shabd-logo

पुरुष...

6 June 2023

41 पाहिले 41

 पुरुष...  

 मी ज्या इंजिनिअरींग कारखान्यात कामाला होतो त्या कारखान्याच्या बाजूलाच एक प्रिंटींग प्रेस होती...त्या प्रिंटींग प्रेसमध्ये माझ्या ओळखीचे एक गृहस्थ कामाला होते त्यामुळे त्या प्रिंटींग प्रेसमध्ये मध्ये माझे नेहमी जाणे येणे होत असे. इतकेच नव्हे तर त्या प्रेसमध्ये काही तांत्रिक समस्या उदभवल्यास ती समस्या दूर करण्यासाठी मी बऱ्याचदा मदतही करत असे...त्यामुळे त्या प्रिंटींग प्रेसचे मालकही माझ्या बऱ्यापैकी ओळखीचे होते...माझ्याबद्दल त्यांच्या मनात खूपच आदर होता.. तो आदर अर्थातच माझ्या बुद्धीबद्दल होता.. ते त्या प्रिंटिंग प्रेसचे मालक लोकांना मारवाडी वगैरे वाटायचे पण प्रत्यक्षात ते ब्राम्हण होते..रोज कारखान्यात आल्यावर चार लिंबू कापून त्याला हळद पिंजर लावून ठेवणे वगैरे प्रकार हा तेथे दिनक्रम होता. प्रत्येक आमवस्येला दारात नारळ फोडणे, दर शनिवारी दाराला लिंबू बांधणे आणि रोज देवाला न चुकता हार घालणे हे ओघाने आलेच...त्यात कधी - कधी विशिष्ठ वेळेला कारखाना उघडणे आणि बंद करणे आलेच...त्यासोबत कबुतरांना दाणे गरिबांना गहू तांदूळ वगैरेही वाटले जात होते. त्या प्रिंटिंग प्रेसमध्ये कम्प्युटर ग्राफिक डिझायनर म्हणून जे पुरुष कामाला होते ते माझे मित्रच होते आजही ते माझे उत्तम मित्र आहेत ती प्रेस सोडून ते आता दुसरीकडे कधी नोकरी कधी उद्योग करून बऱ्यापैकी सदन झालेले आहेत...इतके कि त्यांच्या ढुंगणाखाली गाडी आलेली आहे.. त्यानंतर त्या कारखान्यात अनेक स्त्री डिझायनरही काम करून गेल्या पण त्यातील कोणीही फार काळ टिकली नाही...आणि त्या टाकाव्यात अशी कोणाची बहुतेक इच्छाच नव्हती कारण त्या सगळ्या दिसायला सुमार होत्या.. काही वर्षांनी तेथील कामाचे स्वरूप बदलले आणि ग्राफिक डिझाइनिंगचे काम कमी झाल्यावर तो मालक छोट्या - मोठ्या डिझाईन स्वतःच तयार करू लागला किंवा बाहेरून करून घेऊ लागला कारण आता त्याला फुल टाईम ग्राफिक डिझायनर परवडणार नव्हता.. मग ! त्याने एक अशी एखादी मुलगी कामाला ठेवण्याचा निर्णय घेतला जी टेलिफोन ऑपरेटर म्हणूनही काम करेल, छोटी-मोठी कामे करेल आणि गरज पडल्यास संगणकावरील मेलही चेक करेल...प्रसंगी शिकवल्यावर बिलही बनवेल. त्या मालकांच्या सुदैवाने एक दिवस या कामासाठी तिथे एक मुलगी आली.. त्या मुलीचे नाव होते प्रार्थना ...प्रार्थना जेंव्हा पहिल्यादा या कारखान्यात इंटरव्ह्यूसाठी आली तेंव्हा मी नेमका माझ्या कारखान्याच्या दारातच उभा होतो...नेमकं तिने मलाच त्या कारखान्याचा पत्ता विचारला आणि मी तो तिला सांगितला...म्हणजे ! मी तिला तेथे घेऊनच गेलो. प्रार्थना दिसायला फारच गोरी होती इतकी गोरी की पिटासारखी गोरी ! पण तिच्या चेहऱ्यावर खूपच मुरूम होते त्यामुळे तिचा चेहरा तेंव्हा किंचित डागाळल्यासारखा दिसत होता...तिची उंची साधारण पाच फूट होती...डोक्यावर लांबसडक काळे केस ..तिचे डोळे नाजुक काळेभोर होते ओठंही नाजूक गुलाबी होते पण लिपस्टिक लावल्यामुळे .. चेहरा थोडा उंच असला तरी नाक थोडे बसकेच होते...माझ्यासारखे ... आवाज गोड होता, बोलणे लाघवी होते आणि सर्वात महत्वाचे तिचा चेहरा खूपच हसरा होता तो ही माझ्यासारखा ! माझ्या या सतत् हसऱ्या दिसणाऱ्या चेहऱ्याचा बऱ्याच लोकांना रागही येतो आणि काहींना मी इतका आनंदी कसा राहू शकतो हा प्रश्नही पडतो.ती हसल्यावर तिच्या गळाला सुंदर खल्याही पडत होत्या पण त्या खोल नव्हता कारण तेंव्हा तिची शरीरयष्टी किडकिडी होती...थोडक्यात सांगायचं तर ती अक्षरश: झिरो फिगर होती... 

