आजची स्त्री आणि जुन्या काळातली स्त्री ह्यांच्यात खूप फरक आहे जुन्या काळात स्त्रियांना खूप बंधन घालण्यात यायची.आपल्या भारत देशाला खूप समाजसुधारक स्त्रिया लाभल्या त्यातलेच एक नाव म्हणजे सिंधू ताई सपकाळ ज्या अनाथांची माय म्हणून ओळखल्या जातात.त्यांचे निधन ४ जानेवारी २०२२ साली हृदय विकाराने झाले.तरी त्यांचे व्यक्तिमत्त्व एवढे कीर्तीवान आहे का ते आज पण सगळ्यांच्या मनात एक माय समान आहेत. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ साली वर्धा इथे एका गरीब घरात झाला त्याना लहानपणा पासून शिकण्याची खूप आवड होती परंतु परस्थिती तशी नसल्यास त्यांचा ११ वयवर्षी असताना एका २६ वर्षीय पुरुषा सोबत लग्न लावण्यात आलं त्या फक्त ४थी पर्यंत शिकू शकल्या.त्यांचा विवाह श्री हरी सपकाळ ह्यांच्याशी झाला.त्यांचे १८ व्या वर्षी ३ बाळतपने झाली .सिंधुताई लग्नानंतर गाईन च शेणं काढणे त्यांची काळजी घेणे हे गोट्यात काम करीत पण त्यांना त्या कामाची पैसे मिळायचे नाही.ह्यावर सिंधुताई सपकाळणी बंड पुकारला आणि बायकाना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले त्यात त्या यशवी झालाय.हे पाहताच जमीनदार दमडाकर असतकर दुखवला गेला त्याने रागाच्या भरात सिंधुताई वर आरोप केले की त्यांच्या पोटातले बाळ माझे आहे.हे सर्व गावात पसरला त्यांच्या पतीला हे नाही पटले त्यांनी त्यांच्या पोटावर लात मारली व त्यांना घराबाहेर काढून गोठ्यात टाकले.त्याच रात्री सिंधुताईनी गोठ्यात एका मुलीला जन्म दिला तेव्हा त्यांच्या जवळ गाई उभ्या होत्या.गाईने त्यांना हंबरुन उठवले मग त्यांनी बाळाची नाळ दगडाने ठोकून कापली.सासरच्यांनी काढून टाकले माहेरी कोणी विचारत नव्हता.अश्या त्या तिथून निघून गेल्या माणसांची भीती वाटायची म्हणून एका शमशानात राहायला गेल्या तिथे त्या चितेच्या आगीवर जेवण करून पोट भरायच्या.आपल्याला जेवायला मिळावे म्हणून त्या भजन गायायच्या.अशे करून त्या त्यांचे जीवन जगत होत्या एकदा त्यांनी जीव द्यायचा प्रयत्न केला पण त्यात वाटेत त्यांना एक उपाशी भिकारी भेटला त्यांनी तेला भाकर खाऊ घातली हे घडताच त्यना वाटले आपण का जीव द्यावा आपण पण आपल्याला सारखे लोक शोधुया. मग त्या रेल्वे स्टेशन वर झोपायच्या भिक मागून जेवण मिळव्याच्या.अश्या प्रकारे त्यांना भिक मागणाऱ्या मुलांची खूप कीव यायची,अशे करत त्या मुल सांभाळू लागल्या आणि त्यांनी ६ आश्रम चालू केले .त्या आजवर १४०० मुलांच्या आई झाल्या त्यातले २८२ त्यांचे जावई झाले आणि ४९ मुली त्यांच्या सुना झाल्या त्या ७५० पुरस्करणी पुरस्कृत झाल्या व त्यांना चार राष्ट्रीय अवॉर्ड भेटलेत . हे सगळे मूले आता डॉक्टर,वकील झालेत.असा संगर्श काढून फार कमी लोक जिंकतात.कितीही अडचणी समोर आल्या तरी त्यांना मात देऊन सामोरे जायायचे ही खूप मोठी शिकवण त्यांच्या कडून शिकायला भेटते.