shabd-logo

रात्र खेळती खेळ भाग 13

20 June 2023

5 पाहिले 5
वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रकाश गिळूनच टाकला. तो दरबारही रिकामा झालेला. खालची जमीन हादरू लागली. व वीरच्या कानावर एक आवाज येवू लागला. तस त्याच मन जास्तच अस्वस्थ झाले. वीर ये वीर वाचव वाचव मला........ राजचा आवाज त्याच्या कानी येत होता......
तो हळूहळू येणाऱ्या आवाजाचा वेध घेत त्या अंधारात चाचपडत पुढे चालला.... तोपर्यंत दुसऱ्या बाजूने आणखी एक आवाज येवू
लागला...
वीर वीर इकडे ये ना आधी हा हा माणूस मला मारायला येतोय बघ ये ना लवकर प्लिज... अनुश्रीचा रडवेल्या स्वरूपात आवाज येत होता.......

त्याला कळेना नेमक कोठे जाव आधी दोन्हीकडून दोन

दोघे जण त्याला बोलवत होते....... तोपर्यंत अचानकच त्याच्या पाठीमागून कोणीतरी जोरात धावत गेल तो तर गरकन मागेच वळला.... पण जसा मागे वळला तसा त्याचा तोल गेला कारण तो जिथे उभा होता तिथून खाली जीना होता.... तो त्या जिन्यावरून घरंगळत खाली गेला.. त्याला जागोजागी खरचटल... परत त्याला आवाज ऐकू आला... ये वीर ये ना इकडे प्लिज वाचव मला ही बाई माझ्याकडे चाकू घेऊन येत आहे. ये ना प्लिज..... तो जिथे होता तिथून काही अंतरावरून अधिराजचा आवाज कानी येत होता..... त्या येत्या आवाजाने परत तो तसच स्वतः ला सावरत उठला.... अचानक वीरला काहितरी क्लिक झाल व तो मोठ्याने म्हणाला तेरी मेरी यारी........यावेळी मात्र सारे आवाजच बंद झाले.. व एक मोठ्याने हसण्याचा आवाज येवू लागला.... तसच विचकळत बोलण्याचा.... हुषार हुषार हाइसा र पोरांनो पर तुमची
हुषारी फार नाय चालायची..... जरी एकमेकांना वळकत असशीला तरीबी तुम्हची भेट नाय व्हायची... इथ आमचच राज्य हाय.... आणि अचानकच वीर जिथे होता तिथे एक जंगली श्वापद येवू लागल. वीरला मात्र याची खबरच नव्हती कारण तिथे फक्त अंधारच दिसत होता..... ते जंगली श्वापद त्याचा वास घेत घेत त्याच्याकडेच झडप घालण्यासाठी येत होत... ते श्वापद जास्तच जवळ आल तस वीरला त्याचा आवाज येवू लागला... त्याने तसच सार बळ एकवटल आणि दुसऱ्या बाजूने जावू लागला...

तो तसच धडपडत पुढे जावू लागला तस त्याला परत आठवण झाली कि आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. काहीही करून आपल्याला यांचा सामना करत पुस्तक शोधलच पाहिजे......

तो पुढे जातच होता कि एक काळी आकृती त्याच्या जवळ आली व तीने त्याचा पाय जोरात ओढला. तो आहे तसाच मागे पडला ... परत जिथे खरचटल होत. तिथे त्या काळ्या आकृतीच्या नखाने परत वार केला तस त्याची ती खरचटून बाहेर आलेली खपली बाहेर आली व त्यातून रक्त बाहेर येवू लागल तस वीरला जोरात कळ आली तरीही त्याने मनाशी केलेला निश्चय
ढळू दिला नाही त्याने त्या आकृतीला जोरात बाजूला ढकलल. तस ती दूरच फेकली गेली व हवेत तरंगत तरंगत परत त्याच्याकडे येवू लागली.. त्याला ती आकृती परत येत आहे हे जाणवताच तो तसाच एके ठिकाणी एका वस्तू असल्याच्या जाणीवेने त्या वस्तूला स्पर्श करून पाहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो बेड आहे तो तसाच चाचपडत त्या बेडखाली गेला.. त्याला वाटल ती आकृती जाता क्षणी बाहेर पडूया पण तिथे तर आणखी एक संकट त्याची वाट पाहत थांबलेल तो जिथे होता..... तिथेच एका बाजूला एक प्रेत होत. जे त्याला पाहून खुष झाले.. वीरला याची जरा पण कल्पना नव्हती.... तो धाप टाकत तसाच थांबलेला... त्याने हातात एक चाकू घेतलेला... त्याने वीर वर चाकू फिरवायला हात पुढे केला... तोच वीरला कोणीतरी जोरात बाहेर ओढल...