 तेंव्हा तीच वय साधारण वीस एक वर्षे असेल...तीच शिक्षण बारावी पर्यत झाले होते...मधल्या काही महिन्यात तिने इकडे तिकडे छोटी - मोठी कामे केली होती पण संगणकाचे ज्ञान मात्र तिने घेतलेले नव्हते कारण अर्थात तिच्या घराची आर्थिक स्थिती हेच असावे . .त्यापूर्वी तिला म्हणावा असा कामाचा काहीच अनुभवही नव्हता...पण त्या कंपनीत आपल्या बौद्धिक हुशारीने ती जे - जे कामाचं आहे ते ते मन लावून शिकली आणि त्या कारखाण्यात मनापासून रमली...काही दिवसातच माझी आणि तिची बऱ्यापैकी मैत्री झाली...गप्पाच्या ओघात मी कविता लिहितो हे तिला सांगितलं असता तिने माझ्या कविता वाचण्याची इच्छा व्यक्त केली असता मी माझा एक कवितासंग्रह तिला भेट म्हणून दिला तो तिच्या लहान बहिणीलाही खूप आवडल्याचे तिने मला आनंदाने सांगितले...मी एक कवी वगैरे आहे कळल्यामुळे माझ्याबद्दल तिच्या मनात खूपच आदर वाढला होता...असेच काही महिने निघून गेल्यावर एक दिवस तिला भेटायला तिच्या करखान्यात दोन विवाहित स्त्रिया आल्या. त्यांच्यासोबत प्रार्थना निघून गेली मी तिला त्यांच्यासोबत जाताना पाहिले म्हणून त्या कारखान्यात जाऊन माझ्या ओळखीच्या गृहस्थाला त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला," या दोघी तिच्या सावत्र बहिणी आहेत...त्या दिसायला सावल्या होत्या...सावत्र बहिणी मी पुन्हा विचारल्यावर ते गृहस्थ म्हणाले ," हो ! या दोघी प्रार्थनाच्या सावत्र बहिणी आहेत...त्या दोघींचीही लग्ने झालेली आहेत. तिच्या आईने पहिला नवरा सोडून दुसरं लग्न प्रार्थनाच्या वडिलांसोबत केले. ते मद्रासी आहेत त्यांच्यापासून तिच्या आईला पुन्हा ही तीन पोरं झाली पहिली प्रार्थना, तिची लहान बहीण आणि लहान भाऊ...प्रार्थनाच्या वडिलांना आजारपणामुळे आता फार काम होत नाही...प्रार्थनाची आई ! प्रार्थनासारखीच दिसायला खूप सुंदर आणि मनमोहक आहे पण प्रार्थना आणि तिच्या आईचे अजिबात पटत नाही कारण सध्या तिच्या आईचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत...प्रार्थनेला कळायला लागल्या पासून ती आपल्या आईचे अनेक अनैतिक संबंध ती पाहत आली होती... 

