shabd-logo

सहल

6 June 2023

24 पाहिले 24

 सहल 

 दोन दशकांपूर्वी एका रविवारच्या दिवशी मी माझ्या चार मित्रांसोबत केळव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलो होतो. आम्ही सर्वांनी स्वतःसोबत एक जोड कपडे, टॉवेल आणि जेवणाचा डबा इतकंच काही ते सामान घेतलं होतं. त्या दिवशी सकाळी बरोबर अकराच्या सुमारास आम्ही केळवा स्टेशनवर पोहचलो. तेथून बाहेर पडत केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याकडे जाणाऱ्या एस. टी.त बसलो. एस.टी . त बसण्याची ती माझी पहिलीच वेळ होता. एकूणच एस.टी . तील वातावरण मला सहन होत नाही. अर्धा - एक तासाचा प्रवास होता म्हणून ठीक ! नाहीतर मला नक्कीच उलटी झाली असती. त्या एस. टी.त आमच्यासारखेच सहलीला आलेले कितीतरी तरुण जोडपी, लहान मुलं, तरुण - तरुणी आणि म्हातारी माणसेही होती. एस. टी. त एक सुंदर तरुणी माझ्या शेजारी बसली. म्हणून मला ती एस . टी . त्यातल्या त्यात मला आवडू लागली होती. तिने परिधान केलेल्या टाईट फिट जीन्स आणि टी.शर्ट मुळे ती अधिकच रेखीव दिसत होती. पण त्यावेळी मी स्वतःला संस्कृती रक्षक वगैरे समजत असे म्हणून माझा अशा पोशाखाला विरोध होता. डोक्यावरील केसांचं ओझं कमी केल्यामुळे तिचा टवटवीत गुलाबी चेहरा अधिकच रेखीव दिसत होता. एस. टी. त ती मला जरा जास्तच खेटून बसल्यामुळे तिच्या खांद्याचा उबदारपणाही मला जाणवत होता. मधून मधून आम्ही दोघे एकमेकांकडे चोरून पाहात होतो. सहलीला टाईमपास करायला एक निमित्त भेटलं म्हणून मी मनातल्या मनात जाम खुश होत होतो. माझ्या इतर मित्रांनीही आप-आपला टाईमपास शोधून ठेवला होता.  

  

 एस. टी. केळव्याच्या समुद्रकिनाऱ्याजवळ पोहचताच आम्ही आमच्या सामानासह खाली उतरून उंच उंच माडाच्या सावळीतून संथ पावले टाकत चालू लागलो. भर उन्हातही अंगाला गार - गार स्पर्श करणारी गारेगार हवा तिथे सुटली होती. त्या गार - गार हवेचा आनंद घेत उल्हसित होत चालता - चालता आम्ही ज्या तरुणींचा पाठलाग करण्याचे ठरविले होते त्यांच्यापासून आम्ही कधी दुरावलो ते कळलेच नाही. त्या विशाल समुद्र किनाऱ्यावर त्यांना शोधणे थोडे अवघड होते पण अशक्य नक्कीच नव्हते. पण त्यांना शोधण्यात आपला बहुमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा मोक्याची जागा बघून समान ठेवले आणि तेथेच खाली वाळूत पाय पसरून बसलो. तेथेच जवळच असणाऱ्या चणेवालीकडून पाच - पाच रुपयांचे चणे घेऊन आम्ही ते आनंदाने मोजून खाऊ लागलो. चणे मोजून खात असताना आमची नजर एका सडपातळ तरुणीवर स्थिरावली. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिने खांद्यावरून खाली सोडलेले मोकळे लांब केस आणि परिधान केलेला पिवळा पंजाबी ड्रेस यात ती मला माझ्या स्वप्नातील परीसारखी दिसत होती.म्हणजे ती माझ्या संस्कृती प्रियतेत बसणारी होती. तिच्यासोबत दोन पांढऱ्या रंगाचे सुंदर छोटे कुत्रे येत होते. त्या दोन कुत्र्यांच्या गळ्यातील पट्टे तिच्या दोन हातात होते. तसा कुत्रा हा प्राणी मला अजिबात आवडत नाही पण त्या दिवशी तिच्यासोबतची कुत्री छान वाटत होती.  