कावेरीची हालत खराब होत होती तरीही ती ने स्वतः ला सावरल तिला काहीही करून इथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायचा होता..... कावेरी तशीच स्वतः ला आधार देत डोक्याला लागलेल्या वेदनेचा स्वतः लाच विसर
पाडण्याचा प्रयत्न करत तशीच पुढे पुढे चालली होती....
अचानकच तिचा पाय एका खड्ड्यात गेल्यासारखा खाली गेला.... त्यामुळे ती खाली घसरत गेली.... तिला आपण कोठे आलोय हे तर कळले नाही पण आपण कोणत्यातरी खड्ड्यात फसलोय अस मात्र जाणवल. त्याचबरोबर आता यातून आणि कस बाहेर पडायच याची चिंता मनात डोकावू लागली.....

नको नको हरवू कावू तुम्हाला एकत्र यायच आहे.. तू जिथे आहे तिथून समोर चालत जा. तिथे पाण्याचा आवाज येईल....त्या भिंतीला लागून पलिकडे तुला मार्ग सापडेल..... पण तुला ती भिंत पाडावी लागेल.... हे काम खूप अवघड आहे..... पण तुला आपल्या सगळ्यांसाठी करावच लागेल..... आणि हो त्या नदिपाशी मार्ग सुद्धा आहे आणि धोका सुद्धा आहे... तुला सावध राहून मनाला विचलीत न होवू देता.... तिथे जायला हवा.... कारण त्या नदीमुळेच मार्ग सापडत जरी असला तरी तिथली जमीन, नदितल पाणी, पक्षी, प्राणी, तुला घेता येत असलेला श्वास, वर पसलेल आकाश, त्यातल्या चांदण्या.. इतकच नव्हे तर तिथ गेल्यावर तुझ स्वतः च शरीर सुद्धा तुला मारण्यासाठी आसूसलेल असू शकत कारण ती जा सगळ्यात जास्त शापित आहे.... म्हणूनच तिथे जो कोणी जाईल तो शापितच होतो...त्यासाठी तुला इथेच तयारी करून जाव लागेल..... अस म्हणून तो आवाज ऐकू यायचा बंद झाला..... तस कावेरी विचारू लागली.... कोण कोण तुम्ही आणि माझी मदत का करत आहात.... ते आता महत्त्वाच नाही आहे. वेळ आली कि कळेलच..... कावेरी परत सांगा ना कोण ते विणवू लागली.... पण तो आवाज बंदच झाला...... कावेरी विचार करू लागली आता हे काय नवीनच त्या झुंबरापर्यंत पोहोचणारच होतो तोपर्यंत त्या बाईने इथे आणल.. आणि आता हा आणि कसला मार्ग म्हणायचा. असली कसली ही आपली फरफट चालले......

हो फरफट तुमच्या सगळ्यांची चालली आहे पण काय तर करण्यासाठी फरफटाव पण लागत आपल्याला आणि आपल्या समोर जितक्या अडचणी येतात तितकेच मार्ग पण असतातच पण आपण अडचणींकडे इतक लक्ष देतो काही वेळेला समोरचे किंवा जवळचे मार्ग पण पाहू शकत नाही.... परत तोच आवाज कावेरीला ऐकू आला...
कावेरी मनातच म्हणू लागली.. यांचा आवाज कोठे तरी ऐकल्यासारखा वाटतोय... पण कोठे......

त्याचा आता विचार करू नको.... ते समजेलच तुला.... सांगेन मी स्वतः च पण आता बाहेर कस पडायचा याचाच विचार करा तुमच्याकडे वेळ कमी आहे... तुझ्या मित्रांना काही होण्याआधीच तुला त्यांच्यापर्यंत पोहोचाव लागेल..... चल जाते आता मी माझी वेळ संपली अस म्हणून तो आवाज परत बंद झाला.....

