ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तरीही ते एकमेकांकडे बघत एकमेकांना धीर देतात. आणि इशारा करत अधिराज अनुश्रीला खुणावतो. अनुश्री लागलेल्या जख्मेवरची पट्टी काढते तस त्यातल्या जखमेवरची खपली दिसते. त्या प्रेतांना ते पाहून भलताच आनंद होतो. तिथे असणारी सगळीच प्रेत अनुश्रीच्या दिशेने येवू लागतात ते पाहून अधिराज कावेरीला खुणावतो ती तशीच त्या पुस्तकाकडे वळते आणि अधिराज त्या शस्त्राकडे जावू लागतो अनुश्री जोरात वेगाने पळत असते. ती पळत पळत तिथून बाहेर पडते. ती प्रेतही तिच्या मागे मागे धावू लागतात. पण अंगातले त्राण तर संपत चाललेले तिच्या तरीही काहीही होवू दे आता आपण आपल्या मित्रांसाठी जिवात जीव असेपर्यंत लढायच अस म्हणत ती जात असते. एके ठिकाणी गेल्यावर तिच्यातल बळ पूर्णच संपत ती तशीच खाली कोसळते.
कावेरी त्या पुस्तकाजवळ पोहोचणारच असते तोपर्यंत तो माणूस तीचा पाय मागे ओढतो व त्यावर स्वतः च्या टोकदार नखांनी ओरबडू लागतो. तिच्या पायातून रक्त ओघळू लागत. तस तस तिला जोरात वेदना होवू लागतात. पण तरीही ती ने ठरवलेल कि आज काहीही होवू दे भलेही आपले प्राण जावू देत पण इथून आपल्या मित्रांना तरी बाहेर काढूयाच. ती तसच जितक त्राण शिल्लक होते ते सगळे एकवटून त्या माणसाला दूर ढकलते आणि शक्य तितक्या वेगात जावून ते पुस्तक घेणारच असते तितक्यात दोन पावलावरच पुस्तक असत पण तिथे ती स्त्री येते व तिला ओढत ओढत दूर नेवू लागते.
अधिराज त्या शस्त्रापर्यंत जात असतो. त्याच्याकडे कोणाचच लक्ष नसत. अधिराज तसच नजर चूकवत चूकवत त्या शस्त्रापर्यंत चाललेला असतो तोच तिथे त्याच्या आजूबाजूला धूरच धूर पसरतो. त्याला त्या धूराचा त्रास होवू लागतो. तोवर त्याच्यासमोर राज उभा राहतो. तो त्याला म्हणतो अधिराज अरे मी तुला मार्ग दाखवतो. अरे हे जे पाहतोयस ते खर नाही आहे. अरे आपले मित्र त्या खोलीत आहेत त्यांना तिकडे कोंडून ठेवलय. आपल्याला तिथे ताबडतोब पोहोचल पाहिजे. नाहीतर ते सगळे त्यांना मारतील.
अधिराजला काय कराव काय सत्य काय असत्य हेच कळेना. त्याच लक्ष खाली गेल तिथे काही पाण्याचे छोट्स डबक होत त्यात त्याला समोरच्या मुलग्याच वेगळच प्रतिबिंब दिसू लागल. तो समजून गेला कि हा राज नाहीच आहे. पण तरीही त्याने तस जाणवू दिल नाही. तो म्हणाला हो चल आपण जावूया अस म्हणून त्याला मागे वळवल आणि तसच धावत त्या शस्त्रापर्यंत पोहोचला.
अनूश्री खाली कोसळते तिच्या डोळ्यात अंधारी येवू लागते. तस तिला त्या स्त्रीच्या भजनाचे सूर आठवतात ती ने त्या स्त्रीकडून सरबत घेताना ते ऐकलेले. ती तसच मनातल्या मनात ते गुणगुणू लागते. तीच्या त्या सूरांसोबत वातावरणात वेगळाच बदल होवू लागतो. ती प्रेत मातीत मिसळू लागतात तस तिथ जोराच वादळ येव लागत अन पन्हा उठते आणि आत जावू लागते.
ती स्त्री म्हणजेच त्या माणसाची बायको कावेरीला ओढत ओढत नेत असते. तस तिच्या शरीराला खालची जमीन खरचटत असते. तिला त्या स्त्रीला कस बाजूला कराव हेच सूचत नसत. तिला त्या राजाने शिकवलेली भाषा आठवते त्यात त्याने तिला एक मंत्र पण शिकवलेला. ती नकळतच तो मंत्र म्हणते.
रवीमात्मा कृपावंतना आरिष्टास नाशना रवीमात्मा कृपावंतना आरिष्टास नाशना..
ती हा मंत्र म्हणत असतेच त्याबरोबर त्या स्त्रीला जोरात फटका बसतो जणू काय कोणीतरी तिच्यावर अग्नीचा गोळा फेकला असल्यागत तिचा हात पेट घेतो. ती कावेरीला तशीच सोडते आणि तिथून ओरडत पळत दूर जाते.