 तिच्या बद्दल म्हणजे तिच्या आईबद्दल आणि कुटुंबाबद्दल ही माहिती कळल्यावर माझ्या मनात पहिला प्रश्न निर्माण झाला...हिच्या कुटुंबाबद्दल माहिती असणारा कोणी हिच्याशी ती कितीही दिसायला सुंदर असली तरी विवाह करेल का ? कसाही असलो तरी मी ही शेवटी एक लबाड पुरुष होतो...तिची माहिती मिळाल्यावर मी तिच्यापासून थोडेअंतर ठेवून वागू लागलो...तसेही मला लग्ना - बिग्नात फारसा रस नाही हे तिला माहीत होते... बाकी काही नाही तरी तिचं आयुष्य चारचौघासारखं सुखाचं जावं अशी माझी इच्छा होती...चार - पाच वर्षे काम केल्यावर तिने ते प्रिंटींग प्रेसमधील काम सोडले. तोपर्यत तिला दुनियादारी बऱ्यापैकी कळली होती...ती हि छक्के पंजे करायला शिकली होती. नवीन कामाच्या ठिकाणी तिला तिच्या अपेक्षेपेक्षा जरा जास्त पगार मिळत होता. कामाचा ताणही कमी होता...ती काम सोडून गेल्यावर काही महिने मी त्या प्रेसचे संगणकावरील काम सांभाळले. तिच्याजागी त्यानंतर तिच्याहुनही सुंदर सुंदर मुली येऊन गेल्या. त्यानंतर काही महिन्यांनी एक दिवस ती अचानक मला रस्त्यात भेटली. सुरुवातीला मी तिला ओळखलेच नाही कारण आता ती बऱ्यापैकी जाडी झाली होती म्हणजे चवळीची शेंग भोपळा झाली होती. इतकी फुगली होती की ओळखूही न यावी...पण तिच्या जाडेपणामुळे तिच्या सौंदर्यात थोडी अधिकच भर पडली होती...माझ्याशी बराच वेळ तिने गप्पा मारल्या ते ही रस्त्यात उभं राहून...ती आनंदी आहे ! हे पाहून मी ही खूप आनंदी झालो होतो... मी माझ्या आयुष्यात बाकी काही शिकलो नसेन पण मला दुसऱ्याच्या आनंदात मात्र आनंदी होता येते...त्यानंतर पुन्हा ती एक दोनदा भेटली...काही महिन्याने मी ही ती कारखान्यातील नोकरी सोडली...एक दिवस मी काही कामा निमित्त माझ्या एका मित्राला भेटायला गेलो असता असाच कामाचा विषय निघाला असता तो म्हणाला," प्रार्थना ज्या कारखान्यात कामाला आहे त्या कारखान्याचे कामही हल्ली मी करतो...मग मी तिच्याबद्दल विचारपूस केली असता तो म्हणाला, " तिचे त्या कारखान्याच्या मालकासोबत अनैतिक संबंध आहेत...त्यावर माझा पुढचा प्रश्न,'' तो विवाहित आहे का ? तर तो म्हणाला," हो ! त्याला दोन पोरंही आहेत...हे ऐकून मी मात्र निशब्द झालो...कदाचित ! मी तिच्या आयुष्याला दिशा देऊ शकलो असतो पण मी नाही दिली कारण दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायला मला आवडत नाही आणि मी माझ्या आयुष्यात कोणाला ढवळाढवळ करू देत नाही...  

इतर कौटुंबिक पुस्तके

8
Articles
माझ्या 8 कथा
0.0
कथांबद्द्ल काय लिहिणार तुम्हीच वाचा आणि प्रतिक्रिया
1

एक सिगारेट ओढताना

6 June 2023
3
0
0

 एक सिगारेट ओढताना     दोन दशकांपूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी सहदेवसोबत पहिल्यांदाच कविताच्या घरी गेलो. त्यावेळी कविता नेमकी घरी नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थ

2

एकच घोट !

6 June 2023
0
0
0

 एकच घोट !   दोन दशकांपूर्वी एका रविवारचा दिवस होता. सकाळचे साधारणतः दहा वाजले होते. कविता आणि मी चहा पिता - पिता छान गप्पा मारत होतो. कविता म्हणजे माझी लहान बहीण ! इतक्यात कोणीतरी दारावरची बेल दाबली

3

पुरुष...

6 June 2023
0
0
0

 पुरुष...    मी ज्या इंजिनिअरींग कारखान्यात कामाला होतो त्या कारखान्याच्या बाजूलाच एक प्रिंटींग प्रेस होती...त्या प्रिंटींग प्रेसमध्ये माझ्या ओळखीचे एक गृहस्थ कामाला होते त्यामुळे त्या प्रिंटींग प्रे

4

सहल

6 June 2023
0
0
0

 सहल   दोन दशकांपूर्वी एका रविवारच्या दिवशी मी माझ्या चार मित्रांसोबत केळव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलो होतो. आम्ही सर्वांनी स्वतःसोबत एक जोड कपडे, टॉवेल आणि जेवणाचा डबा इतकंच काही ते सामान घ

5

टेलिफोन

6 June 2023
0
0
0

 टेलिफोन      दोन दशकांपूर्वी ट्रिंग - ट्रिंग ! अशी जोर जोरात टेलिफोनची रिंग वाजत होती. ती रिंग ऐकून रिसिव्हर उचलायला जवळचा कोणीही पुढे सरसावत नव्हता . जो - तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभा होता कार

6

वाढदिवस

6 June 2023
0
0
0

 वाढदिवस   एन. डी. कॉलेजच्या प्रांगणात आज फर्स्ट इयर कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे बरीच गर्दी दिसत होती...सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता...विजयची उत्साहात

7

बस नंबर ★★★

6 June 2023
0
0
0

 बस नंबर ★★★  एक काल्पनिक विनोदी कथा   दोन दशकांपूर्वी एके दिवशी मला काही कामा निमित्तशांती नगर वरून प्रेमनगरला जायचे होते. शांतीनगर वरून प्रेमनगरला जायला एकच बस होती बस नंबर ★★★ आम्ही बस- स्टॉपवरजा

8

अन्नाची खरी किंमत...

6 June 2023
0
0
0

 अन्नाची खरी किंमत...       सकाळी साडेसहाला मला जाग आली...मी खाली फरशीवर चटई टाकून झोपलेलो होतो...कारण अंगदुखी ! असे म्हणतात फरशीवर चटई टाकून झोपल्यावर अंगदुखी कमी होते... उठलो ! पाणी प्यायलो आणि पु

---

एक पुस्तक वाचा