  

 ती जसजशी आमच्या दिशेने जवळ येत होती तसे आमच्या हृदयाचे ठोके जलद होत होते. आमच्यापासून हाकेच्या अंतरावर येऊन ती थांबली आणि कुत्र्यांसह एका माडाच्या सावलीत बसली. समुद्राच्या विस्तीर्ण लाटांकडे ती एक टक पाहात होती, जणू ती त्या समुद्राला आपल्या नाजूक पण काळ्याभोर डोळ्यात सामावून घेत होती. मी मधून - मधून तिच्याकडे चोरून पाहात होतो. ती लाटांकडे एक टक पाहत असताना तिचे केस हवेत उडत होते. आणि तेंव्हाच तीच ते अप्रतिम सौंदर्य मी डोळ्यात साठवून घेत होतो. मला तिचा हेवाही वाटत होता कारण या मनोरम मनोहरी आणि सुंदर समुद्र किनाऱ्याचा सहवास तिला ला रोजच लाभत असणार ! रोज ती अशीच समुद्र किनाऱ्यावर बसून समुद्राच्या अथांगतेचा अनुभव घेत असणार ! रोज समुद्राच्या लाटांसोबत खेळून उल्हासित होत असणार ! रोज समुद्रात क्षितिजाजवळ होणारा सूर्यास्त जवळून पाहात असणार ! पौर्णिमेच्या चांदण्यात याच समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा आम्हाला स्वप्नवत वाटणारा आनंदही ती घेत असणार ! आणि आम्ही दुर्दैवी ! आम्हाला समुद्र जवळून पाहण्यासाठी सहल काढावी लागते मुंबईत राहत असताना दुर्दैवाने.. . 

 त्या तरुणीकडे बराचवेळ मंत्रमुग्ध होऊन पाहिल्यावर म्हणजे फक्त मी एकटाच पाहत होतो. माझ्या मित्रांना समुद्राच्या लाटांसोबत खेळण्याची हुक्की आली. ती साहजिकच येणार कारण त्यासाठी तर आम्ही सहलीला आलो होतो. मी माझ्या मित्रांना म्हणालो ," तुम्ही जा ! मी येथेच बसून आपलं सामान सांभाळतो. पण ते माझेच मित्र ! त्यांनी माझ्या मनातील डाव ओळखला. आमच्यापैकी एक जण त्या तरुणीला तिच्या जवळ जाऊन म्हणाला, आमच्या वस्तुंकडे जरा लक्ष ठेवशील का ? तिने गालात गोड हसून मानेनेच होकार दिला. ती हसल्यावर तिच्या गालावर पडलेले सुंदर खळी मला चोराविशी वाटत होती. थोडावेळ समुद्राच्या लाटांसोबत खेळून मी मित्रांना तेथेच सोडून पुन्हा आमच्या सामानाजवळ येऊन बसलो आणि एक - टक तिच्याकडे पाहात राहिलो. मधून मधून तीही माझ्याकडे पाहून मनातल्या मनात हसत होती. मी तिच्या जवळ जाऊन तिच्याशी गप्पा मारण्याचा मनात विचार केलाच होता इतक्यात माझे मित्र माघारी आले. पाण्यासोबत खेळून भूक लागल्यामुळे पटापट डबे बाहेर काढले. डबा वाटून खाताना खास पदार्थ तिच्यासाठी एका डब्याच्या झाकणात काढून ते तिला द्यावेत असा विचार माझ्या मनात येतच होता. इतक्यात ! दोन भरजरी वस्त्रे परिधान केलेल्या सुंदर तरुणी तिच्याजवळ आल्या आणि तिला आपल्या सोबत घेऊन गेल्या . ती चालताना मागे वळून - वळून पहात होती. 

  

