shabd-logo

श्रीमद्भगवद्गीता अध्याय९

14 June 2023

8 पाहिले 8
श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९

राजविद्याराजगुह्ययोग

श्रीभगवान म्हणाले,

दीपदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासुन मुक्त होशील. ॥१॥

हे विज्ञानासहित ज्ञान सर्व विद्याचा राजा, सर्व गुप्त गोष्टीचा राजा, अतिशय पवित्र, अतिशय उत्तम, प्रत्यक्ष फळ देणारे, धर्मयुक्त, साधन करण्यास फार सोपे आणि अविनाशी आहे.॥२॥

हे परतपा ! या वर सांगितलेल्या धर्मावर श्रद्धा नसलेले पुरुष मला प्राप्त न होता मृत्युरूप संसारचक्रात फिरत राहतात. ॥३॥

जसे पाण्याने बर्फ परिपूर्ण भरलेले असते, तसे मी निराकार परमात्म्याने हे सर्व जग पूर्ण व्यापलेले आहे. तसेच सर्व भूते माझ्यामध्ये संकल्पाच्या आधारावर राहिलेली आहेत. पण वास्तविक मी त्याच्यामध्ये राहिलेली नाही. ॥४॥

ती सर्व भूते माझ्या ठिकाणी राहिलेली नाहीत. परंतु माझी ईश्वरी योगशक्ती पहा. भूताना उप्तन्न करणारा व त्यांचे धारण पोषण करणारा असूनही माझा आत्मा वास्तविकपणे भूतांच्या ठिकाणी राहिलेला नाही. ॥५॥

जसा आकाशापासून उप्तन्न होऊन सर्वत्र फिरणारा महान वायु नेहमी आकाशातच राहती, त्याचप्रमाणे माझ्या संकल्पाने उप्तन्न झाल्यामुळे सर्व भुते माझ्यात राहतात, असे समज ॥६॥

हे अर्जुना ! कल्पाच्या शेवटी सर्व भूते माझ्या प्रकृतीत विलीन होतात आणि कल्पाच्या आरंभी त्यांना मी पुन्हा उत्पन्न करतो. ॥७॥ 

आपल्या मायेचा अंगीकार करून प्रकृतीच्या ताब्यात असल्यामुळे पराधीन झालेल्या या सर्व भूतसमुदायाला मी वारंवार त्याच्या कर्मानुसार उप्तन्न करतो. ॥८॥

हे अर्जुना ! त्या कर्मात आसक्ती नसलेल्या व उदासीनप्रमाणे असलेल्या मज परमात्म्याला ती कर्मे बंधनकारक होत नाहीत. ॥९॥

हे अर्जुना ! माझ्या अधिष्ठानामुळे प्रकृती चराचरासह सर्व जग निर्माण करते. याच कारणाने हे संसारचक्र फिरत आहे. ॥ १० ॥

माझ्या परम भावाला न जाणणारे मुर्ख लोक मनुष्यशरीर धारण करणाऱ्या मला सर्व भूतांच्या महान ईश्वराला तुच्छ समजतात. अर्थात आपल्या योगमायेने जगाच्या उद्धारासाठी मनुष्यरुपात वावरणाऱ्या मला परमेश्वराला सामान्य मनुश्य समजतात. ॥ ११ ॥

ज्यांची आशा व्यर्थ, कर्म निरर्थक आणि ज्ञान फुकटे असे विश्चित्य चित्त असलेले अज्ञानी लोक राक्षसी, आसूरी आणि मोहिनी प्रकृतीचाच आश्रय करून राहतात. ॥१२॥

परन्तु हे कृन्तीपुत्रा ! दैवी प्रकृतीचा आश्रय घेतलेले महात्मे मला सर्व भूताचे सनातन कारण आणि अविनाशी अक्षर स्वरूप जाणुन अनन्य चित्ताने युक्त होऊन निरंतर भजतात. ॥ १३ ॥

ते दृढनिश्चयी भक्त निरंतर माझ्या नामाचे व गुणांचे कीर्तन माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असतात. तसेच वारंवार नेहमी माझ्या ध्यानात मग्न होऊन अनन्य प्रेमाने माझी उपासना करतात. ॥ १४ ॥

