अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्या स्त्रीला तिथल्या वातावरणात काहीच त्रास होईना. अधिराजच्या डाव्या बाजूला कावेरीच्या रूपात आलेली स्त्री होती तर त्याच्या उजव्या बाजूला थोड्या दुर अंतरावर अंधूकशा प्रकाशात ओढणीत बांधलेली माती जमिनीवर आपटणारी कावेरी अधिराजला दिसली त्याला खूपच आनंद झाला. पण या स्त्रीपासून तिला लांब ठेवण्यासाठी अधिराजने तसच सावरत सावरत दूसरीकडे जावूया आपण म्हणून त्या कावेरीच्या रूपातल्या स्त्रीला दूर दूर नेवू लागला. ती स्त्री सुद्धा त्यासोबतच चाललीच होती तोपर्यंत अधिराजला झालेल्या पायाच्या जखमेवर त्यातून बाहेर येणाऱ्या रक्तावर तीच लक्ष गेल तशी तिला भूखेची तीव्र जाणीव होवू लागली. तिचे डोळे अचानकच अंगार भरल्यासारखे लाल होवू लागले तीने त्याच आवेगाने अधिराजच्या पायावर झडप घातली. बेसावध असलेल्या अधिराजला काय कराव तेच कळेना त्याने तिला ढकलण्याचा पूर्ण प्रयास केला पण तिच्या सैतानी ताकदीपुढे त्याची ताकद कमी पडत होती. तरीही त्याने आपल्या मित्रांसाठी हार न मानण्याचा निश्चय केला आणि शक्य तेवढ बळ एकवटून निर्धाराने जोरात तिला बाजूला ढकलले आणि तिथून पळत पळत पुढे जावू लागला. पण जखमेवर पुन्हा जखम झाल्याने अधिराजला चक्कर आली तो तिथेच बेशुद्ध पडला इकडे त्या क्रोधाने भडकलेल्या माणसाने त्या स्त्रीला दूर नेल व जाब विचारायला सुरुवात केली.....
हा सारांश अधिराजची आणि कावेरीची भेट
होण्याआधीचा आहे.....
वीर आणि अनुश्री शक्य तितक बळ एकवटून मित्रांना शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण ते जंगल अस होत कि तिथे कोठून कोठे मार्ग जातो हेच कळत नव्हत तसच अनूश्रीला आधी दिसलेले ते चार मार्ग कोठे लुप्त झाले होते काय माहिती तेही कोठेच दिसत नव्हते.. पण तरीही त्यांनी ठरवलेल कि आपण प्रयत्न सोडायचेच नाहीत....
कावेरीची आणि अधिराजचीही तशीच अवस्था होती त्यांना मार्गच सापडत नव्हते ते मध्ये मध्ये खूप अस्वस्थ होत होते पण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायच अस ठरवतच पुढे चाललेले त्यात अधिराजला झालेल्या जखमांतून कळा सुटत होत्या. तरीही काहीही करून आपल्या मित्रांना वाचवायचच या उद्देशाने वेदना तशाच मनातल्या मनात दाबत कावेरीसोबत पुढे चालला होता...
अचानकच मोठे मोठे वृक्ष खाली कोसळू लागले. वीर आणि अनुश्रीला विश्वासच बसेना कि हे अस कस होत आहे तिथ वार तर नव्हत त्यांचीच काया घामाने डबडबली होती तसेच वादळ पण मोठे आले नव्हते कि त्या वादळाच्या शक्तीने झाड खाली पडतील. अशीच अनुभूती कावेरी आणि अधिराजलाही होत होती. खरतर ती चौघेही एकमेकांच्या खूप जवळ होते पण काय माहिती का एकमेकांना बघूच शकत नव्हते जणू काय त्या माणसाने तेथील जमिनीवर पूर्णपणे स्वतः चा अंमल अशा प्रकारे निर्माण केला होता कि तिथला परिसरही या मुलांशी खेळ खेळत होता....
