shabd-logo

वाढदिवस

6 June 2023

9 पाहिले 9

 वाढदिवस 

 एन. डी. कॉलेजच्या प्रांगणात आज फर्स्ट इयर कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे बरीच गर्दी दिसत होती...सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता...विजयची उत्साहात होता विजयच्या जिवलग मित्राने म्हणजे स्वप्नीलने विजयला हाक मारल्यामुळे विजय त्याच्या दिशेने धावत जात असताना त्याचा एका तरुणीला चुकून धक्का लागला. त्यामुळे किंचित घाबरतच तो तिला सॉरी म्हणाला असता ती तरुणी त्याला म्हणाली," इट्स ओके ! मला महित आहे तू मला मुद्दाम धक्का नाही मालास ! त्यावर विजय म्हणाला," फर्स्ट इयर ? त्यावर ती मानेने हो ! म्हणताचं तो म्हणाला , बाय दि वे मी विजय जाधव त्यावर ती तरुणी म्हणाली , " मी विजया जाधव," त्यावर विजय तिला म्हणाला आता म्हणू नकोस तुझ्या वडिलांचं नाव विनायक आहे म्हणून ? त्यावर विजया खरंच माझ्याही वडिलांचं नाव विनायक आहे,...त्यावर विजय काय योगायोग आहे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला माझी बहिण सापडली...त्यावर विजया हसून म्हणाली, आणि मला माझा भाऊ ! इतक्यात ! स्वप्नीलने विजयला हाक मारल्यामुळे तो विजयाला बाय करून स्वप्नीलच्या दिशेने निघून गेला...विजय स्वप्नीलच्या जवळ जाताच स्वप्नीलने प्रश्न केला ती मुलगी कोण होती ? त्यावर विजय म्हणाला, ती आपल्याच क्लासमध्ये आहे म्हणजे आपली क्लासमेंट तर आहेच पण माझी बहिणंही आहे...त्यावर स्वप्नील म्हणाला, " तुझी बहीण ती कधी झाली ? त्यावर विजय म्हणाला, ती जन्माला येतात माझी बहिण झाली होती कारण तिचे नाव आहे विजया विनायक जाधव...त्यावर स्वप्नील विनोदाने म्हणाला," आता म्हणू नकोस की तुझी आणि तिची जन्म तारीखही एक आहे ! त्यावर विजय त्याला म्हणाला,'' तू काही सुधारणार नाहीस ! चल आता ! लेक्चरला. दोघेही लेक्चरला निघून गेले. मधल्या वेळेत विजय स्वप्नील आणि प्रतिभा कँटीन मध्ये चहा पित बसलेले असताना विजया तेथे आली आणि म्हणाली," मी पण जॉईन होऊ का तुम्हाला ? त्यावर विजय काही बोलण्यापूर्वी स्वप्नील म्हणाला ," प्लिज ! सर्वजण चहा पिता-पिता गप्पा मारू लागले. गप्पा मारता मारता विजयने विजयाची स्वप्नील आणि प्रतिभाशी ओळख करून दिली. प्रतिभाने उत्सुकता म्हणून विजयाला विचारले तुझ्या घरी कोण कोण असते ? त्यावर विजया म्हणाली," आमच्या घरी फक्त मी आणि माझी आई असते. माझी आई शाळेत शिक्षिका आहे... तुझे वडील ? या प्रतिभाच्या प्रश्नाला उत्तर देत विजया म्हणाली," मी लहान असतानाच ते आम्हाला सोडून गेले ! त्यावर प्रतिभा सॉरी ! म्हणाली. त्यानंतर प्रतिभा म्हणाली," माझे घर अगदी माणसांनी भरलेले आहे. मी विजयाच्या शेजारीच राहते. त्यानंतर स्वप्नील म्हणाला, माझे घरही माणसांनी भरलेले आहे मी विजयाच्या शेजारच्या इमारतीत राहतो, आम्ही लहानपनापासूनचे मित्र आहोत.. अगदी लंगोटी मित्र आहोत असे म्हणू शकतेस ? त्यावर सर्वजण हसले मनमुराद हसले. आता विजयची पाळी होती, विजय म्हणाला, आमच्या घरात मी आणि माझे बाबा दोघेच आहोत ? माझी आई आम्हाला माझ्या लहानपणीच सोडून गेली. वडील व्यवसाय करतात आणि ते लेखकही आहेत. त्यावर विजया म्हणाली," माझी आईही उत्तम कवयित्री आहे. त्यावर प्रतिभा म्हणाली," आपला विजयही उत्तम कवी आहे. त्यावर विजयने विजयाला विचारले," तुझ्या आईचे नाव काय आहे ? त्यावर विजया म्हणाली,'' प्रमिला जाधव ! त्यावर विजय म्हणाला," प्रमिला जाधव ! त्यांच्या कविता मी बऱ्याच दिवाळी अंकात वाचल्या आहेत त्या एक उत्तम कवयित्री आहेत... मला आवडेल भेटायला तुझ्या आईला ? त्यावर विजया म्हणाली," कधी येशील ते सांग ! आणि येताना ह्या दोघानांही घेऊन ये ! त्यावर सगळे मिळून म्हणाले, " आम्ही सगळे नक्कीच येणार ! कॉलेज सुटल्यावर जेंव्हा विजया तिच्या घरी गेली तेंव्हा विजयाच्या आईने कॉलेज विषयी चौकशी केली असता, विजया म्हणाली, " आई ! आज कॉलेजच्या पहिल्याच दिवशी मला एक भाव भेटला ! त्याच नाव काय आहे माहित आहे ? विजय विनायक जाधव ! ते ऐकून विजयाची आई म्हणाली," घेऊन ये एकदा त्याला आपल्या घरी मला भेटायला, त्यावर विजया म्हणाली, " अंग ! तो तुला ओळखतो त्याने तुझ्या कविता वाचल्या आहेत ! त्यालाही कविता लिहिण्याचा छंद आहे.  

