shabd-logo

एकच घोट !

6 June 2023

65 पाहिले 65

 एकच घोट ! 

 दोन दशकांपूर्वी एका रविवारचा दिवस होता. सकाळचे साधारणतः दहा वाजले होते. कविता आणि मी चहा पिता - पिता छान गप्पा मारत होतो. कविता म्हणजे माझी लहान बहीण ! इतक्यात कोणीतरी दारावरची बेल दाबली. कविताने पुढे जाऊन दरवाजा हळूच उघडला तर दरवाज्यात एक अतिशय सुंदर, मनमोहक तरुणी उभी होती. तिला पाहताच नकळत माझे दोन्ही हात हळूच माझ्या गालावर गेले. कविताने तिला आत घेत तिला आलिंगन देत तिच्या हाताला पकडून तिला आत घेत दरवाजा बंद केला. तिच्यासह माझ्या जवळ येताच कविता तिची माझ्याशी ओळख करून देत म्हणाली," ही माझी मैत्रीण प्रतिभा ! आणि प्रतिभाला म्हणाली ," हा ! माझा भाऊ विजय ! तिला पाहून खाली घातलेली मान मी हळूहळू वर केली. माझा चेहरा स्पष्ट पाहिल्यावर प्रतिभा अवाक ! होऊन माझ्याकडे पाहत राहिली. कविताने तिला माझ्या समोरच्या सोफ्यावर बसण्याची सूचना केली.. आणि ती स्वयंपाक घरात जाऊन तिच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आली. तिच्या हातात चहाचा कप देत ती म्हणाली," तू बस येथेच विजयशी गप्पा मारत तोपर्यत मी आत जाऊन स्वयंपाकाचं काय ते बघते. त्यावर प्रतिभा अगं ! मी पण येते मदतीला ! त्यावर कविता तिला म्हणाली नको ! आज तू माझी पाहुनी आहेस. तू बस येथेच आमचे बंधुराज तुला त्यांची एखादी नवीन कथा किंवा कविता ऐकवतील ती आरामात ऐक !  

 कविता स्वयंपाकघरात गेल्यावर प्रतिभा मला हळूच म्हणाली," माफ करा ! पण मी त्यापूर्वी तुम्हाला कधीच पाहिले नव्हते त्यामुळे तो रात्रीचा प्रकार घडला. खरंतर मी संयम सोडायला नको होता. पण तुमच्यासारखा इतका चांगला कवी लेखक आणि माणूसही रात्री दारूच्या नशेत हेळपांडे खात रस्त्याने चालतो हे कोणाला सांगूनही खरे वाटणार नाही. कविताने मला तुमच्याबद्दल बरंच म्हणजे बरच काही सांगितलं आहे पण तुम्ही दारू पिता हे नाही सांगितलं ! कदाचित ! ते सांगायला तिलाही लाज वाटली असेल. त्यावर मी म्हणालो," नाही ! तसे अजिबात नाही ! कविताला मी दारू पितो हे अजिबात माहीत नाही. पण ते कसं शक्य आहे ? या प्रतिभाच्या प्रश्नाला उत्तर देत मी म्हणालो," त्या दिवशी मी पहिल्यांदाच दारू प्यायलो होतो, म्हणजे ! मला पाजली होती. त्यापूर्वी मी फक्त बिअर घ्यायचो एखादा ग्लास तो ही मित्रांसोबत सहलीला वगैरे गेलो तरच. एकदा मी माझ्या मित्रांसोबत गोव्याला सहलीला गेलो होतो. त्यावेळी माझ्या मित्रांनी मला पहिल्यादा बिअर पिण्याचा आग्रह केला आणि त्यांच्या आग्रहाखातर नाईलाजाने मी पहिल्यादा बिअरचा एक घोट घेतला. पण तो एक घोट घेतल्यावरही माझं डोकं गरगरायला लागलं आणि मी तेथेच समुद्र किनाऱ्यावर थोडावेळ आडवा झालो.नंतर पाण्याने तोंड धुरतल्यावर जरा बरं वाटू लागलं.  