कावेरीला खूप खरचटलेल असत ठिकठिकाणी रक्त आलेल असत पण ती तशीच उठते आणि पुन्हा ते पुस्तक मिळवायला जाते. ती पळत पळत जावू लागते तर तिला समोर एका कोपऱ्यात डोळे मिटून बसलेला राज दिसतो. जो पाणी पाणी असच म्हणत असतो. कावेरीला राजची ती अवस्था बघवत नाही ती तशीच आजबाजला काही आहे का बघते तिला तिच्या भिजलेल्या ओढणीची आठवण होते. ती तशीच जाते आणि राजला हाक मारते. तो तर सुरूवातीला तिला पाहून घाबरतोच व कोण कोण तू असच म्हणू लागतो. ये राज मी कावू.... नाही तू कावेरीच रूप घेऊन आलेली कोणी दुसरीच मुलगी आहेस ना.... नाही तू कावेरी नाहीसच... त्याचा कावेरीवर विश्वासच बसेना.
राज तुला आठवत का आपण दोघांनी सगळ्यांना फसवण्यासाठी एक फ्रँक केलेला तुझा अपघात झालाय त्यामुळे तुला एका दवाखान्यात नेलय अस घाबरत पळत जावून सगळ्यांना सांगितलेल जेव्हा दोघ काकांची गाडी चोरून घेऊन ग्राउंड वर शिकायला गेलेलो तेव्हा सगळे खरच किती घाबरलेले व सत्य कळाल्यावर आपल्याला सगळ्यांनी किती झापलेल.
हो ग कावू तु तु खरच कावेरी आहेस तेरी मेरी यारी सबसे अलग और न्यारी.... कावेरी राजला ओढणी पिळून त्यातल पाणी प्यायला देते. राज ते ओंजळीत घेऊन पितो. मग..... कावेरी राजला हात देते राज उठतो आणि मग दोघेही बाकिच्यांना वाचवायला जाऊ लागतात...... अधिराजने ते शस्त्र हातात घेतलेल असत तो जातो आणि जोरात वीरच्या भोवताली मारतो तस वीरच्या भोवतीच आवरण तुटत. अधिराजला वीरला बाहेर खेचून घेतो ते पाहून तो माणूस म्हणजेच ते प्रेत जास्तच चवताळत हातच सावज जाणार म्हणून जोरात त्यांच्या दिशेने झेपावत तोवर तिथे कावेरी पुस्तक घेऊन येते व त्या पुस्तकाला हात लागताच ते प्रेत त्यातच कैद होत. अधिराज आणि वीर तसच कावेरी आणि राजही ते पाहून आश्चर्यचकित होतात... तोवर तिथे अनूसुद्धा धावत धावत पोहोचते. अशा प्रकारे ते शेवटी पाचही जण एकत्र येतात. त्यांना एकत्र आलेल पाहून तिथल वातावरण वेगळच बनत.. त्या खड्ड्यातल्या भिंती हालू लागतात ते एकमेकांचा हात पकडत तेथून पळू लागतात. आता त्यांच्या हातात ते पुस्तक शस्त्र तसच कावेरीला अवगत असलेला मंत्र या सगळ्यामुळे ती दोघ नवरा बायको भिती दाखवण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नव्हती. ती सगळी एक नियोजन आखतात. त्यानूसार कावेरी, राज आणि अनूश्री त्या पंख्याकडे जायच ठरवतात. खरतर राजला तो शब्द समजलेला पण तो कोठे वापरावा लागणार हे कळल नव्हत. पण अनू त्या स्त्रीने सांगितलेला भुतकाळ थोडक्यात सांगते तस त्याच्या लक्षात येत. तसच कावेरीला त्या पुस्तकातली भाषा अवगत होती. त्यामुळे ते तिथ एकत्र जातात. वीर आणि अधिराज ते शस्त्र घेऊन त्या दोघा नवरा बायकोंना किंवा आणखी कोण आल तर त्यांच्याशी लढायला सज्ज झालेली असतात..
म्याँव म्याँव करत एक काळ मांजर अधिराज आणि वीरच्या जवळ येत ते मांजरच आहे म्हणून त्याला क्षुक क्षुक करतात पण ते तिथून आत जात.. वीर काळजीत पडतो पण अधिराज समजवतो अरे सोड यार मांजरच तर आहे..