 विजया - विजय, प्रतिभा - स्वप्नील यांच्यातील फक्त मैत्रीच नाही तर त्यांच्यातील नातेही फुलू लागले होते. विजया आणि स्वप्निलच्या मैत्रीचे रूपांतर आता मैत्रीच्या पुढे जाऊ पाहत होते. . विजय आणि प्रतिभा तर लहानपनापासूनच एकमेकांच्या प्रेमात होते... त्यांच्या प्रेमाला तसा कोणाचा विरोध वगैरे नव्हता . एक दिवस विजयासोबत ते तिघे म्हणजे विजय, प्रतिभा आणि स्वप्नील विजयाच्या घरी गेली... विजयाने त्या तिघांची आपल्या आईसोबत ओळख करून दिली असता विजयाची आई विजयकडे एक टक पाहत राहिली. विजयनेच बॊलायला सुरुवात केली आणि तो म्हणाला,'' , आई ! तुमच्या कविता खूपच छान असतात ! मी वाचल्यात तुमच्या बऱ्याच कविता ! आई हा शब्द ऐकून विजयाच्या आईचे कान सुखावले होते.. बाकिच्यांनीही त्याची त्यांच्याशी ओळख करून दिली. विजयाच्या आईला त्या सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला. त्या त्यांना कोठे ठेऊ आणि कोठे नको अशा करीत होत्या. त्यांनी त्या सर्वाना रात्री जेवूनच जाण्याचा आग्रह केला आणि त्यांनी स्वयंपाकी तयारीही केली, रात्री जेवण झाल्यावर सर्व गप्पा मारत असताना विजयाच्या आईने विजयला प्रश्न केला, विजय तुझी आई काय करते ? त्यावर विजय म्हणाला,'' माझी आई आम्हाला लहानपणीच सोडून गेली, सोडून गेली म्हणजे ? त्यावर विजय म्हणाला ," सोडून गेली म्हणजे देवाघरी नाही गेली ती आमचं घर सोडून गेली, मला तर तिचा चेहराही आता आठवत नाही... बाबानी तिचा एक फोटोही घरात ठेवला नाही... मग ! तुझ्या बाबांनी दुसरं लग्न नाही केलं ? त्यावर विजय म्हणाला," माझ्यासाठी माझे बाबा आणि आई तेच आहेत ! त्यावर विजयाच्या आईने आणखी एक प्रश्न विचारला ," तुझे बाबा काय करतात ? त्यावर तो उत्तर देण्यापूर्वीच विजया म्हणाली, त्यांचा व्यवसाय आहे आणि ते उत्तम लेखकही आहेत... त्यावर विजयाची आई विजयला म्हणाली," तू भेटली आहेस का त्यांना ? त्यावर विजया म्हणाली," नाही अजून पण भेटेन लवकरच ! विजयने विजयाच्या आईला प्रश्न केला विजयाचे बाबा त्यांना काय झालं होतं ? त्यावर विजयाची आई म्हणाली, " त्यांना कोठे काय झालं होत ? आमच्यातील भांडणामुळे आम्ही वेगळे झालो ते कायमचेच ? पण आमच्यात अजूनही घटस्फोट झालेला नाही... आमच्या दोघांचाही अहंकार कदाचित आमच्या पुन्हा एकत्र यायला कारणीभूत ठरला असेल ! त्यावर विजया म्हणाली,"आई ! तू मला माझ्या बाबांचा फोटो कधीच दाखवला नाहीस ! आता तरी तो दाखव ! त्यावर विजयाची आई म्हणाली," रंगाच्या भरात मी त्यांचा एकही फोटो जवळ ठेवला नाही. विजया आणि तिच्या आईला शुभरात्री करून ते तिघे घरी गेल्यावर विजयाच्या बाबांनी त्याला विचारले, " जेवायला कोणाकडे गेला होतास ? माझ्या वर्गातील माझी क्लासमेट आहे तिच्याकडे गेलो होतो, प्रतिभा आणि स्वप्नीलही होते माझ्यासोबत, क्लासमेट कसली ती माझी बहीणच आहे तिच्या वडिलांचे नावही विनायक जाधव आहे, तिची आई प्रमिला जाधव ! त्या उत्तम कवयित्री आहेत... त्यावर विजयाचे बाबा म्हणाले, " तिलाही बोलावं कि एक दिवस आपल्याकडे जेवायला ! त्यावर विजय म्हणाला, " मी हि तोच विचार करत होतो.  