 मी बिअरला मनसोक्त दोष देऊ लागल्यावर त्यांनी म्हणजे माझ्या मित्रांनी मला बिअरचा महिमा सांगायला सुरुवात केली," बिअरमुळे छान बॉडी होते, आठवड्यातून एकदा बिअर घेतलेली तब्बेतीसही चांगली असते, बिअर घेतल्यावर रात्री झोप चांगली लागते, पचनसंस्था सुधारते वगैरे...त्यानंतर प्रत्येक वेळी सहलीला गेल्यावर बिअरचा एखादा घोट नचूकता पोटात सहज उतरू लागला. त्यावेळी मैत्रिखातर मी बिअरचा घेतला एकच घोट मला महागात पडला. माझ्यासारखा विद्वान मनुष्यही मित्रांच्या बोलण्याला कसा बळी पडला ? ते मलाच कळत नाही.त्या दिवशी आमच्या घरचे सगळे गावी गेले होते.म्हणून मी मित्रांसोबत फिरायला गेलो होतो. त्यादरम्यान आम्ही एका बारमध्ये बिअर प्यायला बसलो असता माझ्या एका मित्राने माझ्या नकळत माझ्या बिअरमध्ये दुसरी दारू मिसळली त्यामुळे मला दारू चढली आणि माझा तोल जाऊ लागला. त्यामुळे रस्त्याने नशेत चालताना चुकून माझा तुला धक्का लागला आणि तू माझ्या कानाखाली आवाज काढलास. तेव्हांच मी शुद्धीवर आलो. दारूमुळे एका सामान्य तरुणीने आपल्या कानाखाली मारलं. नशीब तेवढ्यावरच भागलं जर पब्लिक जमा केलं असतं तर आपल्या इज्जतीचा फालुदा झाला असता. हा विचार मी बरेच दिवस मी करत होतो. त्यानंतर मात्र मी कानाला खडा लावला. दारूला आयुष्यात पुन्हा कधीही स्पर्श न करण्याचा निर्णय घेतला. दारू शेवटी दारू असते मग ती बिअर का असेना ! तिचे परिणाम हे वाईटच होणार ! शरीरावर नाही तर मनावर..आणि मी बोलायचा थांबलो.  

 इतकावेळ माझं बोलणं मंत्रमुग्ध होऊन कान लावून ऐकणारी प्रतिभा भानावर येत मला म्हणाली,"त्या दिवशी घरी गेल्यावर खरंतर मलाही स्वतःची लाज वाटत होती. कारण तुमचा धक्का मला चुकून लागला होता तो ही दारूच्या नशेत ! तसं असतानाही तुम्हाला माफी मागण्याची संधी ही न देता मी सरळ तुमच्या कानाखाली आवाज नको काढायला हवा होता ! तुमचा चेहरा सारखा माझ्या डोळ्यासमोर येत होता आणि मी मनात विचार करत होते की तुम्हाला कोणता तरी मानसिक त्रास असेल, कोणीतरी प्रचंड मानसिक त्रास दिला असेल किंवा तुम्हाला कसले तरी दुःख असेल म्हणून तुम्ही दारू प्यायला असाल. मी तुम्हाला समजून घ्यायला हवं होतं. पण आता मला ते आठवून खरंच खूपच हसायला येतंय कारण जगाला आपल्या लेखणीतून उतरणाऱ्या शब्दातून सावरायला शिकविणाऱ्याला मी कशी सवरणार होते ? त्यावर मी प्रतिभाला म्हणालो," तू नको वाईट वाटून घेऊ ! जे झालं ते योग्यच झालं ! त्या दिवशी जर तू माझ्या कानाखाली आवाज काढला नसतास तर मी स्वतःला अनेक प्रश्न विचारू शकलो नसतो. दारूच्या दुष्परिणामांचा नव्याने विचार करू शकलो नसतो. खरं तर तू माझ्या कानाखाली मारून माझ्यावर उपकारच केले आहेत. मला एका चुकीच्या व्यसनाच्या कायमचे आहारी जाण्यापासून वाचवले आहेस. मैत्रीच्या सीमा मित्रांनी ओळखायला हव्यात आणि त्या सीमा आपल्याही लक्षात राहायला हव्या ! पण त्यासाठी मी तुझे आभार मानणार नाही कारण आभार मानले की आपण कोणाचेही उपकार विसरायला मोकळे होतो. त्यावर प्रतिभा म्हणाली," पण मी तुमच्या कानाखाली मारली त्याची शिक्षा मला व्हायलाच हवी ! त्यावर मी कसली शिक्षा ? विचारताच प्रतिभा म्हणाली," तुमची नवीन कथा प्रकाशित होण्यापूर्वी वाचण्याची ! त्यावर मी ठीक आहे ! म्हटल्यावर प्रतिभाला खूप आनंद झाला त्या आनंदाच्या भरात तिने मला प्रेमाने आलिंगन दिलं आणि क्षणात माझ्यापासून दूर होत ती म्हणाली, " त्या दिवसापासून तुमच्याबद्दल सतत विचार करून खरंतर मी तुमच्या प्रेमात पडले होते, पण तेंव्हा मला काय माहीत की मी माझ्या प्रेमाने ज्या दगडाला पैलू पाडून हिरा करण्याचे स्वप्न पाहत होते तो प्रत्यक्षात मौल्यवान हिराचं होता. फक्त तेव्हा तो हिरा चिखलात पडला होता पण आता तो स्वच्छ, सुंदर आणि निर्मळ होऊन आता त्याच्या मूळ रुपात येऊन चमकू लागला आहे. तिचं हे बोलणं स्वयंपाकघरातून बाहेर येणाऱ्या कविताने ऐकले आणि ती म्हणाली," फक्त एकच तास विजयच्या सहवासात राहून तू ही शब्दांची ओढाताण आणि छान जुळवाजुळव करायला लागलीस जर आयुष्यभर याच्यासोबत राहिलास तर तू तर नक्कीच मोठी लेखिका होशील. त्यावर प्रतिभा गालात गोड हसून म्हणाली," मला चालेल आणि आवडेलही ! पण तुझ्या बंधुराज्यांना जमेल का ? तिच्यासोबत आयुष्य काढायला जिने त्यांच्या...त्यापुढे ती काही बोलणार त्यापूर्वीच मी म्हणालो," लेखक प्रतिभेला कसं काय नाही म्हणू शकतो..? ते ही त्या प्रतिभेला जिने त्याच्या डोक्यात आयुष्यभराचा प्रकाश पाडला आहे. त्यावर कविता म्हणाली," चला ! आता आपण एक - एक घोट घेऊया ! त्यावर मी आणि प्रतिभा एकमेकांकडे पाहून हसलो असता कविता म्हणाली," कोकम सरबताचा...तुम्हाला काय वाटलं ? ...  