मला प्रणाम करीत

दुसरे काही ज्ञानयोगी मज निर्गुण-निराकार ब्रह्माची ज्ञानयज्ञाने अभेदभावाने पूजा करीतही माझी उपासना करतात आणि दुसरे काही अनेक रूपानी असलेली मज विरट स्वरूप परमेश्वराची नाना प्रकारांनी उपासना करतात. ॥१५॥

श्रतयज्ञ मी आहे, स्मार्तयज्ञा मी आहे. पितृयज्ञ मी आहे. वनस्पती, अन्न व औषधी मी आहे. मंत्र मी आहे. तूप मी आहे. अग्नी मी आहे आणि हवनाची क्रियाही मीच आहे. ॥१६॥

या जगाला धारण करणारा व कर्मफल देणारा, आई-वडिल, आजोबा, जाणण्याजोगा पवित्र ओंकार, तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. ॥१७॥

प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा सर्वांच्या उप्तत्ति प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे. ।। १८ ।।

मीच सूर्याच्या रूपाने उष्णता देतो, पाणी आकर्षन घेतो व त्याचा वर्षाव करतो. हे अर्जुना मीच अमृत आणि मृत्यु आहे आणी सत् व असतही मीच आहे. ॥१९॥

तिन्ही वेदात सांगितलेली सकाम कर्मे करणारे, सोमरस पिणारे, पापमुक्त लोक माझी यज्ञांनी पूजा करुन स्वर्गप्राप्तीची इच्छा करतात. ते पुरुष आपल्या पुण्याईचे फळ असणाऱ्या स्वर्गलोकाला जाऊन स्वर्गात देवांचे भोग भोगतात. ॥ २०॥

ते त्या विशाल स्वर्गलोकाचा उपभोग घेऊन पुण्याई संपल्यावर मृत्युलोकात येतात. अशा रीतीने स्वर्गप्राप्तीचे साधन असणाऱ्या तिन्ही वेदात सांगितलेल्या, सकाम कर्माचे अनुष्ठान करून भोगाची इच्छा करणारे पुरुष वारवार ये जा करीत असतात. अर्थात पुण्याच्या जोरावर स्वर्गात जातात आणि पुण्य संपल्यावर मृत्युलोकात येतात. ॥ २१ ॥

जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसाचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो. ॥२२॥

हे अर्जुना ! जे सकाम भक्त श्रद्धेने दुसऱ्या देवाची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते. ॥२३॥

कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला परमेश्वराला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणुन पुनर्जन्म घेतात. ॥ २४ ॥

 देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भुतांची पूजा करणारे भुताना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही. ॥ २५ ॥

जो कोण भक्त मला प्रेमाने पान, फुल, फळ पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने प्रेमाने अर्पन केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो. ॥२६॥

हे अर्जुना ! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मल अर्पण कर ॥ २७ ॥

अशा रीतीने ज्यामध्ये सर्व कर्मे मला भगवताला अर्पण होतात, अशा सन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील. ॥ २८ ॥

मी सर्व प्राणिमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्याच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. ॥२९॥

जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा कारण तो यथार्थ निश्चयी असती अर्थात् त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, अस पूर्ण निश्चय केलेला असतो. ॥३०॥

तो तत्काळ धर्मात्मा होतो आणी नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही. ॥ ३१ ॥

हे अर्जुना स्त्रिया वैश्य, शूद्र तसेच पापयोगी अर्थात चाण्डालादी कोणीही असो, तेसुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात ॥३२॥

मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे ? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर ||३३||

माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो माझी पूजा कर मला नमस्कार कर अशारीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील. ॥३४॥



Krishna ची आणखी पुस्तके

1

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १

12 June 2023
3
0
0

अर्जुनविषादयोगधृतराष्ट्र म्हणाला,हे संजया । धर्मभूमी असलेल्या कुरुक्षेत्रात युध्दाच्या इच्छेने एकत्र जमलेल्या माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले ? ॥ १ ॥संजय म्हणाला, तेव्हा राजा दुर्योधनाने व्यूहरच

2

श्रीमद्भगवद्गीता अध्याय २

12 June 2023
1
0
0

सांख्य योगसंजय म्हणाला,अशा रीतीने करुणेने व्याप्त, ज्याचे डोळे आसवानी भरलेले व व्याकुळ दिसत आहेत, अशा शोक करणाऱ्या अर्जुनाला भगवान मधुसूदन असे म्हणाले. ॥१॥श्रीभगवान् म्हणाले,हे अर्जुना ! या भलत्याच वे