कावेरी आता तिथपर्यंत पोहोचण्याबाबत विचार करू लागली........तिला त्या ऐकू आलेल्या आवाजाने जणू नवीनच ऊर्जा मिळालेली तसच पुन्हा एकदा विश्वास निर्माण झालेला आपण बाहेर पडू शकतो असा.......

prajakta panari ची आणखी पुस्तके

1

रात्र खेळीते खेळ भाग १

17 June 2023
0
0
0

सदर कथा ही पूर्णतः हा काल्पनिक आहे केवळ आणि केवळ मनोरंजन म्हणून वाचावी......आई ....... अशी जोरात हाक मारत. अधिराज घाबरत घाबरतच जागा झाला.समोर सर्वदूर अंधाराच साम्राज्य पसरल होत. आसपास फक्त घनदाट

2

रात्र खेळीते खेळ भाग 2

17 June 2023
0
0
0

ये अधिराज अरे ये कि इकडे केव्हाची वाट पाहतोय तुझी किती उशीर केलास अस म्हणत म्हणत त्याच्या समोर हुबेहूब त्याच्यासारखा दिसणारा मुलगा तिथे येवून उभा राहिला. डोक्याला मार लागलेला. डोळे पांढरे झालेले, हाता

3

रात्र खेळीते खेळ भाग 3

17 June 2023
0
0
0

सगळेजण थोड्या गप्पा मारून तिथेच बाजूच्या खोलीत झोपायला जाऊ लागले. जाता जाता ते आजोबांच घर पाहू लागले. त्या आजोबांच्या घराची रचना थोडी वेगळ्या पद्धतीची होती. बाहेरून अगदी पडक घर वाटायच.पण आत आल्यावर वे

4

रात्र खेळीते खेळ भाग 4

17 June 2023
0
0
0

टक टक टक टक असा आवाज येवू लागला तस कावेरीला जाग आली ती तशीच झोपल्या जागेवरून उठली.तस आवाज कोठून येत आहे याचा वेध घेवू लागली. तस तिला त्या बाजूच्या खिडकीतून आवाज येत असल्यासारख जाणवल ती हळू हळू पुढे जा

5

रात्र खेळती खेळ भाग 5

19 June 2023
0
0
0

त्या खोलीच्या भिंतीतून एक आकृती अलगद बाहेर आली व एका वेगळ्या रूपात साकार होवू लागली व तशीच पुढे येवून अनुश्रीच्या जागी येवून झोपली.... खिडकीचा दरवाजा झपाझप वाजू लागला व त्यातून थंडगार वारे आत शिरू लाग

6

रात्र खेळती खेळ भाग 6

19 June 2023
0
0
0

कावेरी हळूहळू आपल्या बेडवर आजूबाजूला मोबाईल सापडतो का हे शोधू लागली. यावेळी मात्र आधीसारखा जरा ही विलंब न होता तिला पटकन मोबाईल सापडला.. पण ती ने जस टाइम बघितला तस तिला आश्चर्याचा झटकाच बसला तीच्या घड

7

रात्र खेळती खेळ भाग 7

19 June 2023
0
0
0

राज यंत्रवत चालत चालत पुढे जात होता आणि अचानकच त्याला समोर दिसणारे ते डोळे दिसेनासे झाले. तसा लगेचच तो भानावर आला व जस तो भानावर आला तस त्याच्या मनात भितीने संचार केला कारण तो एका मोठ्या गुहेत पोहोचला

8

रात्र खेळती खेळ भाग 8

19 June 2023
0
0
0

पुढे जावू लागली तोवर तिला एक फुलांचा हार करणारी एक स्त्री समोर दिसली तस तर तीला प्रश्न पडला रात्रीच्या अंधारात हि स्त्री हार कस काय करत बसले..... ती तिच्याजवळ जावून तिला विचारू लागली काकि इतक्या रात्र

9

रात्र खेळती खेळ भाग 9

20 June 2023
0
0
0

अनुश्री त्या स्त्रीकडे पाहून स्तब्धच झाली. तिला तिच्याकडे बघून अस्पष्ट अशी दृष्य दिसू लागली पण व्यवस्थितरित्या आठवेना कि हि नक्की कोण आहे... पण तिला तिच्याविषयी आपलेपणाची भावना जाणवू लागली त्याच कारण

10

रात्र खेळती खेळ भाग 10

20 June 2023
0
0
0

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तोमाणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याचीबायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथूनकधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून ये