इतर कौटुंबिक पुस्तके

8
Articles
माझ्या 8 कथा
0.0
कथांबद्द्ल काय लिहिणार तुम्हीच वाचा आणि प्रतिक्रिया
1

एक सिगारेट ओढताना

6 June 2023
3
0
0

 एक सिगारेट ओढताना     दोन दशकांपूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी सहदेवसोबत पहिल्यांदाच कविताच्या घरी गेलो. त्यावेळी कविता नेमकी घरी नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थ

2

एकच घोट !

6 June 2023
0
0
0

 एकच घोट !   दोन दशकांपूर्वी एका रविवारचा दिवस होता. सकाळचे साधारणतः दहा वाजले होते. कविता आणि मी चहा पिता - पिता छान गप्पा मारत होतो. कविता म्हणजे माझी लहान बहीण ! इतक्यात कोणीतरी दारावरची बेल दाबली

3

पुरुष...

6 June 2023
0
0
0

 पुरुष...    मी ज्या इंजिनिअरींग कारखान्यात कामाला होतो त्या कारखान्याच्या बाजूलाच एक प्रिंटींग प्रेस होती...त्या प्रिंटींग प्रेसमध्ये माझ्या ओळखीचे एक गृहस्थ कामाला होते त्यामुळे त्या प्रिंटींग प्रे

4

सहल

6 June 2023
0
0
0

 सहल   दोन दशकांपूर्वी एका रविवारच्या दिवशी मी माझ्या चार मित्रांसोबत केळव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलो होतो. आम्ही सर्वांनी स्वतःसोबत एक जोड कपडे, टॉवेल आणि जेवणाचा डबा इतकंच काही ते सामान घ

5

टेलिफोन

6 June 2023
0
0
0

 टेलिफोन      दोन दशकांपूर्वी ट्रिंग - ट्रिंग ! अशी जोर जोरात टेलिफोनची रिंग वाजत होती. ती रिंग ऐकून रिसिव्हर उचलायला जवळचा कोणीही पुढे सरसावत नव्हता . जो - तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभा होता कार

6

वाढदिवस

6 June 2023
0
0
0

 वाढदिवस   एन. डी. कॉलेजच्या प्रांगणात आज फर्स्ट इयर कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे बरीच गर्दी दिसत होती...सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता...विजयची उत्साहात

7

बस नंबर ★★★

6 June 2023
0
0
0

 बस नंबर ★★★  एक काल्पनिक विनोदी कथा   दोन दशकांपूर्वी एके दिवशी मला काही कामा निमित्तशांती नगर वरून प्रेमनगरला जायचे होते. शांतीनगर वरून प्रेमनगरला जायला एकच बस होती बस नंबर ★★★ आम्ही बस- स्टॉपवरजा

8

अन्नाची खरी किंमत...

6 June 2023
0
0
0

 अन्नाची खरी किंमत...       सकाळी साडेसहाला मला जाग आली...मी खाली फरशीवर चटई टाकून झोपलेलो होतो...कारण अंगदुखी ! असे म्हणतात फरशीवर चटई टाकून झोपल्यावर अंगदुखी कमी होते... उठलो ! पाणी प्यायलो आणि पु

---

एक पुस्तक वाचा