राजला ती अक्षर कळतात उकरकटू चकरकटू अस लिहिलेल असत त्यावर आणि त्याच्या मागे पुढे ए आणि झी हे इंग्रजी शब्द असतात. पण त्यांना नेमक काय कराव लागेल हेच समजेना तोवर अनूश्रीला त्या टिव्हीची आठवण होते. तीने त्या टिव्ही खाली असलेले बट्णस चेक केलेले त्याच्या रिमोटवर अशाच प्रकारची भाषा आणि अक्षर होती. कावेरीला त्या भाषेचा अर्थ कळतो ती म्हणते उकरकटू म्हणजे दोन आणि चकरकटू म्हणजे चार हि भाषा आधी इथे वापरली जायची. मला त्या राजाने शिकवलेली.. अग ते ठिक आहे पण टिव्ही पाशी जाणार कोण आणि इथे थांबणार कोण.... अग मी जाते तिथे. अनश्री म्हणते पण त एकटी.....
कावेरी म्हणते...
हो कावेरी तुला पुस्तकातली भाषा कळते त्यामुळे तुझ इथ थांबण गरजेच आहे. नंतर ते मुक्ती देताना खूप त्रास देतील म्हणून राजही असू दे तुझ्या सोबत मी जाते.. अस म्हणत ती तिघ एकमेकांना मिठी मारतात आणि अनूला सांभाळून जायला सांगतात.. अनू त्यांना जी खोली राहायला दिलेली त्या खोलीत जायला निघते ती त्या भिंतीपाशी येते. त्या खुणशी नजरेने पाहणाऱ्या चित्रापाशी जाते पण यावेळी तिला ते चित्र रिकामच दिसत तो माणूसच दिसत नाही ते पाहून तिला जास्तच भय वाटत पण तसच सावरत ती पुढे जाते. ती आतच जाते व टिव्ही जवळ जावू लागते तोच टिव्ही आपोआप चालू होतो. त्या स्त्रीने सांगितलेला भुतकाळ जसाच्या तसा चित्रपट असल्यासारखा त्यात दिसू लागतो. तिला ते पाहून जास्तच भिती वाटायला लागते. त्या चित्रापाशी येवून ती टिव्ही स्टॉप होते.. तो माणूस आतून हाक मारू लागतो.. आलीस बाळा ये ये आपल्याला लवकर दूर जायच आहे. ते पाहून अनूला चांगलीच धडकी भरते पण आपल्या मित्रांना आठवत. ती त्या स्त्रीच भजन पुन्हा सुरू करते तस ती टिव्ही पुन्हा बंद पडते ती ते भजन म्हणत म्हणतच टिव्हीखालील ती बटण दाबते.. तीच ते बटण दाबण्याबरोबर वातावरण बदलू लागत.. त्या टिव्हीचा जागच्या जागी स्फोट होतो. अनू तशीच पळत पळत बाहेर येते.. तोवर अनूला येवून काही सापळे गाठतात ते तिच्या भोवती गर्दी करत नाचू लागतात.
इकडे ते काळ मांजर धाडकन आत येत व कावेरीच्या हातातल पुस्तक ओढू लागत. राज त्याला हुसकवायला जातो तोच ती दोघ नवरा बायको तिथ येतात ती जावा इथून नाहीतर मारणार तुम्हाला मारणार तुम्हाला अशी भिती घालू लागतात. व राजवर झडप घालायला जावू लागतात ते त्याच्यावर झडप घालणारच असतात तोच वीर ते शस्त्र त्याच्यावर चालवतो. अधिराज त्या मांजराला कावेरी पासून दूर ढकलतो. खालची माती उकरली गेलेली असते. कावेरी ती दूर करते खाली दोन सापळे असतात ती पटपट ते पुस्तक वाचते... अधिकरची सुखरविंदतातीत नाशनायकर आत साचलयकरतत देव देव तांडवासयरशरणत हस्तघतच तवचरणततकरत मुक्त हवेशयासदेत देत देण्यारस धावरतधावरतं धावरतं.... ती सापळे पेट घेतात. तस तो माणूस आणि त्याची बायको पेट घेत घेत किंचाळत धूर होत जातात. त्याबरोबर अनूभोवती गर्दी केलेली सापळेही राख होतात ते मांजरही पूर्ववत होत.. तिथली जमीन हादरू लागते. ते पाहून ते सगळेच जण एकमेकांच्या हातात हात धरत तेथून बाहेर निघतात....
व दूर पळत पळत त्या जागेतून शेवटी बाहेर पडतात ते घरही जमीनदोस्त होत. तिथ सूर्याची किरणे पसरतात व ती जागा शुद्ध होते.. अनूला मदत केलेली व बाकिच्यांना मदत केलेली स्त्री त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून खुष होते व किरण बनून सूर्याच्या दिशेने जाते...
समाप्त
कळलच नाही कथा सुरू होवून कशी संपली ते तुम्ही रेटिंग देवून, कमेंट देवून व कथा वाचून दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल खूप खूप धन्यवाद..... भेटूया लवकरच नवीन भयकथा घेऊन... तसच ही माझी पहिलीच भयकथा होती म्हणून काही चूका झाल्या असतील तर क्षमस्व..