 ठरल्याप्रमाणे विजयने विजयला त्याच्या घरी जेवायला येण्याचे आमंत्रण दिले, त्याच्या मदतीला प्रतिभा आणि स्वप्नीलही आले होते. विजयाच्या बाबानीही विजया येणार म्हणून बरीच तयारी केली होती, ठरल्या प्रमाणे विजया आल्यावर विजयचे वडील तिच्याकडे एकटक पाहत राहिले. जेवण वगैरे झाल्यावर गप्पा मारत असताना त्यांनी त्यांची प्रकाशित झालेली अनेक पुस्तके विजयला दाखवली... गप्पा मारता मारता त्यांनी विजयाला प्रश्न केला, तुझे आई - बाबा काय करतात ? त्यावर विजया म्हणाली, माझ्या बाबाना मी कधीच पाहिलं नाही कारण मी लहान असतानाच ते आमच्यापासून वेगळे झाले. माझी आई शिक्षिका आहे तिनेच एकटीने मला लहानाच मोठं केलं ! त्यावर विजयचे बाबा म्हणाले, " तुझ्या आईच्या कविता मी वाचत असतो त्या छान कविता लिहितात... निघताना विजयचे बाबा विजयला म्हणले," ह्या घरात तुझ्या भावाचे घर समजून कधीही येत - जात राहा ! तू येत राहिलीस तर मला आनंदच होईल ! त्यांच्या पाय पडून विजया घरी जायला निघाली असता ते तिघेही तिच्या सोबत निघाले, विजय आणि स्वप्नील तिला घरापर्यत सोडायला गेले... विजया घरी येताच विजयाचे आईने पहिला प्रश्न केला ," तू एकटीच आलीस ? त्यावर ती म्हणाली ," नाही ! विजय आणि स्वप्नील मला सोडायला आले होते.. त्यावर तिची आई म्हणाली, अगं मग त्यांना घरी घेऊन यायचं ना ? ते घाईत होते.. विजया म्हणताच विजयाच्या आईने पुढचा प्रश्न विचारला भेटले का विजयचे बाबा ? त्यावर विजया म्हणाली, " विजयचे बाबा किती भारी आणि प्रेमळ आहेत.. माझ्यासाठी त्यांनी काय काय खायला आणले होते ! ते तुलाही विचारत होते ते म्हणत होते कि ते तुझ्या कविता वाचतात आणि त्यांना त्या खूप आवडतात ! काही महिन्यांनी विजय विजायला सांगतो तीन दिवसांनी माझा वाढदिवस आहे तर एक छोटी पार्टी ठेवली आहे तर तू आणि आई या त्या पार्टीला ! त्यावेळी विजया त्याला मानेनेच होकार देते ! घरी गेल्यावर तिने आईला प्रश्न केला, " आई हे असं कसं होऊ शकत ! विजय आणि माझ्या नावात साम्य आहे इतपर्यत ठीक आहे पण आमची जन्मतारीख ती कशी एक असू शकते ? हा योगायोग असूच शकत नाही ? त्यावर विजयाची आई म्हणते," हा ! योगायोग नाहीच कारण विजय तुझा सख्खा भाऊ आहे... तो त्या दिवशी आपल्या घरी आला तेव्हाच मी त्याला ओळखले होते... तुझ्या बाबांनीही तुला नक्कीच ओळखले असेल म्हणून तर ते तुझ्याशी इतक्या काळजीने आणि प्रेमाने वागले... त्यावर विजया म्हणाली," आई ! तू हे बरोबर नाही केलेस ! मला माझ्या सख्ख्या भावाचे रहस्य तू नाही सांगितलेस ? त्यावर आई म्हणाली, " त्याच्या बाबांनी तरी कोठे त्याला तुझे सत्य सांगितले ? दोघीही एकमेकींना मिठी मारून मनभरून रडल्या.  