3

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ३कर्म योगअर्जुन म्हणालाहे जनार्दना ! जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात ? ॥ १ ॥तुम्ही मिश्रितशा भाषणाने माझ्य

4

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ४

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गी - अध्याय ४ज्ञानकर्मसंन्यास योगश्रीभगवान म्हणाले,मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला आणि मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू यालासांगितला. ॥१॥हे

5

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ५कर्मसंन्यास योगअर्जुन म्हणालाहे कृष्ण ! तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सां

6

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६

13 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय ६आत्मसंयम योगश्रीभगवान म्हणाले-जो पुरुष कर्मफळाचा आश्रय न घेता कर्तव्य करतो, तो सन्यासी व योगी होय. आणि केवळ अग्ग्रीचा त्याग करणारा सन्यासी नव्हे; तसेच केवळ त्याग करणारा योगी

7

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ७ज्ञानविज्ञान योगश्रीभगवान म्हणाले,हे पार्थी अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन, योगयुक्त होऊन तू ज्यायोगे संपूर्ण विभूती, शक्ती, ऐश्व

8

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ८अक्षरब्रम्ह योगअर्जुन म्हणाला,हे पुरुषोत्तमा ! ते ब्रह्म कार्य आहे ? अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे ? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे ? आणि अधिदैव कशाला म्हणतात ? ॥१॥हे मधूसू

9

श्रीमद्भगवद्गीता अध्याय९

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ९राजविद्याराजगुह्ययोगश्रीभगवान म्हणाले,दीपदृष्टिरहित अशा तुला भक्ताला हे अतिशय गोपनीय विज्ञानासहित ज्ञान पुन्हा नीटपणे सांगतो ते जाणल्याने तू दुःखरूप संसारापासुन मुक्त होशील. ॥

10

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १०विभूती योगश्रीभगवान म्हणाले,हे महाबाहो ! आणखीही माझे परम रहस्यमय आणि प्रभावयुक्त म्हणणे ऐक. जे मी अतिशय प्रेमी अशा तुला तुझ्या हितासाठी सांगणार आहे. ॥१॥माझी उप्तत्ती अर्थात ल

11

श्रीमद्भगवद्गीता अध्याय ११

14 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - - अध्याय ११अर्जुन म्हणाला,माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जी अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला, त्याने माझे हे अज्ञान नाहिसे झाले. ॥१॥ कारण हे कमलदलनयना मी आपल्याकडून प्रा

12

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १२भक्ति योगअर्जुन म्हणाला,जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितल्याप्रमाणे निरंतर आपल्या भजन ध्यानात मगन राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन न

13

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १३क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगश्री भगवान म्हणाले.हे अर्जुना हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ' असे म्ह

14

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १४

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १४गुणत्रयविभागयोगश्रीभगवान म्हणाले,ज्ञानातीलही अति उत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की, जे जाणल्याने सर्वं मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत. ॥१॥हे ज

15

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १५पुरुषोत्तम योगश्रीभगवान म्हणाले,आदिपुरुष परमेश्वरूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेवरूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसाररूप अश्वत्थवृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म

16

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६

16 June 2023
0
0
0

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १६दैवासुरसंपद्विभागयोगश्रीभगवान म्हणाले,भयाचा पूर्ण अभाव, अंतःकरणाची पूर्ण निर्मळता, तत्त्वज्ञानाकरता ध्यानयोगात निरंतर दृढ स्थिती आणि सात्विक दान, इंद्रियांचे दमन भगवान, देव

17

श्रीमद्भगवद्गीता - अध्याय १७

17 June 2023
0
0
0

श्रद्धात्रयविभाग योगअर्जुन म्हणाला,हे कृष्णा ! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती ? सात्विक, राजस की तामस ? ॥१॥श्रीभगवान म्हणाले,मनुष्याच

18

श्रीमद्भगवद्गीता अध्याय १८

17 June 2023
0
0
0

मोक्षसंन्यासयोगअर्जुन म्हणाला.हे महाबाहो ! हे अंतर्यामी ! हे वासुदेवा! मी सन्यास आणि त्याग यांचे तत्त्व वेगवेगळे जाणू इच्छितो. ॥१॥श्रीभगवान म्हणाले,कित्येक पण्डित काम्य कर्माच्या त्यागाला 'सन्यास मानत

---

एक पुस्तक वाचा