11

रात्र खेळती खेळ भाग 11

20 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितलेला भूतकाळ ऐकून अनुश्री म्हणाली. ते दोघे नवरा बायको तर मेले ना मग परत हे सगळ का चालू झाले.. त्यावर ती स्त्री सांगू लागली. हा ते दोघे शरीराने गेले पण पूर्णपणे नाही मिटले.. पोलिसांन

12

रात्र खेळती खेळ भाग 12

20 June 2023
0
0
0

वीरच्या समोरून तो मुलगा हळूहळू गायब होतो तस वीर एकीकडून गोंधळून जातो आणि एकीकडून त्याचे डोळे अश्रूंनी भरून येतात. काही क्षण तो स्तब्धच उभा राहतो पण जस मित्रांची आठवण येते तस लगेच स्वतः च्या भावना आवरत

13

रात्र खेळती खेळ भाग 13

20 June 2023
0
0
0

वीरला दरदरून घाम फुटला. अर्धा तास तर होवून गेलेला आता त्याच्या हातात फक्त अर्धा तास शिल्लक होता. तसच आता समोर काय येईल याची पण त्याला थोडी धासती वाटत होती. तिथे अचानकच अंधार पसरला जणू काय कोणीतरी प्रक

14

रात्र खेळती खेळ 14

21 June 2023
0
0
0

ए अनू तु तु इथे कशी पोहोचलीस.... नाही तु पण कोणीतरी दुसरीच आहेस मगाचपासूनच सगळ्यांच्या आवाजाने दुसरच कोणीतरी बोलत आहे तु तु पण अनू नसणारच आमची नक्कीच त्या माणसाने तुझ रूप घेऊन कोणाला तरी पाठवल असणार..

15

रात्र खेळती खेळ 15

21 June 2023
0
0
0

त्या स्त्रीने सांगितल्याप्रमाणे थोडा विचार करून कावेरी तिथल्याच त्या खड्ड्यातल्याच काही वस्तू शोधून घेते तिला वाटल कधी कोणत्या गोष्टींची गरज लागेल सांगता येत नाही म्हणून जे हाती येईल ते सगळ घेते व नंत

16

रात्र खेळती खेळ 16

21 June 2023
0
0
0

अधिराजला काहीच सुचेना झालेल कि काय करायच ते त्याच्यासोबत कावेरीच रूप घेऊन ती स्त्रीच चाललेली होती. तीने त्याला भिती दाखवली नसली किंवा जरी चांगल वागण्याच नाटक करत असली तरी तीला दूर करण गरजेच होत कारण त

17

रात्र खेळती खेळ 17

21 June 2023
0
0
0

अधिराज मित्रांना शोधत शोधत पुढे चाललेला प्रचंड घाबरलेला तरीही मित्रांना वाचवण्यासाठी तीळ तीळ तुटत होता. याच्यापासून अनभिज्ञ कि कोणीतरी आपला पाठलाग करत आहे.एका वळणावर त्याला पावलांचा आवाज येतो तसा तो ग

18

रात्र खेळती खेळ 18

21 June 2023
0
0
0

अधिराज आणि कावेरीच रूप घेऊन आलेली ती स्त्री पुढे पुढे चालले होते. तिथून पुढे एक नदी दिसत होती. त्या नदिच्या जवळ गेल्यावर अधिराजचे पाय जमिनीपासून आपोआपच वरवर जावू लागले. पण त्या कावेरीच्या रूपात आलेल्य

19

रात्र खेळती खेळ 19

21 June 2023
0
0
0

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात..ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आव

20

रात्र खेळती खेळ 20

21 June 2023
0
0
0

वीर अनूला शोधत असतो पण त्या खड्ड्यातल्या अंधारात सतत धडपडायला होत असतो. तो प्रत्येक कोपरा बॅटरीच्या सहाय्याने न्याहाळत असतो. पण एका गोष्टीचा त्याला खूपच त्रास होत असतो तो म्हणजे तिथे तीव्र प्रमाणात दु

21

रात्र खेळती खेळ 21

21 June 2023
0
0
0

ती सगळी प्रेत त्या तिघांच्या अवतीभवती गोळा होवू लागतात. तस त्यांना काय कराव हेच सूचेनास होत. एकतर वीरला पाहून सगळ्यांच हृदयच हळहळत होत. त्यात ते पुस्तक आणि शस्त्र दोन्हीही त्यांच्यापासून दूर झालेल. तर

---

एक पुस्तक वाचा