"...पाण्याची फेसाळणारी कड जवळ जवळ येत होती आणि तिला हलताच येत नव्हतं. पायचं नाही, तर सारं शरीरच कसल्या तरी चिकट द्रावात रुतून बसलं होतं. तिथून सुटण्यासाठी तिने आटापिटा केल्याची एक स्मृती मनात होती, पण आता अवयवांत त्राणच उरलं नव्हतं. पाण्याची कड एखाद्या अधाशी जनावरासारखी सारखी पुढे सरकत होती. लाटेवरचा फेस वासलेल्या जबड्यातल्या दातांसारखा दिसत होता. पाणी तिच्यापर्यंत पोचलं. शरीराला एक मखमली स्पर्श करून मागे सरलं. हा गोंजारणारा मखमली स्पर्श विषारी होता. शरीरातलं सर्व बळ एकवटून तिने एक उसळी मारली. पण व्यर्थ! एखादा इचच ती हलली असेल...पाणी पुन्हा आलं...त्याला घाई नव्हती .. ते आपला वेळ घेत तिला सावकाश मारणार होतं...त्याच्या तावडीतून ती आता सुटत नव्हती...मऊसर, गारेगार, रेशमी हातांनी ते तिला मारणार होतं...त्याचे चमकणारे पदरामागून पदर तिच्यावरून जातील...नाक, तोंड, डोळे, कान सर्वांवाटे ते शरीरात शिरेल...शरीरातला कानाकोपरा त्या फेसाळणाऱ्या पाण्याने भरून जाईल... ती किंचाळली...पण पाण्याच्या गर्जनेत तो क्षीण आवाज केव्हाच विरून गेला...पाणी तिच्या शरीरावरून पुढे गेलं होतं...छातीपर्यंत आलं ... गळ्यापर्यत आलं....तोंडापर्यंत आलं.. "नको....नको .. आई!" Read more
0 अनुयायी
11 पुस्तके