  आम्ही आमचे जेवणाचे डबे आवरून बॅग खांद्याला लावली आणि समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारायला सुरुवात केली. फेरफटका मारत आम्ही आम्हाला एस. टी. त भेटलेल्या तरुणी जेथे बसल्या होत्या तेथे पोहचलो. एस. टी. त माझ्या बाजूला बसलेली तरुणी सारखी माझ्याकडे वळून वळून पाहत होती. पण नराहून माझ्या डोळ्यासमोर सारखा त्या तरुणीचा सुंदर आश्वासक बोलका चेहरा सारखा येत होता. कळत - नकळत मी तिच्या प्रेमात पडलो होतो. मी त्याच समुद्र किनाऱ्यावर तिच्यासोबत चालण्याचे स्वप्न मनात रंगवू लागलो होतो. मी तिच्या नुसत्या स्मरणाने व्याकुळ होत होतो. आता माझे पाय आणि अंतःकरण दोन्हीही जड झाले होते. माझा उत्साह हवेत विरल होऊ लागला होता. अचानक ती समोरून जाताना दिसली तिच्या हातात कुत्र्यांच्या पिल्ला ऐवजी खांद्यावर मोठं गाठोडं होतं. त्या गाठोड्याच्या वजनाने ती किंचित कंबरेत नाही पण मानाने वाकली होती. त्या भरजरी वस्त्रे परिधान केलेल्या तरुणी तिच्या मागून त्या कुत्र्यांच्या पिल्लांसह चालत होत्या. चालताना तिने मधेच माझ्याकडे वळून पाहिले ! आता तिचे डोळे पाणावलेले होते. तिचे पाणावलेले डोळे मला काहीतरी सांगत होते. तिचं अप्रतिम सौंदर्य पाहून मी तिच्या प्रेमात पडलो होतो. पण तिला या मोलकरणीच्या रुपात पाहून माझ्या पायाखालची जमिन अचानक सरकली होती. ती कदाचित माझ्याकडे एक आश्वासक साथ मागत होती. पण बघता -बघता माझ्या नजरेसमोरून ती ओझर झाली. आता माझं मन मला सांगत होत तू तिच्याशी बोलायला हवं होत. बोलला असतात तर नक्की ती तुला कळली असती. तेथे थांबण्यात काही अर्थ नव्हता आता माझा उत्साहही समुद्राच्या लाटांसारखा शांत झाला होता. अंतःकरण जड झाले होते . पक्षी जसे संध्याकाळ झाल्यावर आपल्या घरट्याकडे परततात. तसे आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो. पण आज कित्येक वर्षांनंतरही कोणत्याही समुद्र किनाऱ्यावर गेलो असता मला तिची आठवण आल्या शिवाय राहत नाही...इतकं माझं तिच्यावरील प्रेम नाही म्हणता येणार पण तिची आठवण माझ्या हृदयात खोलवर रुतलेले होती. ..कायमची ... 

  

   

इतर कौटुंबिक पुस्तके

8
Articles
माझ्या 8 कथा
0.0
कथांबद्द्ल काय लिहिणार तुम्हीच वाचा आणि प्रतिक्रिया
1

एक सिगारेट ओढताना

6 June 2023
3
0
0

 एक सिगारेट ओढताना     दोन दशकांपूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी सहदेवसोबत पहिल्यांदाच कविताच्या घरी गेलो. त्यावेळी कविता नेमकी घरी नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थ

2

एकच घोट !

6 June 2023
0
0
0

 एकच घोट !   दोन दशकांपूर्वी एका रविवारचा दिवस होता. सकाळचे साधारणतः दहा वाजले होते. कविता आणि मी चहा पिता - पिता छान गप्पा मारत होतो. कविता म्हणजे माझी लहान बहीण ! इतक्यात कोणीतरी दारावरची बेल दाबली

3

पुरुष...

6 June 2023
0
0
0

 पुरुष...    मी ज्या इंजिनिअरींग कारखान्यात कामाला होतो त्या कारखान्याच्या बाजूलाच एक प्रिंटींग प्रेस होती...त्या प्रिंटींग प्रेसमध्ये माझ्या ओळखीचे एक गृहस्थ कामाला होते त्यामुळे त्या प्रिंटींग प्रे

4

सहल

6 June 2023
0
0
0

 सहल   दोन दशकांपूर्वी एका रविवारच्या दिवशी मी माझ्या चार मित्रांसोबत केळव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलो होतो. आम्ही सर्वांनी स्वतःसोबत एक जोड कपडे, टॉवेल आणि जेवणाचा डबा इतकंच काही ते सामान घ

5

टेलिफोन

6 June 2023
0
0
0

 टेलिफोन      दोन दशकांपूर्वी ट्रिंग - ट्रिंग ! अशी जोर जोरात टेलिफोनची रिंग वाजत होती. ती रिंग ऐकून रिसिव्हर उचलायला जवळचा कोणीही पुढे सरसावत नव्हता . जो - तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभा होता कार

6

वाढदिवस

6 June 2023
0
0
0

 वाढदिवस   एन. डी. कॉलेजच्या प्रांगणात आज फर्स्ट इयर कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे बरीच गर्दी दिसत होती...सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता...विजयची उत्साहात

7

बस नंबर ★★★

6 June 2023
0
0
0

 बस नंबर ★★★  एक काल्पनिक विनोदी कथा   दोन दशकांपूर्वी एके दिवशी मला काही कामा निमित्तशांती नगर वरून प्रेमनगरला जायचे होते. शांतीनगर वरून प्रेमनगरला जायला एकच बस होती बस नंबर ★★★ आम्ही बस- स्टॉपवरजा

8

अन्नाची खरी किंमत...

6 June 2023
0
0
0

 अन्नाची खरी किंमत...       सकाळी साडेसहाला मला जाग आली...मी खाली फरशीवर चटई टाकून झोपलेलो होतो...कारण अंगदुखी ! असे म्हणतात फरशीवर चटई टाकून झोपल्यावर अंगदुखी कमी होते... उठलो ! पाणी प्यायलो आणि पु

---

एक पुस्तक वाचा