ढोल, मृदडग, शिंगे इ. वाद्ये एकदम वाजू लागली. त्यांचा प्रचंड आवाज झाला ॥ १३ ॥

त्यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले. ॥१४॥

श्रीकृष्णांनी पाञ्चजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौण्डू नावाचा मोठ शंख फुंकला ॥१५॥

कुन्तीपुत्र राजा युधिष्ठिराने अनन्तविजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष व मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले ॥ १६ ॥ 

श्रेष्ठ धनुष्य असलेल्या काशिराज, महारथी शिखण्डी, धृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी ॥१७॥

राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाबाहू सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा ! सर्व बाजूनी वेगवेगळे शंख वाजवले. ॥१८॥

आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात् आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. ॥१९॥

महाराज ! त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून, शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली ॥२०॥

तेव्हा धनुष्य उचलून तो हृषीकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला हे अच्युता! माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. ॥२१॥ 

मी रणभूमीवर युद्धाच्या इच्छेने सज्ज झालेल्या या शत्रुपक्षाकडील योद्धयांना जोवर नीट पाहून घेईन की, मला या युद्धाच्या उद्योगात कोणाकोणाशी लढणे योग्य आहे, तोवर रथ उभा करा ॥२२॥

दुष्टबुद्धी दुर्योधनाचे युध्दात प्रिय करु इच्छिणारे जे जे हे राजे या सैन्यात आले आहेत, त्या योद्ध्यांना मी पाहातो. ॥२३॥

संजय म्हणाला,

धृतराष्ट्रमहाराज! अर्जुनाने असे सांगितल्यावर श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी भीष्म, द्रोणाचार्य व इतर सर्व राजांसमोर उत्तम रथ उभा करून म्हटले ॥२४॥

हे पार्था युध्दासाठी जमलेल्या या कौरवांना पहा. ॥२५॥

त्यानंतर कुलीपुत्र अर्जुनाने त्या दोन्ही सैन्यामध्ये असलेल्या काका, आजे-पणजे, गुरु, मामा, भाऊ, मुलगे, नातू, मित्र, सासरे आणि हितचिंतक यांना पाहिले. ॥२६॥

तेथे असलेल्या त्या सर्व बान्धवांना पाहून अत्यंत करुणेने व्याप्त झालेला कुन्तीपुत्र अर्जुन शोकाकुल होऊन असे म्हणाला. ॥२७॥

अर्जुन म्हणाला, हे कृष्णा ! युध्दाच्या इच्छेने रणांगणावर उभ्या असलेल्या या स्वजनांना पाहून ॥२८॥

माझे अवयव गळून जात आहेत; तोंडाला कोरड पडली आहे; शरीराला कंप सुटला आहे आणि अंगावर रोमांच उभे राहात आहेत. ॥२९॥ 

हातातून गाण्डीव धनुष्य गळून पडत आहे. अंगाचा दाह होत आहे. तसेच माझे मन भ्रमिष्टासारखे झाले आहे. त्यामुळे मी उभा देखील राहू शकत नाही. ॥३०॥

हे केशवा, मला विपरीत चिन्हे दिसत आहेत. युध्दात आप्तांना मारुन कल्याण होईल, असे मला वाटत नाही. ॥ ३१ ॥

हे कृष्णा ! मला तर विजयाची इच्छा नाही, राज्याची नाही की सुखाचीही नाही हे गोविन्दा ! आम्हांला असे राज्य काय करायचे ? अशा भोगांनी आणि जगण्याने तरी काय लाभ होणार आहे ? ॥३२॥

आम्हांला ज्यांच्यासाठी राज्य, भोग आणि सुखादी अपेक्षित आहेत, तेच हे सर्वजण संपत्तीची आणि जीविताची आशा सोडून युध्दात उभे ठाकले आहेत. ॥३३॥ 

गुरुजन, काका, मुलगे, आजे, मामा सासरे, नातू, मेहुणे, त्याचप्रमाणे इतर आप्त आहेत. ॥३४॥

हे मधुसूदना, हे मला मारण्यास तयात झाले तरी किंवा त्रैलोक्याच्या राज्यासाठीही मी या सर्वांना मारु इच्छित नाही. मग पृथ्वीची काय कथा? ||३५||

हे जनार्दना, धृतराष्ट्राच्या मुलांना मारुन आम्हांला कोणते सुख मिळणार ? या आततायींना मारुन आम्हांला पापच लागणार.||३६॥ 

म्हणूनच हे माधवा, आपल्या बान्धवांना धृतराष्ट्रपुत्राना आम्ही मारणे योग्य नाही. कारण आपल्याच कुटुंबियांना मारुन आम्ही कसे सुखी होणार ? ॥३७॥

जरी लोभामुळे बुध्दी भ्रष्ट झालेल्या यांना कुळाचा नाश झाल्यामुळे उत्पन्न होणारा दोषा आणि मित्राशी वैर करण्याचे पातक दिसत नसले तरी ॥३८॥

हे जनार्दना ! कुळाच्या नाशाने उत्पन्न होणारा दोष स्पष्ट दिसत असतानाही आम्ही या पापापासून परावृत्त होण्याचा विचार का बरे करु नये ?॥३९॥