अचानकच काही हिंसक पक्षी कोणते वेगळ्याच प्रकारचे जे यांनी कधीच पाहिले नव्हते असे टोकदार चोच पण खालच्या बाजूला झुकलेली जस उकरायला खोर वापरतात तशी त्याचे पंख पण विचित्रच होते ते पूर्णपणे काटेरी होते चुकून जरी ते कोणाजवळ आले तर त्या व्यक्तीला चिरत जातील असे त्यांचे डोळे खोल खड्डे पडल्यासारखे जणू वेगळ्याच दुनियेत घेऊन जातील असे ते पक्षी भरधाव वेगाने त्यांच्याकडे येत
होते. त्या चौघाना त्यांचा सामना कसा करावा हेच कळेना ते पुरते गोंधळून गेले होते. तो पक्षी अधिराजजवळ येवू लागला. त्याने त्याची टोकदार चोच अधिराजच्या पायात घुसवली व माती उकरावी तसा त्याचा पाय फाडू लागला ते पाहून कावेरीला गहिवरून आले तिने खालील माती उचलून त्याच्या डोळ्यात घातली ती त्याच्या डोळ्यातून आरपार गेली तो अधिराजला तसच सोडून तिच्याकडे धाव घेवू लागला. त्याने त्याच्या चोचीने तिला उचलले आणि तसच पायात पकडून तिला स्वतः च्या डोळ्यात ढकलले. पण जस त्याने तिला ढकलल तस त्या पक्ष्याचे पंख जळू लागले तो तडफडत तडफडत तिथच मेला कावेरीच्या लक्षात आले आपल्या हातात ते रामाने वापरलेल्या काठीच अस्त्र अजून तसच होत त्यामुळे अस झाल असेल ती तशीच त्याच्या डोळ्यांना धरत धरत वर येवू लागली.. ती ने आल्या आल्या अधिराजच्या पायाला ओढणीने पट्टी बांधली व त्याला उठवू लागली.....
तेच पक्षी वीर आणि अनुश्रीकडेही वेगाने येत होते. ते ही पुरते गोंधळून गेले पण जसा त्या पक्ष्याचा वीरच्या हातातील पुस्तकाला हात लागला तस क्षणार्धात ते जळून राख झाले. वीर आणि अनूश्री पुन्हा काही मार्ग मिळतो का ते शोधू लागले.. इतक्यात यांनी ये अनू हे बघ इथे कावेरीच्या ओढणीचा तुकडा पडला आहे नक्कीच ते आपल्या आजूबाजूलाच आहेत चल लवकर आपण शोधू त्यांना. त्या सापडलेल्या गोष्टीने त्यांचे मित्र जवळच आहेत अशी अनुभूती त्यांना झाली.. आणि पुन्हा नवा जोश त्यांच्यात जन्मून आला.
ते आता हाक मारू लागले ये कावू कोठे आहेस तू ये कावू .....
अधिराजच्या कानात तो आवाज येतो तस तो तसाच उठतो.
ये अधी बस ना काय आहे कि नाही तुला किती लागलय पायाला उठलास तर आणखीच जास्त रक्त येईल. कावेरी म्हणाली....
ये कावू ऐक ना वीरचा आवाज आता मला ऐकू आला तो तुला बोलवत आहे.. कावेरी पण लक्ष देवून ऐकते तीच अधिराजच्या जखमेकडे लक्ष असल्यामुळे त्या आवाजाकडे लक्षच नव्हत.
अरे हो रे हा वीरचाच आवाज आहे नक्कीच वीर असणार आतापर्यंत मला वाचवा असा आपल्याला फसवण्यासाठी आवाज काढला जात होता पण या आवाजात भेटीची तीव्र इच्छा जाणवत आहे नक्कीच ते आपल्या आजूबाजूलाच आहेत.....
कावेरी आणि अधिराजही त्यांना शोधू लागले. तोवर जोरदार पाऊस सुरू झाला इतका कि त्यांचा आवाज ऐकू येईनासा झाला.. जणूकाय तितला तो परिसर त्यांना भेटू न देण्यासाठी सज्ज झाला होता.... पण तरीही त्यांना ते जवळच आहेत ही एक गोष्ट प्रेरणा देत होती.... ती एकमेकांना शोधू लागली.....
कावेरीने तिथल्या मातीवर तेरी मेरी यारी.... असा शब्द काठीने कोरला.. व छोट्या खडकाला ओढणीचा एक तुकडा बांधून त्यावर ठेवला.. ये अधी आता आपण थोड पुढे जाऊन बघू व पाच मिनिटात परत येथे येवू व परत येथे येवून परत दुसऱ्या बाजूला बघू. त्यामुळे ते इथपर्यंत आले तर या खूणेमुळे थांबतील व जर आपल्याला वाटेत भेटले तर याची गरज लागणार नाही..... कावेरी अधिराजला सांगू लागली.....
अग पण अस करण्यापेक्षा तू इथे थांबना मी त्यांना शोधून इथे आणतो.. अधिराज म्हणाला....
नाही अधि आता आपल्याला वेगळ होवून चालणार नाही नाहीतर पुन्हा ते आपल्याला खूपच दूर करतील त्यापेक्षा दोघ एकत्र जावू... कावेरी म्हणाली....
ते दोघही त्यांना शोधण्यासाठी थोड्या अंतरावर गेले.....