shabd-logo

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३

16 June 2023

2 पाहिले 2
श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३

क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग

श्री भगवान म्हणाले.

हे अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ' असे म्हणतात. ॥१॥

हे अर्जुना ! तू सर्व क्षेत्रामध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारासहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे. ॥२॥

ते क्षेत्र जे आणि जसे आहे, तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे. ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐकः ॥३॥

हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञान तत्त्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे. तसेच पुर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. ॥४॥

पाच महाभूते, अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ॥५॥ 

तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, स्थूल देहचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. ॥६॥

मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन, वाणी इत्यादीबाबतीत सरळपणा, श्रद्धाभक्तीसह गुरुची सेवा, अंतर्बाह्य शुद्धी अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रहः ॥७॥ 

दुःख इह-परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणी अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादीमध्ये व दोषांचा वारंवार विचार करणे. ॥८॥

पुत्र, स्त्री, घर आणि घन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे. ॥९॥

मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकान्तात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे ॥१०॥

अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे. ||११||

जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो, ते चांगल्या प्रकारे सांगतो, ते अनादी परम ब्रह्म 'सत् हे म्हणता येत नाही आणी असत' ही म्हणता येत नाही. ॥१२॥

ते सर्व बाजुनी हात-पाय असलेले सर्व बाजूनी डोळे डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजुनी कान असलेले आहे. कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. ॥१३॥

ते सर्व इंद्रियाच्या विषयांना जाणणारे आहे. परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तिरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे. || १४ ||

ते चराचर सर्व प्राणिमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सुक्ष्म असल्यामुळे कळल्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. ॥१५॥

तो परमात्मा विभागरहिन एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपुर्ण भुतामध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारण-पाषण करणारा, रुद्ररूपाने सहार करणारा आणी ब्रह्मदेवरूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. || १६ ||

ते परब्रह्म ज्योतीची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते, तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वाच्या हृदयांत विशेषरूपाने राहिलेला आहे. ||१७|

अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्त्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ॥१८॥

प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, असे तू समज आणि रागद्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उप्तन्न झालेले आहेत, असे समज ॥ १९ ॥

कार्य व कारण यांच्या उप्तत्त्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्म सुखदुःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. ॥२०॥

प्रकृतीत राहिलेल्या पुरुष प्रकृतीपासून उप्तन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगती आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बऱ्या वाईट योगीत जन्म मेळण्याला कारण आहे. ॥ २१ ॥

या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी समती देणारा असल्याने अनुमन्ता, सर्वांचे धोरण पषण करणारा म्हणुन भर्ता, जीवनरूपाने भोक्ता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानन्दघन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. ॥२२॥

अशा रीतीने पुरुषाला आणि गुणासहित प्रकृतीला जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला, तरी पुन्हा जन्मला येत नाही. ॥२३॥

त्या परमात्म्याला काहीजण शुद्ध झालेला सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काहीजण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करतात. ॥ २४ ॥

परंतु याखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत, ते अशाप्रकारे न जाणणारे असतात. ते दुसऱ्याकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडुन ऐकूनच तद्नुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्युरूप संसारसागर खात्रीने तरून जातात. ॥ २५ ॥

हे अर्जुना ! जेवढे म्हणून स्थावर जंगम प्राणी उप्तन्न होतात, ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उप्तन्न होतात, असे समज ॥२६॥

जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थिर असलेला पाहतो, तोच खरे पाहतो. ॥२७॥

कारण जो पुरुष सर्वामध्ये समरूपाने असलेला परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परम गतीला जातो. ॥२८॥

आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत, असे पाहतो आणी आत्मा अकर्ता आहे, असे पाहतो, तोच खरा पाहतो. ॥२९॥ 

ज्या क्षणी हा पुरुष भुताचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूताचा विस्तार आहे. असे पाहातो, त्याच क्षणी तो सच्चिदानन्दघन ब्रह्माला प्राप्त होतो. ॥३०॥

हे अर्जुना ! हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण आसल्यामुळे शरीरात राहात असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही. ॥३१॥

ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणानी लिप्त होत नाही. ॥३२॥

 हे अर्जुना ! ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो ॥३३॥

अशाप्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यातील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात, ते महात्मे परम बड़ा परमात्म्याला प्राप्त होतात ॥३४॥

Krishna ची आणखी पुस्तके

1

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १

12 June 2023
3
0
0

अर्जुनविषादयोगधृतराष्ट्र म्हणाला,हे संजया । धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युध्दाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले ? ॥ १ ॥संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरच

2

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २

12 June 2023
1
0
0

सांख्य योगसंजय म्हणाला,अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवानी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥१॥श्रीभगवान् म्हणाले,हे अर्जुना ! या भलत्याच वे

3

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३कर्म योगअर्जुन म्हणालाहे जनार्दना ! जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात ? ॥ १ ॥तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्य

4

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गी - अध्याय ४ज्ञानकर्मसंन्यास योगश्रीभगवान म्हणाले,मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू यालासांगितला. ॥१॥हे

5

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५कर्मसंन्यास योगअर्जुन म्हणालाहे कृष्ण ! तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सां

6

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६आत्मसंयम योगश्रीभगवान म्हणाले-जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य करतो, तो सन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्ग्रीचा त्याग करणारा सन्यासी नव्हे; तसेच केवळ त्याग करणारा योगी

7

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७ज्ञानविज्ञान योगश्रीभगवान म्हणाले,हे पार्थी अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्व

8

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८अक्षरब्रम्ह योगअर्जुन म्हणाला,हे पुरुषोत्तमा ! ते ब्रह्म कार्य आहे ? अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे ? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे ? आणि अधिदैव कशाला म्हणतात ? ॥१॥हे मधूसू

9

श्रीमद्भगवद्गीता अध्याय९

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९राजविद्याराजगुह्ययोगश्रीभगवान म्हणाले,दीपदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासुन मुक्त होशील. ॥

10

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०विभूती योगश्रीभगवान म्हणाले,हे महाबाहो ! आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक. जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥१॥माझी उप्तत्ती अर्थात ल

11

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ११

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - - अध्याय ११अर्जुन म्हणाला,माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जी अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहिसे झाले. ॥१॥ कारण हे कमलदलनयना मी आपल्याकडून प्रा

12

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२भक्ति योगअर्जुन म्हणाला,जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मगन राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन न

13

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगश्री भगवान म्हणाले.हे अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ' असे म्ह

14

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १४

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १४गुणत्रयविभागयोगश्रीभगवान म्हणाले,ज्ञानातीलही अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्वं मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत. ॥१॥हे ज

15

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५पुरुषोत्तम योगश्रीभगवान म्हणाले,आदिपुरुष परमेश्वरूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म

16

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६दैवासुरसंपद्विभागयोगश्रीभगवान म्हणाले,भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन भगवान, देव

17

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १७

17 June 2023
0
0
0

श्रद्धात्रयविभाग योगअर्जुन म्हणाला,हे कृष्णा ! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती ? सात्विक, राजस की तामस ? ॥१॥श्रीभगवान म्हणाले,मनुष्याच

18

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८

17 June 2023
0
0
0

मोक्षसंन्यासयोगअर्जुन म्हणाला.हे महाबाहो ! हे अंतर्यामी ! हे वासुदेवा! मी सन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. ॥१॥श्रीभगवान म्हणाले,कित्येक पण्डित काम्य कर्माच्या त्यागाला 'सन्यास मानत

---

एक पुस्तक वाचा