 विजयने विजयाला आपल्या वाढदिवसाची पुन्हा आठवण करून दिल्यावर विजया म्हणाली, मी आणि आई नक्की येऊ ! ठरल्याप्रमाणे विजयाच्या वाढदिवसाच्या पार्टीत विजयाच्या बाबांनी दोन केक मागविले, याचे कारण विजयने विचारले असता ते म्हणाले ते सरप्राईज ! आहे. ठरल्याप्रमाणे सर्व पार्टीला आले , प्रतिभाही नटून - थटून आली होती तिच्या कुटुंबासोबत ! स्वप्नीलही त्याच्या कुटुंबासोबत आला होता... सर्वजण आता केक कापण्यासाठी विजया आणि तिच्या आईची वाट पाहत होते.. इतकयात ते समोरून येताना दिसताच पुढे जाऊन त्यांच्या पाय पडत त्यांचा आशीर्वाद घेतला असता त्यांनीही त्याला आशीर्वाद देत त्याला आपल्या मिठीत घेतले. विजयानेही पुढे जाऊन विजयच्या बाबांच्या पाया पडली असता त्यांनीही तिला आशीर्वाद देत आपल्या मिठीत भरून घेतले...केक कापायची वेळ जवळ आली असता माईक हातात घेऊन विजयचे बाबा म्हणाले, " आज फक्त माझ्या मूळचाच नाही तर मुलीचाही वाढदिवस आहे आणि त्यांनी विजयाला जवळ बोलावले... ते ऐकून विजय बाबांना म्हणाला," म्हणजे ! विजया माझी सख्खी जुळी बहीण आहे ? त्यावर ते मानेनेच होकार देताच ! त्याने विजयला आणि आईला पुन्हा घट्ट मिठी मारली. आणि तो त्या दोघीनाही घेऊन केक जवळ आला. त्या दोघांनीही केक कापून आईबाबांना आणि एकमेकांना केक भरला प्रतिभा आणि स्वप्नीललाही जवळ बॊलावून केक भरवला त्या दोघांसाठी हा एक सुखद धक्का होता... केक वगैरे कापून झाल्यावर माईक हातात घेऊन विजयचे बाबा म्हणाले, " तुम्हाला प्रश्न पडला असेल कि अचानक माझी बायको कोठून आली ? तर तुम्हाला एक सत्य मला सांगायचे आहे. माझा आणि प्रमिलाचा प्रेम विवाह झाला होता.. माझे तिच्या कवितांवर आणि तिचे माझ्या कथांवर प्रचंड प्रेम होते. आमचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण लग्न झाल्यावर आम्ही आमच्या कामाच्या व्यापात एकमेकांना वेळच देऊ शकत नव्हतो... त्यानंतर काही वर्षात आमच्या या जुळ्या मुलांचा जन्म झाला आणि एक दिवस आमच्यात कडाक्याचे भांडण झाले ! त्यामुळे रागावून प्रमिला विजयाला घेऊन तिच्या गावी निघून गेली, मला वाटले होते कि काही दिवसात ती येईल माघारी ! पण ती काही माघारी आली नाही ! माझा पुरुषी अहंकार मला तिच्यासमोर झुकण्याची मान्यता देत नव्हता म्हणून ! मी हि तिला कॉन्टॅक्ट केला नाही ! अशीच वर्षे जात राहिली ती तिच्या जगात आणि मी माझ्या जगात रमून गेलो.. पुढे आम्ही प्रसिद्ध व्यक्ती झालो तेव्हा एकमेकांच्या खबरा मिळू लागल्या पण आम्ही संपर्क केला नाही. पण जेंव्हा दोन सख्ख्ये बहीण भाऊ मानलेले बहीण भाऊ म्हणून भेटले तेव्हा मात्र मला आता हे सत्य उघड करावे असे वाटू लागले.. मला माहित आहे आता प्रमिलाला माझी गरज नाही ! पण त्या दोघांना एकमेकांची गरज आहे... त्यावर प्रमिला धावत येऊन त्यांना म्हणाली, तुम्हाला कोण म्हणालं की मला तुमची गरज नाही...? आणि त्यांनी विजयच्या बाबांना घट्ट मिठी मारली.. ते पाहून विजय आणि विजयानेही त्यांना घट्ट मिठी मारली... विजय आणि विजयला त्यांच्या या वाढदिवशी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली होती... ती भेट ते त्यांच्या आयुष्यात कधीही विसरणार नव्हते...  