कुळाचा नाश झाला असता परंपरागत कुळधर्म नाहीसे होतात. कुळधर्म नाहीसे झाले असत त्या कुळात मोठया प्रमाणात पाप फैलावते. ॥४०॥

हे कृष्णा ! पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो. ॥४१॥

वर्णसंकर हा कुळाचा नाश करणाऱ्यांना आणि कुळाला नरकालाच नेतो. कारण श्राध्द, जलरर्पण इत्यादींना मुकलेले यांचे पितर अधोगतीला जातात. ॥४२॥

या वर्णसंकर करणाऱ्या दोषांमुळे परंपरागत जातिधर्म आणि कुळधर्म उध्वस्त होतात ॥४३॥

हे जनार्दना ज्यांचे कुळधर्म नाहीसे झाले आहेत, अशा माणसांना अनिश्चित काळपर्यंत नरकात पडावे लागते, असे आम्ही ऐकत आलो आहोत. ॥४४॥

अरेरे! किती खेदाची गोष्ट आहे! आम्ही बुध्दिमान असून राज्य आणि सुख यांच्या लोभाने कुटुंबियांना ठार मारायला तयार झालो, हे केवढे मोठे पाप करायला उद्युक्त झालो बरे ! ॥४५॥

जर शस्त्ररहित व प्रतीकार न करणाऱ्या मला हातात शस्त्र घेतलेल्या धृतराष्ट्रपुत्रांनी रणात ठार मारले, तरी ते मला अधिक कल्याणकारक ठरेल. ॥४६॥

संजय म्हणाला,

रणांगणावर दुःखाने उद्विग्न मन झालेला अर्जुन एवढे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन रथाच्या मागील भागात जाऊन बसला. ॥४७॥

Krishna ची आणखी पुस्तके

1

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १

12 June 2023
3
0
0

अर्जुनविषादयोगधृतराष्ट्र म्हणाला,हे संजया । धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युध्दाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले ? ॥ १ ॥संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरच

2

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २

12 June 2023
1
0
0

सांख्य योगसंजय म्हणाला,अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवानी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥१॥श्रीभगवान् म्हणाले,हे अर्जुना ! या भलत्याच वे

3

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३कर्म योगअर्जुन म्हणालाहे जनार्दना ! जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात ? ॥ १ ॥तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्य

4

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गी - अध्याय ४ज्ञानकर्मसंन्यास योगश्रीभगवान म्हणाले,मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू यालासांगितला. ॥१॥हे

5

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५कर्मसंन्यास योगअर्जुन म्हणालाहे कृष्ण ! तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सां

6

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६आत्मसंयम योगश्रीभगवान म्हणाले-जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य करतो, तो सन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्ग्रीचा त्याग करणारा सन्यासी नव्हे; तसेच केवळ त्याग करणारा योगी

7

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७ज्ञानविज्ञान योगश्रीभगवान म्हणाले,हे पार्थी अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्व

8

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८अक्षरब्रम्ह योगअर्जुन म्हणाला,हे पुरुषोत्तमा ! ते ब्रह्म कार्य आहे ? अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे ? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे ? आणि अधिदैव कशाला म्हणतात ? ॥१॥हे मधूसू

9

श्रीमद्भगवद्गीता अध्याय९

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९राजविद्याराजगुह्ययोगश्रीभगवान म्हणाले,दीपदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासुन मुक्त होशील. ॥

10

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०विभूती योगश्रीभगवान म्हणाले,हे महाबाहो ! आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक. जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥१॥माझी उप्तत्ती अर्थात ल

11

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ११

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - - अध्याय ११अर्जुन म्हणाला,माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जी अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहिसे झाले. ॥१॥ कारण हे कमलदलनयना मी आपल्याकडून प्रा

12

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२भक्ति योगअर्जुन म्हणाला,जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मगन राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन न

13

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगश्री भगवान म्हणाले.हे अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ' असे म्ह

14

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १४

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १४गुणत्रयविभागयोगश्रीभगवान म्हणाले,ज्ञानातीलही अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्वं मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत. ॥१॥हे ज

15

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५पुरुषोत्तम योगश्रीभगवान म्हणाले,आदिपुरुष परमेश्वरूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म

16

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६दैवासुरसंपद्विभागयोगश्रीभगवान म्हणाले,भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन भगवान, देव

17

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १७

17 June 2023
0
0
0

श्रद्धात्रयविभाग योगअर्जुन म्हणाला,हे कृष्णा ! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती ? सात्विक, राजस की तामस ? ॥१॥श्रीभगवान म्हणाले,मनुष्याच

18

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८

17 June 2023
0
0
0

मोक्षसंन्यासयोगअर्जुन म्हणाला.हे महाबाहो ! हे अंतर्यामी ! हे वासुदेवा! मी सन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. ॥१॥श्रीभगवान म्हणाले,कित्येक पण्डित काम्य कर्माच्या त्यागाला 'सन्यास मानत

---

एक पुस्तक वाचा