   

इतर कौटुंबिक पुस्तके

8
Articles
माझ्या 8 कथा
0.0
कथांबद्द्ल काय लिहिणार तुम्हीच वाचा आणि प्रतिक्रिया
1

एक सिगारेट ओढताना

6 June 2023
3
0
0

 एक सिगारेट ओढताना     दोन दशकांपूर्वी एके दिवशी सहदेवच्या लग्नाची पत्रिका द्यायच्या निमित्ताने मी सहदेवसोबत पहिल्यांदाच कविताच्या घरी गेलो. त्यावेळी कविता नेमकी घरी नसल्यामुळे तिच्या आईने आम्हाला थ

2

एकच घोट !

6 June 2023
0
0
0

 एकच घोट !   दोन दशकांपूर्वी एका रविवारचा दिवस होता. सकाळचे साधारणतः दहा वाजले होते. कविता आणि मी चहा पिता - पिता छान गप्पा मारत होतो. कविता म्हणजे माझी लहान बहीण ! इतक्यात कोणीतरी दारावरची बेल दाबली

3

पुरुष...

6 June 2023
0
0
0

 पुरुष...    मी ज्या इंजिनिअरींग कारखान्यात कामाला होतो त्या कारखान्याच्या बाजूलाच एक प्रिंटींग प्रेस होती...त्या प्रिंटींग प्रेसमध्ये माझ्या ओळखीचे एक गृहस्थ कामाला होते त्यामुळे त्या प्रिंटींग प्रे

4

सहल

6 June 2023
0
0
0

 सहल   दोन दशकांपूर्वी एका रविवारच्या दिवशी मी माझ्या चार मित्रांसोबत केळव्याच्या समुद्र किनाऱ्यावर सहलीला गेलो होतो. आम्ही सर्वांनी स्वतःसोबत एक जोड कपडे, टॉवेल आणि जेवणाचा डबा इतकंच काही ते सामान घ

5

टेलिफोन

6 June 2023
0
0
0

 टेलिफोन      दोन दशकांपूर्वी ट्रिंग - ट्रिंग ! अशी जोर जोरात टेलिफोनची रिंग वाजत होती. ती रिंग ऐकून रिसिव्हर उचलायला जवळचा कोणीही पुढे सरसावत नव्हता . जो - तो एकमेकांच्या तोंडाकडे पाहत उभा होता कार

6

वाढदिवस

6 June 2023
0
0
0

 वाढदिवस   एन. डी. कॉलेजच्या प्रांगणात आज फर्स्ट इयर कॉलेजचा पहिला दिवस असल्यामुळे बरीच गर्दी दिसत होती...सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता...विजयची उत्साहात

7

बस नंबर ★★★

6 June 2023
0
0
0

 बस नंबर ★★★  एक काल्पनिक विनोदी कथा   दोन दशकांपूर्वी एके दिवशी मला काही कामा निमित्तशांती नगर वरून प्रेमनगरला जायचे होते. शांतीनगर वरून प्रेमनगरला जायला एकच बस होती बस नंबर ★★★ आम्ही बस- स्टॉपवरजा

8

अन्नाची खरी किंमत...

6 June 2023
0
0
0

 अन्नाची खरी किंमत...       सकाळी साडेसहाला मला जाग आली...मी खाली फरशीवर चटई टाकून झोपलेलो होतो...कारण अंगदुखी ! असे म्हणतात फरशीवर चटई टाकून झोपल्यावर अंगदुखी कमी होते... उठलो ! पाणी प्यायलो आणि पु

---

एक पुस्तक वाचा